25/12/2021
शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ (वारजे - पुणे)
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मोहोळ विद्यालय ) येथे गणित विभागाच्या वतीने २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त "गणित सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले आहे. आज २५ डिसेंबर २०२१ रोजी पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील गणित शिक्षक व समुपदेशक श्री भगवान पांडेकर यांनी " करिअर इन मॅथेमॅटिक्स" या विषयावरील व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफले.
याप्रसंगी त्यांनी गणिताची आवड , गणितीय दृष्टीकोन, गणितातून मिळणारी जीवन कौशल्य , गणितात करिअर करण्यासाठी लागणारे आवश्यक गुण , गणितामध्ये राष्ट्रीय व शासकीय संस्थांमधून मिळणारे शिक्षण , खाजगी शिक्षण संस्थांमधून मिळणारे शिक्षण तसेच शासकीय व खाजगी क्षेत्रांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या गणित संशोधक, शास्त्रज्ञ होण्यासाठी कसा करिअरचा प्रवास करावा? त्यासाठी प्रेरणादायी भारतीय व पाश्च्यात गणितीय शास्त्रज्ञ व तज्ञ या विषयीची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडीओ चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना दिली याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या मनामधील असणाऱ्या गणिताविषयीच्या प्रश्नांची उत्तरे व्याख्यानातून दिली
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. जे. बी.जगताप सर , पर्यवेक्षिका मा.एस.पी.पवार मॅडम , श्री. लक्ष्मण लोंढे सर, श्री साळुंके सुधीर व सर्व गणित विषय शिक्षक उपस्थित होते. विद्यालयात गणित सप्ताहमध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. सदर उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यालयातील कार्यकुल , कार्यक्षम व गणित प्रेमी गणित शिक्षक मा.श्री देविदास शिंदे (D.H.) सर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केले होते. त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनस्वी धन्यवाद !