22/02/2026
Our current national education policy is focusing on STEAM
S - Science
T - Technology
E - Engineering
A - Arts
M - Mathematics
And I got an opportunity to visit Guardian Media and entertainment company's workplace with my Jyoti Classes students. Guardians have been working in the field of Theme park for many years. They have the perfect blending of STEAM in all their creative projects. It was exciting to see world class technology and know about their international level project from such a close distance.
Children were impressed with the novelty, speed, virtual world tour, applications of robotics, animatrix, miniature models, 3D films and many more.
We are thankful to my elder brother Mr. Sanjay Dabke, creator - designer of many international attractions at various Theme parks and his Entire Gaurdian Team for this amazing and wonderful experience.
STEAM
#शिक्षणातीलनवेप्रवाह
शैक्षणिक धोरणामुळे हळूहळू शिक्षणामधे STEAM हा परवलीचा शब्द झालेला असताना ( Science, Technology, Engineering, Art, Mathematics) ते ज्योती क्लासेसच्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, त्यांचा एकत्र आणि प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला पाहिजे असा प्रयत्न करत होते, तशी संधी शोधत होते. ती अचानक मिळाली माझे मोठे बंधू श्री. संजय दाबके यांच्या गार्डियन मिडिया या कंपनीच्या माध्यमातून.
गार्डियन गेल्या अनेक वर्षांपासून देशात, परदेशात आंतरराष्ट्रीय पातळीवर थीमपार्क मधली attractions करत आहेत. Perfect blending of STEAM ..
मुलांच्या दृष्टीने इथं काही इंटरेस्टिंग गोष्टी घडत असल्याचं समजलं आणि यावेळी क्लासच्या मुलांची फिल्डट्रीप इकडे नेली.
3D film, attractions मधे वापरल्या जाणाऱ्या सुरेख प्रमाणबद्ध प्रतिकृती, animatrics, robotics, बोलणारा रोबो, world tour असे जगातले सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून इथे केले जागतिक दर्जाचे तांत्रिक चमत्कार मुलांना अगदी सहज बघता आले. करिअरच्या किती तरी संधी त्यांनी बघितल्या. आपल्याला समोर आकर्षक रुपात आणि सहज घडताना दिसणा-या गोष्टींमागे किती मोठी तयारी, कष्ट, सिस्टीम असतात याची जाणीव झाली.
STEAM हा तर सरकारी धोरणाचा विषय. पण खरं सांगायचं तर या मुलांच्या आवडीच्या गोष्टी लहानपणापासून असतात. म्हणजे नाविन्य, चमत्कृती, साहस, विविधता, तंत्रज्ञान, वेग अशा. पण त्या फक्त पुस्तकात अभ्यासक्रमात आहेत म्हणून अभ्यास करताना बोअरिंग वाटू शकतात. या फिल्डट्रिपमुळे एरवी लांबून बघायला मिळणा-या गोष्टी जवळून स्वतः अनुभवणे यामुळे आता स्टेम त्या प्रकारच्या अभ्यास, याकडे मुलं आणखी डोळसपणे बघतील.
या अद्भुत अनुभवासाठी माझे मोठे बंधू आणि गार्डियन मिडियाच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद 🙏🤗
Jyoti Kemkar
Jyoti Classes, Karvenagar, Pune