Zp Cps Branch Urdu Pathri

Zp Cps Branch Urdu Pathri

Share

Many people plant trees but few of them get fruit of it.
- Maulana Abul Kalam Azad

05/04/2026
Photos from Zp Cps Branch Urdu Pathri's post 04/13/2026

आज दिनांक 13/04/2026 रोजी *पी.एम.श्री. जि.प.के.प्रा.शा.शाखा पाथरी* उर्दू येथे SMC मासिक बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्ष आवेज अन्सारी,सदस्य पाशा अन्सारी,कमरुद्दीन अन्सारी,साजेद फारुकी,अहमद अन्सारी,माजेद अन्सारी, सर्व सदस्य आणि शिक्षक प्रतिनिधी फहीम अन्सारी व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Photos from Zp Cps Branch Urdu Pathri's post 04/09/2026

**📚 शाळा विकासासाठी मोलाची देणगी 📚**
PM SHRI ZP CPS BRANCH URDU PATHRI या शाळेच्या ग्रंथालयासाठी
**नगरसेवक मोहम्मद इब्राहिम राशिद अन्सारी साहेब** यांच्या वतीने
₹500 किमतीची पुस्तके भेट देण्यात आली.

ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी
आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.

शाळा परिवार त्यांच्या या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
*अशाच प्रकारे समाजातील मान्यवरांनी शाळेला पाठबळ द्यावे, ही अपेक्षा.*
**📖 "वाचन हेच ज्ञानाचे दार आहे" 📖**
आभारी
मुख्याध्यापक व शिक्षक वृंद

03/20/2026

Addmission Age

Photos from Zp Cps Branch Urdu Pathri's post 03/20/2026

**पाथरीतील उर्दू शाळेचा इतिहास घडवणारा निकाल: नवोदय परीक्षेत १० विद्यार्थी यशस्वी!**

पाथरी, जि. परभणी (प्रतिनिधी)
**शैक्षणिक गुणवत्ता व समर्पणाचा उत्तम नमुना** पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांच उर्दू पाथरी या शाळेने दाखवला आहे. **शैक्षणिक वर्ष 2026-27** साठी घेण्यात आलेल्या *जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत शाळेतील तब्बल १० विद्यार्थी यशस्वी* झाले आहेत. अब्दुल जामे अब्दुल इकबाल, जुल्फेकार अहमद, माज अहमद नुर, रिजवान पाशा, फाबिहा दाणीन मुस्ताकीम, सोबिया खिजर, उम्मे एमन अजीम कुरेशी, हसीब शकील, रूमिजा चांद पाशा कुरेशी आणि तरीन अलीजा अता ऊर रहेमान हे विद्यार्थी यशस्वी झाले म्हणून वर्गशिक्षक सय्यद अब्दुल बारी आणि फहीम उर्फ जानी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे **विद्यार्थी अब्दुल जामे अब्दुल इकबाल अन्सारी** याने **86% गुणांसह उर्दू माध्यमातून पाथरी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून** एक वेगळाच इतिहास घडवला आहे.

**गटशिक्षण अधिकारी श्री. मुकेश राठोड साहेबांनी** या गुणवंत विद्यार्थ्याचे *इदच्या शुभेच्छा देत खास बक्षीस म्हणून ड्रेस भेट* दिला व आपल्या आनंदाची मनमोकळी भावना व्यक्त केली. **उर्दू शाळांबाबत राठोड साहेबांचे विशेष प्रेम आणि मार्गदर्शन** नेहमीच जाणवते. त्यांनी नवोदय परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रेरणा दिली आहे.

मागील वर्षी याच शाळेतील *11 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले* होते. यंदाही तसाच निकाल अपेक्षित आहे. **शाळेला ‘पी.एम. श्री’ दर्जा प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढला** आहे. त्यामुळे *शहरातील अनेक पालक खासगी व इंग्रजी माध्यम शाळांऐवजी या जिल्हा परिषद शाळेचा पर्याय निवडत आहेत.*

ही शाळा **101 वर्षांची प्राचीन व विश्वासार्ह उर्दू माध्यमाची शाळा** असून, येथे *9 शिक्षकांपैकी 5 शिक्षक TET पात्र* आहेत आणि बाकी शिक्षकही पात्रता परीक्षेला सामोरे जात आहेत. सर्व शिक्षक अत्यंत *अनुभवी, समर्पित व विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे* आहेत.

या यशाबद्दल **मुख्याध्यापक मोहम्मद बिलाल अन्सारी सर, सर्व शिक्षक वृंद यांनी तसेच अध्यक्ष आवेस अंसारी व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि जमील सिद्दिकी सर, सानप सर केंद्रप्रमुख व मुकेश राठोड गटशिक्षण अधिकारी** यांनी अभिनंदन केले व असेच रीत्याने उत्कृष्ट दर्जाचे शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवावे असे अपेक्षा व्यक्त केली.

**📝 अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क करा:**
*पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांच उर्दू, पाथरी*

03/17/2026

डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत
PM SHRI शाळांची १६ मार्च २०२६ पर्यंतची शाळानिहाय माहिती.
Khan Academy online Home Work karne wali list me Parbhani District me Top par hai *PM SHRI ZP CPS BRANCH URDU PATHRI*
Congratulations


02/28/2026

Retirement Of Headmaster Jameel Ahmed Riyazuddin Siddiqui

08/23/2025

पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा उर्दू पाथरी जिल्हा परभणी.
आनंदाय शनिवार 23/08/2025
विद्यार्थ्यांचे केस, नख, दातांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कवायत आणि योगा केले.
पारंपारिक सण पोळा निमित्त माहिती देण्यात आली.
मिशन निपुण परभणी अंतर्गत एक खेळ घेण्यात आला.
तक्रारपेटी उघडण्यात आली. शून्य तक्रार.
उर्दू वाचन 3.0 कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्धा तास मूक वाचन केले.
#आनंदायशनिवार, #पीएमश्रीशाळा, #उर्दूवाचन3.0 #اردومطالعہ3.0

08/12/2025

ایک اسکول ایسا ہو
جہاں سوال کرنا پہلا سبق ہو
(والدین اور اساتذہ کے لیے ایک دعوتِ فکر)

سوچیے، اگر کوئی ایسا اسکول ہو
جہاں بچوں کو سبق یاد کروانے سے پہلے
سوال پوچھنا سکھایا جائے؟

جہاں دن کی ابتدا اس جملے سے ہو
"آج ہم صرف سوچیں گے اور سوال کریں گے!" اور استاد مسکرا کر کہے "میرا مقصد صرف جواب دینا نہیں، بلکہ تمہارے اندر سوچ پیدا کرنا ہے۔" شاید عجیب لگے، مگر یہی وہ تعلیم کا انداز ہے جس پر کئی صدیوں سے اہلِ دانش زور دیتے آئے ہیں، جن میں یونانی مفکر ارسطو بھی شامل ہے جنہوں نے کہا تھا کہ علم بانٹنے سے زیادہ اہم ہے، سوچنے کی تحریک دینا۔

آج ہمارے گھروں اور اسکولوں
میں یہ منظر عام ہے کہ بچہ اگر پوچھے: "امی! بارش کیسے ہوتی ہے؟"، بجلی نظر کیوں نہیں آتی.؟، چاند دن میں دکھائی کیوں نہیں دیتا..؟ تو ماں تھک کر کہتی ہے: "بس بہت سوال مت کرو!"… اور بچہ خاموش ہو جاتا ہے۔ سوال دب جاتا ہے، اور سوچ رک جاتی ہے۔

لہٰذا اگر ہم چاہتے ہیں کہ
ہمارے بچے صرف نمبر لینے والے نہ ہوں بلکہ حقائق پر غور کرنے والے، بڑے مسائل حل کرنے والے ہوں تو انہیں سوال کرنے دیں۔ جب وہ پوچھیں "کیوں؟"، تو انہیں جھڑکنے کے بجائے محبت سے کہیں: "آپ کا کیا خیال ہے؟" یہ وہ جملہ ہے جو اُن کے ذہن کو جگا دے گا ۔

گھر میں ایک "سوال کی دیوار" بنائی جا سکتی ہے۔ اسکول میں ایک "کیوں کا گوشہ" بنایا جہاں بچے سوال لکھیں، ان پر تبادلہ خیال ہو، فوری جواب دینے کے بجائے سوچنے کا وقت دیا جائے۔ کہانیوں کے بعد پوچھا جائے: "اگر آپ ہوتے تو کیا کرتے؟" اس سے تخیل کو پر لگ جاتے ہیں، اور دماغ میں روشنی کے در وا ہوتے ہیں۔

یہ اسکول کہیں باہر نہیں،
یہ آپ کے گھر سے شروع ہوتا ہے آپ کے اندازِ گفتگو، آپ کے رویے، اور سوالات کو برداشت کرنے کے ظرف سے۔ آئیں ہم اپنے گھروں کو ایسا مدرسہ بنا سکیں، جہاں سوال کرنا پہلا سبق ہو، اور جواب… وہ بچہ خود تلاش کرے، شوق اور شعور کے ساتھ۔

اللہ ، آپ کو آسانیاں عطا فرمائے۔

Want your school to be the top-listed School/college in New York?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

New York, NY

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 1pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 4pm