27/09/2025
#विज्ञानप्रदर्शनी
लोकनायक बापूजी अणे विद्यालय येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनीत
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकनायक बापूजी अणे विद्यालय, यवतमाळ येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन एज्युकेशन सोसायटी, यवतमाळचे उपाध्यक्ष अजय राऊत, कार्यकारिणी सदस्य विवेक धर्माधिकारी, मुख्याध्यापिका सौ. छाया पांडे, उपमुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत केळापुरे व पर्यवेक्षक श्री. सचिन देशपांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या प्रदर्शनीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान ,पर्यावरण रक्षण , कृषी आणि मानवी आरोग्य तसेच अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयावर आधारित इयत्ता ५ वी ते ७ वी तील ४२ आणि इयत्ता ८ वी ते १० वी तील ३४ अशा एकूण ७६ प्रतिकृती सादर करण्यात आल्या. तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या सृजनशील कल्पनांमधून विविध प्रयोग, प्रकल्प व संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचा इतिहास, आधुनिक प्रयोग तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अनुभूती घेता आली.
एज्युकेशन सोसायटी, यवतमाळचे उपाध्यक्ष अजय राऊत तसेच कार्यकारिणी सदस्य विवेक धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एज्युकेशन सोसायटी यवतमाळ चे सचिव धनंजय पांडे यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. वर्ग ५ ते ७ च्या प्रतिकृतीचे परीक्षण अमोल बाबरे, कु.भाग्यश्री पेंडसे यांनी तर वर्ग ८ ते १० च्या प्रतिकृतीचे परीक्षण सतीश सराफ, तुषार चिकटे,अनिल काळे यांनी केले.
उदघाटन कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ छायाताई पांडे केले. संचालन सतीश सराफ तर आभार प्रदर्शन अमित राजकुंडवार यांनी केले.या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. छाया पांडे, उपमुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत केळापुरे व पर्यवेक्षक श्री. सचिन देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील विज्ञान विषय शिक्षक सौ. धनश्री पांडे, सौ. भावना पिसे, अमित राजकुंडवार, सतीश सराफ, तुषार चिकटे, अनिल काळे, वृषभ शिंदे, सौ. प्रतिमा पिंपळकर व सौ. रेखा कंठाळे यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रदर्शनी यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.