S S S K R Innani Mahavidyalaya Karanja Lad Dist. Washim

  • Home
  • India
  • Washim
  • S S S K R Innani Mahavidyalaya Karanja Lad Dist. Washim
Call Directions Website Contact the school

S S S K R Innani Mahavidyalaya Karanja Lad Dist. Washim Re-accrediated“A+” grade by NAAC (CGPA 3.28) Affiliated to S.G.B.A.University, Amravati

Foundation of the Institute in the year 1983, It is a multi-faculty education centre imparting quality education in UG and PG levels also having doctoral research.

🚀 Celebrating Success: Inaugural Ceremony of Photons Physics Association 2026–27! 🚀We are thrilled to share that the Dep...
11/09/2026

🚀 Celebrating Success: Inaugural Ceremony of Photons Physics Association 2026–27! 🚀

We are thrilled to share that the Department of Physics at S. S. K. R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), successfully hosted the Inaugural Ceremony of the Photons Physics Association for the academic year 2026–27! 🌌🔬
The event was a grand success, beautifully aligning with our theme: "Lighting the Path of Knowledge: From Quanta to Cosmos, Discovering the Universe through Physics." 💫
✨ Highlights of the Day:
🔹 The ceremony was gracefully chaired by our respected Vice Principal, Dr. A. D. Barde, who shared invaluable guidance with our students.
🔹 Our esteemed Chief Guest, Prof. D. D. Kothekar (Asst. Professor, Mungasaji Maharaj Mahavidyalaya, Darwha), delivered an incredibly inspiring address, sparking a renewed curiosity for scientific exploration.
🔹 We extend our heartfelt gratitude to our respected Principal, Dr. R. M. Patil, for his immense support and for granting the permissions that made this event possible.
🔹 Prof. S. K. Kokate (Head, Dept. of Physics) and Miss Vedika Dahatonde (Association President, M.Sc I) shared their visionary plans for the association's upcoming activities.
Heartfelt gratitude to all the respected Heads of Departments, teaching faculty members, staff, and enthusiastic students whose presence and valuable support made this event truly memorable. 🙏✨
A special thank you to everyone for supporting our digital movement—embracing our green motto: "Save Paper, Save Environment, Save Money." 🌱📃
Here's to a year full of learning, innovation, and scientific discovery! 🌟

ज्ञानातून प्रगतीकडे : विज्ञान, वाचन आणि नवचेतनेची दिशाडॉ. विक्रम साराभाई व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त इन्नाणी महाव...
12/08/2026

ज्ञानातून प्रगतीकडे : विज्ञान, वाचन आणि नवचेतनेची दिशा
डॉ. विक्रम साराभाई व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त इन्नाणी महाविद्यालयात विशेष कार्यक्रम
कारंजा (लाड), दि. १२ ऑगस्ट २०२६ :

विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीद्वारा संचालित स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा (लाड), जि. वाशिम येथे भौतिकशास्त्र विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विक्रम साराभाई व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त “ज्ञानातून प्रगतीकडे : विज्ञान, वाचन आणि नवचेतनेची दिशा” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या हॉल ‘A’ मध्ये हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील होते. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अश्विनीकुमार बाजपेयी, भौतिकशास्त्र विभाग, श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अशोक मानकर, विनोदी कथालेखक, कारंजा (लाड) हे होते. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. अशोक मानकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, वाचनाची सवय, ज्ञानाची जिज्ञासा आणि चिकित्सक विचारसरणी यांचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात केवळ माहिती मिळविणे पुरेसे नसून, उपलब्ध माहितीचे चिकित्सक विश्लेषण करून तिचा योग्य व विधायक उपयोग करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ‘का?’ आणि ‘कसे?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्यावी. प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, प्रयोग करणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे या प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व भारताच्या अंतराळ संशोधनातील योगदानाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, संशोधनवृत्ती आणि नवनिर्मितीचा ध्यास जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विविध विषयांचे वाचन करावे, असे त्यांनी सांगितले. “वाचनातून ज्ञान आणि ज्ञानातून प्रगती” हा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा. वाचनामुळे आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, चिकित्सक विचार आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित होते, असे त्यांनी नमूद केले. विज्ञान, वाचन आणि तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांनी ज्ञानाधिष्ठित, सर्जनशील व जबाबदार व्यक्तिमत्त्व घडवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. अश्विनीकुमार यू. बाजपेयी यांनी डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. भारताच्या अंतराळ संशोधनाच्या विकासात डॉ. विक्रम साराभाई यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, त्यांची वैज्ञानिक दूरदृष्टी आणि भारतातील वैज्ञानिक संशोधनाला त्यांनी दिलेली दिशा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक व पाठ्यपुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकाधारित (Practical) आणि कौशल्याधारित (Skill-based) शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन डॉ. बाजपेयी यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण, योग्य व जबाबदारीने वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व कौशल्यांमध्ये सातत्याने वाढ करावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. विक्रम साराभाई यांच्या योगदानावर भाष्य करताना त्यांनी त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रा. दीपक धर यांना २०२६ मध्ये प्राप्त झालेल्या प्रतिष्ठित Dirac Medal विषयीही माहिती दिली. भारतीय वैज्ञानिक जागतिक स्तरावरील संशोधनामध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत, याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचार, संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि कौशल्यविकास यांना आपल्या शैक्षणिक जीवनात प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात वाचनाला केवळ अभ्यासाचा भाग न मानता ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन म्हणून स्वीकारावे, असे प्रतिपादन केले. नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, आकलनक्षमता, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच विविध विषयांतील साहित्याचे वाचन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
“साहित्य आणि विज्ञान हे परस्परविरोधी नसून एकमेकांना समृद्ध करणारे ज्ञानक्षेत्र आहेत. या दोन्हींचा समन्वय साधला तर सर्जनशील विचार, नवनिर्मिती आणि समाजाच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळू शकते,” असे प्राचार्य डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. साहित्य मानवाला संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देते, तर विज्ञान तर्क, प्रयोग आणि पुराव्यांच्या आधारे सत्याचा शोध घेण्याची दिशा देते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी तत्त्वज्ञान (Philosophy) आणि विज्ञान (Science) यांच्यातील परस्परसंबंधांवरही विस्तृत मार्गदर्शन केले. विज्ञान “हे कसे घडते?” याचा शोध घेते, तर तत्त्वज्ञान “का घडते?” आणि त्याचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे, याचा विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानासोबत चिंतनशील आणि चिकित्सक विचारांची जोड असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि वाचन यांचा समन्वय साधून चिकित्सक विचार, सर्जनशीलता, नवकल्पना आणि मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माहिती मिळविणे सोपे झाले असले तरी त्या माहितीचा विवेकपूर्ण, विधायक आणि समाजोपयोगी वापर करण्याची क्षमता विकसित करणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. के. कोकाटे, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग तथा ग्रंथालय प्रभारी, यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना विज्ञान, वाचन आणि ज्ञान यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासातील महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला. डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, वाचनाची सवय, कौशल्यविकास आणि संशोधनवृत्ती जोपासावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका दहातोंडे व कु. दीपम कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी कार्यक्रमातील विविध मान्यवरांचा परिचय करून देत कार्यक्रमाचे सर्व सत्रे सुयोग्य पद्धतीने पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती विभा लाहोटी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे, प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांची विभागनिहाय उपस्थिती नोंदविण्यात आली तसेच उपस्थित विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार, वाचनसंस्कृती, प्रात्यक्षिकाधारित व कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संशोधनवृत्ती आणि नवकल्पना याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.

डॉ. विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक कार्यातून दूरदृष्टी, संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा, तर डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्यातून वाचन, ज्ञानप्रसार आणि ग्रंथालय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित झाले. विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि वाचन यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

🎓 ADMISSIONS OPEN 2026–27 🎓📚 Department of Physics🏛️ S.S.S.K.R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), Dist. Washim🌟 Build...
23/06/2026

🎓 ADMISSIONS OPEN 2026–27 🎓

📚 Department of Physics
🏛️ S.S.S.K.R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), Dist. Washim

🌟 Build Your Future with Physics – Explore the Laws that Shape the Universe!

✅ B.Sc. First Year Admissions Open
✅ M.Sc. First Year Admissions Open
✅ Well-Equipped Physics Laboratories
✅ Experienced & Research-Oriented Faculty
✅ ICT Enabled Teaching
✅ Competitive Exam Guidance (NET, SET, GATE, JAM, BARC, DRDO, ISRO)
✅ Career Opportunities in Research, Industry, Education & Technology

🏆 NAAC Accredited Institution

🔬 Photon Physics Association
Learn | Explore | Innovate

📧 Email: [[email protected]](mailto:[email protected])
📱 Contact: 8421226129

👉 Secure your future with Physics. Admissions are now open!


21/03/2026
21/03/2026

📢 S. S. S. K. R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), Dist. Washim.
Department of Physics

🚀✨ Igniting young minds with Physics! ✨🚀

"फोटॉन्स फिजिक्स असोसिएशनचे भव्य उद्घाटन : 'ज्ञानाचा प्रकाश – क्वांटा ते विश्व' "भौतिकशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाच्य...
28/09/2025

"फोटॉन्स फिजिक्स असोसिएशनचे भव्य उद्घाटन : 'ज्ञानाचा प्रकाश – क्वांटा ते विश्व' "

भौतिकशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवनिर्मितीची प्रेरणा

स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय कारंजा लाड येथील भौतिकशास्त्र विभागात फोटॉन्स फिजिक्स असोसिएशनचे उद्घाटन

दिनांक : 25 सप्टेंबर 2025
स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय कारंजा लाड येथील भौतिकशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष 2025–26 करिता फोटॉन्स फिजिक्स असोसिएशनचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. यावर्षीच्या अभ्यास मंडळ उपक्रमांची संकल्पना *“ज्ञानाचा मार्ग उजळवणे”* या टॅगलाइनसह *“क्वांटमपासून कॉसमॉसपर्यंत – भौतिकशास्त्राद्वारे विश्वाचा शोध घेणे”* अशी उपथीम ठेवण्यात आली. *“ज्ञानाचा प्रकाश – क्वांटा ते विश्व”* ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना संशोधन व नवनिर्मितीकडे प्रवृत्त करणारे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील कला शाखाप्रमुख डॉ. टी. डी. राजगुरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारवा (जि. यवतमाळ) येथील उपप्राचार्य तथा भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत डी. बागेश्वर, तसेच महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एन. जी. जाधव, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एन. देवरे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. के. कोकाटे आणि फिजिक्स स्टुडन्ट असोसिएशनच्या अध्यक्षा दिपाली जोंधळेकर हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेशवंदनेने झाली. स्वागतपर गीत मानसी काळेकर आणि सानिका भोजापुरे यांनी सादर केले. यानंतर प्रास्ताविक भाषणात विभागप्रमुख प्रा. एस. के. कोकाटे यांनी स्टुडन्ट असोसिएशनची उद्दिष्टे व फायदे यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी मंडळाच्या वतीने वर्षभरात अतिथी व्याख्याने, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, प्रकल्प स्पर्धा व ग्रामीण भागातील विज्ञान प्रसार कार्यक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.

उद्घाटक डॉ. प्रशांत बागेश्वर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात भौतिकशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. *“विज्ञान हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे”* असा संदेश देत विद्यार्थ्यांनी संशोधक दृष्टिकोन आत्मसात करावा, घटनांवर विचार करून आत्मचिंतन करावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान-प्रदर्शनातील पोस्टर्स व मॉडेल्सना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. माहितीपूर्ण सादरीकरणे, प्रात्यक्षिके आणि भाषणे यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा अधिक प्रज्वलित झाली.

असोसिएशनच्या अध्यक्षा दिपाली जोंधळेकर यांनी वर्षभर उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे आश्वासन दिले. डॉ. एन. जी. जाधव यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास मंडळाच्या उपक्रमांमध्ये तन-मन-धनाने सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन केले. डॉ. ए. एन. देवरे यांनी संघटनात्मक कामकाजामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना व सामाजिक बांधिलकी वाढते, असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. टी. डी. राजगुरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत वेळेचे नियोजन महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. भरत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. मनिष शृंगारे, प्रा. यश मानकर, शिक्षकेत्तर कर्मचारी गजानन इंगळे आणि विद्यार्थ्यांचेही योगदान लाभले.

भौतिकशास्त्र मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवीन उमेद निर्माण झाली असून आगामी वर्षात या मंडळाचे उपक्रम ज्ञान व संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

25/09/2025

📢 S. S. S. K. R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), Dist. Washim.
Department of Physics

🚀✨ Igniting young minds with Physics! ✨🚀

We are pleased to announce the
🎉 Inaugural Ceremony of the Photons Physics Association 2025-26 🎉

Join us for the
🗓 Date: 25th September 2025
⏰ Time: 12:00 pm
📍 Venue: Seminar Hall

💡 Theme: “Lighting the Path of Knowledge”
🔭 Sub-theme: “From Quanta to Cosmos, Discovering the Universe through Physics”

👨‍🏫 Chief Guest:
Dr. P. D. Bageshwar, Professor & Head, Department of Physics,
Mungasaji Maharaj Mahavidyalaya, Darwha, Dist. Yavatmal

👨‍🎓 Chairperson:
Dr. R. M. Patil, Principal, S.S.S.K.R. Innani Mahavidyalaya

✨ We look forward to your presence and active participation, which will truly inspire and encourage our students.

📸 Stay tuned for highlights of this exciting journey of science, curiosity & discovery!

25/09/2025

📢 S. S. S. K. R. Innani Mahavidyalaya, Karanja (Lad), Dist. Washim.
Department of Physics

🚀✨ Igniting young minds with Physics! ✨🚀

We are pleased to announce the
🎉 Inaugural Ceremony of the Photons Physics Association 2025-26 🎉

Join us for the
🗓 Date: 25th September 2025
⏰ Time: 12:00 pm
📍 Venue: Seminar Hall

💡 Theme: “Lighting the Path of Knowledge”
🔭 Sub-theme: “From Quanta to Cosmos, Discovering the Universe through Physics”

👨‍🏫 Chief Guest:
Dr. P. D. Bageshwar, Professor & Head, Department of Physics,
Mungasaji Maharaj Mahavidyalaya, Darwha, Dist. Yavatmal

👨‍🎓 Chairperson:
Dr. R. M. Patil, Principal, S.S.S.K.R. Innani Mahavidyalaya

✨ We look forward to your presence and active participation, which will truly inspire and encourage our students.

📸 Stay tuned for highlights of this exciting journey of science, curiosity & discovery!

"आदरणीय सर आपणास,५९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील आपले दूरदृ...
13/08/2025

"आदरणीय सर आपणास,
५९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील आपले दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, अथक परिश्रम आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक ठरत आले आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी कार्याच्या अखंड प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Address

Karanja Lad, Murtizapur Road, Karanja, Karanja/
Washim
444105

Alerts

Be the first to know and let us send you an email when S S S K R Innani Mahavidyalaya Karanja Lad Dist. Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to S S S K R Innani Mahavidyalaya Karanja Lad Dist. Washim:

Shortcuts

Share