Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur

  • Home
  • Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur

Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur We focus on building strong academic foundations while nurturing discipline, values, and all-round development among students.

Our institution strives to create confident, responsible, and socially aware individuals .

आज शिवाजी हायस्कूल नांदा फाटा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाटक स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय गडचांदू...
21/08/2026

आज शिवाजी हायस्कूल नांदा फाटा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाटक स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेला आहे त्याबद्दल या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐

आज महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्...
21/08/2026

आज महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले.

या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते.

आजच्या मार्गदर्शन सत्रात प्रा. प्रदीप परसुटकर यांनी “प्राचीन भारतीय संस्कृती व वैदिक काल” या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयाचे महत्त्व, वैदिक संस्कृतीची वैशिष्ट्ये, सामाजिक व सांस्कृतिक जीवन तसेच परीक्षाभिमुख अभ्यासाची दिशा याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शन सत्रांचा लाभ घेऊन नियमित अभ्यास, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून यश संपादन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेला हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

#स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #महात्मागांधीकनिष्ठमहाविद्यालय #गडचांदूर #प्राचीनभारतीयसंस्कृती #वैदिककाल

16/08/2026

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

14/08/2026
वर्ग 5 वी व वर्ग 7 वी शिष्यवृती परीक्षा - 2026 झालेल्या परीक्षेत वर्ग 5 वी चे आठ विद्यार्थी पात्र झाले व वर्ग 7 चे बत्ती...
10/08/2026

वर्ग 5 वी व वर्ग 7 वी शिष्यवृती परीक्षा - 2026 झालेल्या परीक्षेत वर्ग 5 वी चे आठ विद्यार्थी पात्र झाले व वर्ग 7 चे बत्तीस विद्यार्थी पात्र झाले. पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याधापक श्री. मेश्राम सर उपमुख्याध्यापिका सौ. मस्की मॅडम, पर्यवेक्षक श्री. येडमे सर श्री.मालेकर व पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आज दिनांक 01/08/2026 ला विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती  व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली...
02/08/2026

आज दिनांक 01/08/2026 ला विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. मेश्राम सर प्रमुख अतिथी पर्यवेक्षिका मस्की मॅडम पर्यवेक्षक श्री. वेडमे सर उपस्थित होते. या प्रसंगी कुं. जिया पठाण शिक्षक श्री. धाबेकर सर व कु.दिपाली पाचभाई यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचेसूत्र संचालन कुं.माकोडे मॅडम यांनी केले,आभार कु.थेरे मॅडम यांनी केले. या कायक्रमा प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याचं प्रसंगी जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय मार्फत प्राप्त झालेले प्रमाणपत्र मान्यवराच्या हस्ते प्रतिभावान खेळाडू ना वितरित करण्यात आले.

वन महोत्सव उपक्रमांतर्गत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी...
08/07/2026

वन महोत्सव उपक्रमांतर्गत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे वृक्षारोपण केले.

🎓🌸 नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात! 🌸🎓आज गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी ...
30/06/2026

🎓🌸 नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात! 🌸🎓

आज गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे सचिव मा. धनंजय गोरे यांच्या हस्ते पेन वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक विजय डाहुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीत प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल यश लाभो, हीच सदिच्छा.

💐 सर्व नवागत विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय परिवारात हार्दिक स्वागत! 💐

Address


Opening Hours

Monday 07:00 - 17:00
Tuesday 07:00 - 17:00
Wednesday 07:00 - 17:00
Thursday 07:00 - 17:00
Friday 07:00 - 17:00
Saturday 07:00 - 15:00

Telephone

+919922930133

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share