JYOTI Classes

  • Home
  • JYOTI Classes

JYOTI Classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from JYOTI Classes, Education, Karvenagar, .

Admissions for new Academic year 2026 - 2027 open Class 8, 9, 19SSC, CBSE, NIOS, ICSE boardsScience + Mathematics Classe...
24/03/2026

Admissions for new Academic year 2026 - 2027 open

Class 8, 9, 19
SSC, CBSE, NIOS, ICSE boards
Science + Mathematics

Classes start on 3rd April.
3rd April to 30th April - Regular classes
4th May to 16th May - Study Skills Workshop

Study Skills Workshop is included in class fees
For other students, Study Skills Workshop fees - ₹ 5500/-

Special attraction of study skills workshop
Visit to an international Theme Park in Pune and dialogue with the team who created this theme park

Contact for details - 7028455295

 #राष्ट्रीयशैक्षणिकधोरण #अभ्यासकौशल्य #परीक्षातयारीसगळे करतात म्हणून आपण अंधानुकरण करण्यापेक्षा आपण काय करतोय आणि का करत...
10/03/2026

#राष्ट्रीयशैक्षणिकधोरण
#अभ्यासकौशल्य
#परीक्षातयारी

सगळे करतात म्हणून आपण अंधानुकरण करण्यापेक्षा आपण काय करतोय आणि का करतोय हे कळलं तर खूपशा गोष्टी सोप्या होतात.

अभ्यास आणि परीक्षेचंही तसंच आहे. कुणा एकाला एका पद्धतीने यश मिळालं म्हणून ते त्याचं पद्धतीने सगळ्यांना मिळतं असं नाही.

यशाचा एकच एक असा रेडिमेड फॉर्म्युला नाही. आपला फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागतो. तो तयार करण्यासाठी, समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ, सराव, संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

स्टडीस्किल म्हणजे अभ्यास कौशल्य कार्यशाळेत आम्ही हेच शिकवतो. स्वतःच्या strengths आणि weakness ओळखून त्यावर काम करणं...

त्यामुळे आमचे विद्यार्थी कोणत्याही ताणाशिवाय परीक्षा देतात आणि नुसते अंकी गुण नव्हे तर खरेखुरे अनेक गुण आत्मसात करतात...

*वर्षभर सशुल्क मार्गदर्शन सुविधा उपलब्ध

ज्योती केमकर
शिक्षिका, शालेय मानस तज्ज्ञ, करिअर मार्गदर्शक, पुणे

Book Your Dates

Exclusive STUDY SKILLS WORKSHOP
4th May to 16th May 2026
10 am to 1 pm
Karve Nagar, Pune

   Our current national education policy is focusing on STEAMS - Science T - Technology E - Engineering A - ArtsM - Math...
22/02/2026





Our current national education policy is focusing on STEAM

S - Science
T - Technology
E - Engineering
A - Arts
M - Mathematics

And I got an opportunity to visit Guardian Media and entertainment company's workplace with my Jyoti Classes students. Guardians have been working in the field of Theme park for many years. They have the perfect blending of STEAM in all their creative projects. It was exciting to see world class technology and know about their international level project from such a close distance.

Children were impressed with the novelty, speed, virtual world tour, applications of robotics, animatrix, miniature models, 3D films and many more.

We are thankful to my elder brother Mr. Sanjay Dabke, creator - designer of many international attractions at various Theme parks and his Entire Gaurdian Team for this amazing and wonderful experience.

STEAM

#शिक्षणातीलनवेप्रवाह

शैक्षणिक धोरणामुळे हळूहळू शिक्षणामधे STEAM हा परवलीचा शब्द झालेला असताना ( Science, Technology, Engineering, Art, Mathematics) ते ज्योती क्लासेसच्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, त्यांचा एकत्र आणि प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला पाहिजे असा प्रयत्न करत होते, तशी संधी शोधत होते. ती अचानक मिळाली माझे मोठे बंधू श्री. संजय दाबके यांच्या गार्डियन मिडिया या कंपनीच्या माध्यमातून.

गार्डियन गेल्या अनेक वर्षांपासून देशात, परदेशात आंतरराष्ट्रीय पातळीवर थीमपार्क मधली attractions करत आहेत. Perfect blending of STEAM ..

मुलांच्या दृष्टीने इथं काही इंटरेस्टिंग गोष्टी घडत असल्याचं समजलं आणि यावेळी क्लासच्या मुलांची फिल्डट्रीप इकडे नेली.

3D film, attractions मधे वापरल्या जाणाऱ्या सुरेख प्रमाणबद्ध प्रतिकृती, animatrics, robotics, बोलणारा रोबो, world tour असे जगातले सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून इथे केले जागतिक दर्जाचे तांत्रिक चमत्कार मुलांना अगदी सहज बघता आले. करिअरच्या किती तरी संधी त्यांनी बघितल्या. आपल्याला समोर आकर्षक रुपात आणि सहज घडताना दिसणा-या गोष्टींमागे किती मोठी तयारी, कष्ट, सिस्टीम असतात याची जाणीव झाली.

STEAM हा तर सरकारी धोरणाचा विषय. पण खरं सांगायचं तर या मुलांच्या आवडीच्या गोष्टी लहानपणापासून असतात. म्हणजे नाविन्य, चमत्कृती, साहस, विविधता, तंत्रज्ञान, वेग अशा. पण त्या फक्त पुस्तकात अभ्यासक्रमात आहेत म्हणून अभ्यास करताना बोअरिंग वाटू शकतात. या फिल्डट्रिपमुळे एरवी लांबून बघायला मिळणा-या गोष्टी जवळून स्वतः अनुभवणे यामुळे आता स्टेम त्या प्रकारच्या अभ्यास, याकडे मुलं आणखी डोळसपणे बघतील.

या अद्भुत अनुभवासाठी माझे मोठे बंधू आणि गार्डियन मिडियाच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद 🙏🤗

Jyoti Kemkar
Jyoti Classes, Karvenagar, Pune

Thank you everyone for the likes and for following this page🙏🤗
14/02/2026

Thank you everyone for the likes and for following this page
🙏🤗

 #रांगोळीस्पर्धा #मांडणीशिल्पस्पर्धा    नमस्कार 🙏😊अक्षरज्योती एज्युकेशन ॲंड ट्रेनिंग आयोजित नाविन्यपूर्ण अशा *रांगोळी रच...
01/02/2026

#रांगोळीस्पर्धा
#मांडणीशिल्पस्पर्धा





नमस्कार 🙏😊

अक्षरज्योती एज्युकेशन ॲंड ट्रेनिंग आयोजित नाविन्यपूर्ण अशा

*रांगोळी रचना*
आणि
*मांडणी शिल्प*

स्पर्धेची माहिती देताना अतिशय आनंद होत आहे. ही स्पर्धा पूर्णपणे नि: शुल्क आहे.

कधीतरी शांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात असताना सभोवताली बघितलं तर कल्पक लोकांना झाडांची पानं, ढग, उथळ नदीच्या, झ-याच्या तळाशी असलेले लहान दगडगोटे यांत लपलेले वेगवेगळे आकार दिसायला लागतात.

घरी काही सणसमारंभ असेल, पाहुणे येणार असतील तर वैशिष्ट्यपूर्ण आरास केली जाते.

रांगोळी तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यातही रांगोळी आणि रंगांच्या बरोबरीने फुलं, पानं वापरली तर रांगोळीचे सौंदर्य आणखी खुलते.

रांगोळी, रंग, फुलं, पानं, रंगीबेरंगी किंवा गुळगुळीत दगड, काटक्या, अगदी फळं, भाज्या वापरूनसुद्धा सुरेख रांगोळी रचता येते आणि स्वयंपाकघरातली लहान भांडी, उपकरणं, दिवे अशा वस्तू वापरून आपण घराचा छोटासा कोपरा सुंदर सजवू शकतो. तर मुलांनाही हे सगळं लहानपणापासून दाखवायला हवं. मोबाईल व्यतिरिक्त इतर गोष्टींत मन छान रमतं, नवीन छंद लागू शकतो, सौंदर्यदृष्टी विकसित होते हे यातून मुलांनी जाणायला हवं.

पालकांनाही यात सामावून घेतलं की आपल्या मुलांबरोबर एकत्र काम करण्याचा आनंद तर मिळेलच, पण मुलांमधले छुपे गुणही पालकांना कळतील. आपले पालकही किती विचारपूर्वक काम करतात हे मुलांना कळेल. खरं तर हाच स्पर्धेचा हेतू आहे.

वय वर्षे १० ते १२ या वयात मुलं सर्वात जास्त active आणि responsive असतात. अफाट ऊर्जा असते, कोण काय म्हणेल याची भीती नसते, विचारही मुक्त असतात आणि दहावीच्या परीक्षेचे tension नसते त्यामुळे पालक अभ्यासासाठी जास्त मागे लागत नाहीत, म्हणून हाच वयोगट 😊

ही स्पर्धा नि:शुल्क आहे. तर आपल्या पाल्याबरोबर नक्की सहभागी व्हा आणि आपल्या मुलांबरोबर एका रविवारी सर्जनशील उपक्रमाचा अनुभव घ्या...
🤗

ज्योती केमकर
संस्थापक, संचालक
अक्षरज्योती एज्युकेशन ॲंड ट्रेनिंग, पुणे
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी कृपया what's app मेसेज करा - +91 7028455295

 #दहावीपरीक्षा..  #अभ्यास  ाबद्दल  #महत्त्वाचे..अगदी अडीच, तीन वर्षांच्या मुलांना शाळेत घालताना पालकांना माहिती असतं की ...
28/12/2025

#दहावीपरीक्षा..
#अभ्यास
ाबद्दल
#महत्त्वाचे..

अगदी अडीच, तीन वर्षांच्या मुलांना शाळेत घालताना पालकांना माहिती असतं की अजून बारा, तेरा वर्षांनी आपलं मूल दहावीची परीक्षा देणार आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार मुलांच्या शिक्षणाकडे, परीक्षेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोनही वेगवेगळा असतो. काही पालक अभ्यास, अभ्यासक्रम, परीक्षा आणि मुलांची त्यातली प्रगती याबाबतीत सुरुवातीपासून अतिशय फोकस्ड असतात. त्यानुसार मुलांना वळण, शिस्त लावतात. काही पालक नंतर अभ्यास करायचाच आहे अशा विचाराने मुलांना सुरुवातीला ठराविक वयापर्यंत थोडा मोकळेपणा देतात आणि नंतर अभ्यासाकडे वळवतात. काही पालक मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देतात आणि त्याचे परिणाम स्विकारण्याची त्यांची तयारी असते. यातला एक मार्ग निवडून त्यावर ठाम रहाणारे पालक सहसा दहावीच्या परीक्षेचे दडपण घेत नाहीत.

पण काही पालक वेगवेगळ्या कारणांनी गोंधळलेले असतात, इतर पालक काय करतात ते बघून आपण काय करायचं ठरवतात. कधी पालकांनाही peer pressure असतं तर काही पालक काहीतरी वेगळं करून बघूया म्हणून मुलांना काही वेगळ्या, स्पष्टता नसलेल्या वाटेने न्यायचा प्रयत्न करतात. मुलांसाठी जे करु ते डोळे उघडे ठेवून केलं तर सहसा निर्णय चुकत नाहीत. पण काही पालक मात्र अतिशय धरसोड करतात. मुलांना आधी खूप मोकळेपणा देऊन एकदम नववीत अभ्यास, परीक्षा, मार्क, परफॉर्मन्स यासाठी मुलांच्या मागे लागतात. त्यामुळे मुलं ब-याचदा गोंधळून जातात, कधी बिथरतात, परिणामी पूर्ण घरातलं वातावरण बदलतं आणि एकप्रकारे तणाव निर्माण होतो.
खरं तर दहावीची ( कोणत्याही बोर्डाची) परीक्षा इतकं घाबरण्यासारखी मुळीच नाही. मस्त हसत खेळत, अभ्यासाचा आनंद घेत मुलं परीक्षेची तयारी करु शकतात.

यासाठी माझ्या अक्षरज्योती या संस्थेत ( या आधी नाव अभ्यासिका लर्निंग ॲन्ड रिसोर्स सेंटर होते.) मी एक स्वतंत्र अभ्यास वर्ग चालवते.
हा वर्ग मुलांची नववीची परीक्षा झाल्यावर मे महिन्यात स्टडी स्किल्स workshop ने सुरू होतो आणि पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत चालतो. महत्त्वाच्या सुट्ट्यांचे अपवाद वगळता दर महिन्यात पहिल्या आणि तिस-या शनिवारी अभ्यासवर्ग असा महिन्यात दोन वेळा वर्ग असतो. प्रत्येक सेशन दोन तासांचे असते.

यात मुख्यतः असे काम चालते 👇

*प्रत्येक विषय का शिकायचा, *त्यातून कोणत्या क्षमतांचा विकास होतो?
*अभ्यासाच्या सवयी
*अभ्यास कौशल्य
*अभ्यास आणि वेळेचे नियोजन
*दर पंधरा दिवसांनी घरुन पूर्ण करुन आणायचे काम
*अभ्यासाची स्वयंशिस्त
*परीक्षेची तयारी
*उत्तरपत्रिका लेखनसराव
*ही तयारी सर्व विषयांसाठी करून घेतली जाते.

मात्र यासाठी अर्थात काटेकोर नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि पालकांचे संपूर्ण सहकार्य आवश्यक असते. तरच टप्प्याटप्प्याने मुलांचा आत्मविश्वास वाढवत त्यांना पुढे नेता येतं.

या वर्गात विषय शिकवले जात नसून अभ्यास कसा करायचा ते शिकवले जाते आणि स्वयं अध्ययन, स्वअभ्यास यासाठी बैठक तयार केली जाते.

शिक्षणक्षेत्रातील अनुभवाचा, केलेल्या कामाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा याच हेतूने हा वर्ग या पद्धतीने गेली १८ वर्षे चालवते आहे. या अभ्यासवर्गात शिकून गेलेले विद्यार्थी, त्यांचे पालक कधी कुठे भेटले तर आवर्जून थांबून/ थांबवून सांगतात की तुम्ही लावलेल्या सवयींचा आम्हाला/आमच्या मुलांना उच्चशिक्षण घेताना अतिशय फायदा झाला तेव्हा खरोखर केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते.

या वर्षीची अभ्यासवर्गाची सुरुवात ४ मे ते १६ मे या कालावधीत होणा-या study skills workshop ने होईल आणि पुढे फेब्रुवारीपर्यंत वर्ग चालेल.

अधिक माहितीसाठी संपर्क
ज्योती केमकर
7028455295
कृपया w/a वर आधी मेसेज पाठवावा.

   Some days are tiring but fulfilling...साधे विज्ञानाचे प्रयोग, फार विशेष काही नाही..दर वर्षी तेच, अर्थात मुलं वेगळी..🤗...
25/12/2025





Some days are tiring but fulfilling...

साधे विज्ञानाचे प्रयोग, फार विशेष काही नाही..दर वर्षी तेच, अर्थात मुलं वेगळी..🤗

काही अपवाद सोडले तर शाळांमधल्या मोठमोठ्या प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग करु देणं दूर पण प्रात्यक्षिकं - demonstrations ही दाखवत नाहीत हल्ली..

ओपन स्कूलिंगमधून बोर्ड परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी तर अशा संधी महत्त्वाच्या..

प्रयोग साधे, सोपे असले तरी प्रत्येक मुलाने स्वतः हाताने करणं महत्त्वाचं.. किमान स्वतः काही गोष्टींचा अनुभव घेतला म्हणजे अमूर्त गोष्टींबद्दल कल्पना करणं थोडं तरी सोपं होतं..

आमची प्रयोगशाळा लहान असली तरी इच्छाशक्ती जबरदस्त आहे 😅

मोठी प्रयोगशाळाही होईल लवकर !!

बाकी side product निरीक्षण कौशल्य, accuracy, precision वगैरे नेहमीचेच..

ज्योती केमकर
ज्योती क्लासेस, पुणे

नवरात्र संकल्प दृढ निश्चयाचा..सातत्याचा..जागर मन: शक्तीचा...
28/09/2025

नवरात्र
संकल्प दृढ निश्चयाचा..
सातत्याचा..
जागर मन: शक्तीचा...

Address

Karvenagar

411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when JYOTI Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to JYOTI Classes:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed school/college?

Share