M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim

M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim Run by : "Prabhu Shri Ramchandra Shikshan Prasarak Mandal Tondgaon"
Affiliated with: Sant Gadge Baba Amravati University.

Founder President : Late Principal Shankarrao Gote
NAAC Accredited: B Grade
Available Course: BA./B.Com./B.Sc. & Ph.D The Prabhu Shri Ramchandra Shikshan Prasarak Mandal Tondgaon registered name under society registration Act.-1860 and 1950 by late Shankarrao Gote the Visionary Principal, Deogiri College Parbhani. It assures to uplift the rural, educationally backward classes through imparting its

visionary mission’s objectives. It dreamed to provide contemporary Education from primary to higher level, realizing & putting in mind the cause of backwardness the status of education in rural students which is need of time

Vision: - The logo of the College reflects the visionary prayer & thirst of education. The whole knowledge of this universe should be poured in the vacuum of my brain & mind. The mandal sculpt the foundation of young generation for the sound unity & retaining of Democratic values. It resolves to impart Education to make the strong, sharp, intellectual citizens would use the potential for the interest of the society

दि. 21 ऑगस्ट 2026माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस मृद व जलसंधारण दिन म्हणून साजरा.......................
21/08/2026

दि. 21 ऑगस्ट 2026
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस मृद व जलसंधारण दिन म्हणून साजरा....................................................
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि 'जलसंधारणाचे प्रणेते' स्व. सुधाकरराव नाईक यांची जयंती २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' म्हणून साजरी केली जाते. याच उद्देशाने मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस मृद व जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एस.कुबडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बी.आर.तनपुरे व डॉ. डी.एन.लांजेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकेत डॉ. विष्णू लांडे यांनी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत, त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाची ओळख करून दिली. डॉ. डी.एन.लांजेवार यांनी सुधाकरराव नाईक यांचा जलसंधारणाचा विचार आज कृतीत आणणे गरज झाल्याचे सांगितले. मृदसंधारण व जलसंधारण हे शेती, पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पीढीसाठी त्यांचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. बी.आर.तनपुरे यांनी मातीसंवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे यासारख्या योजना राबवून, हरीत महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी युवकांनी वृक्षारोपण करावे. एवढेच नव्हे तर आजचे जलसंवर्धन हे उद्याचे सुरक्षित भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. जी.एस.कुबडे यांनी जलसंधारणासाठी एक महाविद्यालय एक शोषखड्डा हा उपक्रम राबविणे हिताचे असल्याचे सांगितले. पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश देत, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी जिथे जिथे पाणी वाचविता येईल, तिथे तिथे त्यांनी पाण्याची बचत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज ठाकरे यांने केले, तर उपस्थितांचे आभार गणेश कर्डिले यांनी मानले.

दि. 21 ऑगस्ट 2026 महा वॉकथॉन - वॉक फॉर वॉटर  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त मृद...
21/08/2026

दि. 21 ऑगस्ट 2026
महा वॉकथॉन - वॉक फॉर वॉटर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त मृद व जलसंधारण दिन निमित्य वाशिम शहरांमध्ये महा वॉकथॉन - वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मातोश्री शांताबाई गोटे वाशीम या महाविद्यालयाने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. डी एन लांजेवार, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी एस पाथरकर, डॉ. डी आर दामोदर, डॉ. व्ही एन लांडे, डॉ. बी आर तनपुरे, डॉ. पी जे गोटे, डॉ. आर जी बोंडे, डॉ. बी डी पट्टेबहादुर यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या सहभाग नोंदविला.

दिनांक 20 ऑगस्ट 2026  माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन महाविद्यालयामध्ये साजरा करण्...
20/08/2026

दिनांक 20 ऑगस्ट 2026
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री संजू भाऊ गोटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी एस कुबडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

15 ऑगस्ट 2026  स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित संस्थाध्यक्ष, डॉ.नारायणराव गोटे, महाविद्यालया...
20/08/2026

15 ऑगस्ट 2026
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित संस्थाध्यक्ष, डॉ.नारायणराव गोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी एस कुबडे व सोबत इतर मान्यवर

दि. 14 ऑगस्ट 2026 हर घर तिरंगा अभियान अंतर्गत महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
20/08/2026

दि. 14 ऑगस्ट 2026
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. 14 ऑगस्ट 2026 हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालय परिसरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन
20/08/2026

दि. 14 ऑगस्ट 2026
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालय परिसरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन

दि. 12.08.2026 मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथे  डॉ एस. आर.रंगनाथन यांच जयंती निमित अभिवादन कार्यक्रम चे आय...
12/08/2026

दि. 12.08.2026
मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथे डॉ एस. आर.रंगनाथन यांच जयंती निमित अभिवादन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री संजूभाऊ गोटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस.कुबडे, ग्रंथपाल डॉ. आर. जी.बोंडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती

दि.06. 08.2026मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. ...
11/08/2026

दि.06. 08.2026
मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जी. एस. कुबडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, समाज कल्याण तालुका समन्वयक संतोष बोरीवार प्रा. डॉ. हनुमान गोटे यांची उपस्थिती होती.

दिनांक 03 ऑगस्ट 2026महाविद्यालयातील  लोकप्रशासन विषयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी श्री प्रवीण डी...
05/08/2026

दिनांक 03 ऑगस्ट 2026
महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी श्री प्रवीण डी सरवदे यांची आचार्य पदवी करिता खुली मौखिक परीक्षा संपन्न झाली आणि विद्यापीठाला आचार्य पदवी प्रदान करण्याकरिता शिफारस करण्यात आली. हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महाविद्यालयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्रातील लोकप्रशासन विषयाचे पहिलेच संशोधक विद्यार्थी आहेत. यावेळी बाह्य परीक्षक म्हणून प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील डॉ.विजय तुंटे सर, महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ एन जे गोटे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.एस कुबडे सर उपस्थित होते.

प्रा डॉ विलास गायकवाड,
लोकप्रशासन विभाग प्रमुख,
मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम

दि. 01 / 08 / 2026 अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित संजूभाऊ गोटे, महाव...
01/08/2026

दि. 01 / 08 / 2026
अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित संजूभाऊ गोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी... या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये मराठी विभागाच्या वतीने लेखन प्रेरणा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्त्री संजू भाऊ गोटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विलास गायकवाड व डॉ. विष्णू लांडे यांची उपस्थिती होती.

Address

Near Water Tank, Hingoli Road
Washim
444505

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

+919890326962

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to M.S.Gote Arts, Commerce & Science College, Washim:

Shortcuts

Share

Category