New English School & Junior College, Bhalod

New English School & Junior College, Bhalod गुणवत्तेनुसार प्रवेश न देता प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यास कटिबद्ध..NESB

09/05/2026
*भालोद शाळेची उज्वल निकालाची परंपरा अबाधित* येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेने नुकत्याच जाहीर झालेल्या ...
08/05/2026

*भालोद शाळेची उज्वल निकालाची परंपरा अबाधित*
येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेने नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करून उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक बाबतीत परिसरात असलेला आपला दबदबा कायम ठेवला.
ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या या निकालात भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेचा 94.84% इतका निकाल लागला असून केतकी खिलचंद महाजन या विद्यार्थिनीने 94.20% गुण मिळवत शाळेतून तथा केंद्रातून प्रथम तर कुंजल शिरीष नेहेते या विद्यार्थिनीने 92.20% गुण मिळवून शाळेतून तथा केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला.याचबरोबर भालोद शाळेतील 97 नियमित विद्यार्थ्यांपैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केंद्रातून प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींचे तसेच शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. गणेशदादा नेहेते,उपाध्यक्ष मा.श्री.जी.डी चौधरी, संस्थेच्या मा.चेअरमन सौ हेमलताताई इंगळे, मा.व्हॉ.चेअरमन कृषीभूषण श्री नारायण चौधरी,मा.सेक्रेटरी श्री भास्करदादा पिंपळे तसेच संपूर्ण संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.एस.जावळे पर्यवेक्षक श्री बी.एन.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व थरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

05/05/2026

भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू झालेल्या विविध उपक्रमांपैकीच आजचा उपक्रम म्हणजे 'आत्मरक्षा प्रशिक्षण'. यासाठी आमंत्रित केलेले कराटेपटू श्री हसबन सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत...

*न्यू इंग्लिश स्कूल भालोद शाळेत उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांची सुरुवात.*न्...
03/05/2026

*न्यू इंग्लिश स्कूल भालोद शाळेत उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांची सुरुवात.*
न्यू इंग्लिश स्कूल भालोद शाळेत उन्हाळी सुट्टीत विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. त्याचे उद्घाटन से. ए. सोसायटीच्या चेअरमन मा.सौ हेमलताताई इंगळे यांनी केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम आणि नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. या उद्घाटन प्रसंगी व्हॉ.चेअरमन श्री नारायण बापू चौधरी, संस्थेचे सचिव भास्कर दादा पिंपळे, उपाध्यक्ष श्री जी.डी. चौधरी,संचालक श्री मनोज चौधरी, श्री प्रदीप जावळे, मुख्याध्यापक श्री आर .एस. जावळे, शिक्षक डी .एस .देशमुख, शिक्षिका सौ गायत्री जावळे व विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ,शारीरिक व मानसिक विकासासाठी अनेक उपक्रम घेण्यात येणार आहे. हे उपक्रम संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नि:शुल्कपणे शाळेचे शिक्षक व बाहेरून आमंत्रित केलेले तज्ञ मार्गदर्शक घेणार आहेत.

03/05/2026

प्रिय विद्यार्थी, पालक आणि सर्व हितचिंतकांनो,

काही ठिकाणे केवळ शिकवत नाहीत – ती स्वप्ने घडवतात, भीती घालवतात, आणि सामान्य क्षणांनाही आयुष्यभर लक्षात राहणारी रत्नं बनवतात. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भालोद अशीच एक जागा आहे.

या भिंतींच्या आत रोज हसू गुंजते, शिक्षक केवळ शिक्षक नाहीत तर मार्गदर्शक आणि खरे स्नेही बनतात, अपयश हे शिक्षणाचा भाग बनते, आणि छोटासा विजयही साजरा होतो. दररोज सकाळी आम्ही फक्त गेट उघडत नाही – तर मनं उघडतो. आम्ही फक्त अभ्यास नाही, तर दया, कुतूहल, आणि मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस निर्माण करतो

आज आम्ही आपल्याला हृदयपूर्वक विनंती करतो – आपल्या New English School and Junior College, Bhalod च्या Facebook पेज ला फॉलो करा.

या पेजवर आम्ही छोटी पण मोठी स्वप्नं असणारी पोस्ट शेअर करणार आहोत, जी रोज या शाळेत उमलतात. एखाद्या विद्यार्थ्याची पहिली टाळी, विज्ञानाचा मॉडेलने मिळवलेली दाद, अश्रू आणणारी कविता, क्रीडा स्पर्धेत मिळालेला अभिमान,विविध शालेय तसेच सहशालेय उपक्रम यांची माहिती असेल

फॉलो करून तुम्ही फक्त बटण दाबत नाही – तर म्हणता, "*मला भालोद च्या या छोट्याशा शाळेच्या मोठ्या स्वप्नांवर विश्वास आहे.*"

📌 कृपया खालील लिंकवर जाऊन Like आणि Follow नक्की करा. शेअर करा, आपले मित्र, नातेवाईक यांनाही सांगा.

https://www.facebook.com/share/18pzgay797/

कारण तुम्ही फॉलो कराल, तर आमचं शाळाकुटुंब मोठं होईल… आणि भालोदचं नाव आणखी उज्ज्वल होईल.

गुणवत्तेनुसार प्रवेश न देता प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यास कटिबद्ध..NESB

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत,ज्युनिअर कॉलेज भालोद च्या उज्वल यशाची परंपरा कायम…..सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प...
02/05/2026

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत,ज्युनिअर कॉलेज भालोद च्या उज्वल यशाची परंपरा कायम…..
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 #

*ज्ञानमंदिरासाठी माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञतेची भावपूर्ण साथ*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, भालोद या आपल्या ज्ञान...
12/02/2026

*ज्ञानमंदिरासाठी माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञतेची भावपूर्ण साथ*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, भालोद या आपल्या ज्ञानमंदिराशी प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे एक जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे नाते जोडलेले आहे. या शाळेने दिलेले ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा हेच आपल्या आयुष्याचे खरे भांडवल ठरले आहे. आज हीच आपली *ज्ञानभूमी १०० वर्षांचा गौरवशाली वारसा* जपत भावी पिढ्यांसाठी अधिक सक्षम व सुसज्ज शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

याच ऋणाची जाणीव ठेवत *सन १९७६ च्या एस.एस.सी. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच शाळेला भेट देत आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता आणि आपुलकी कृतीतून व्यक्त केली. त्यांनी शाळेच्या विकासासाठी ₹३,३३,३३३/- इतकी देणगी* देऊन केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर शाळेबद्दलची संवेदना, जिव्हाळा आणि ऋणातून उतराई होण्याची सुंदर भावना सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या या योगदानामुळे शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीला एक प्रेरणादायी बळ मिळाले आहे.

आपली शाळा ही केवळ एक इमारत नसून, आपल्या सर्वांच्या आयुष्याला आकार देणारे पवित्र स्थान आहे. आजही अनेक विद्यार्थी याच ज्ञानमंदिरातून घडत आहेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी पाऊले टाकत आहेत.

आपल्या सर्वांच्या प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादातून ही ज्ञानपरंपरा अधिक सक्षम व समृद्ध होत राहील, हीच अपेक्षा.

*आपला विश्वासू,*
मुख्याध्यापक
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, भालोद

Address

Hingona Road, Bhalod
Yaval
425304

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School & Junior College, Bhalod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to New English School & Junior College, Bhalod:

Shortcuts

Share

Category