ASA Wardha-Maharashtra

ASA Wardha-Maharashtra we want to share social topics and issues. we are working on education sector

   रोहित काय लिहू आणि काय बोलू रे मित्रा ?तू पेटवलेस सगळ्यांना तुझ्या  चीतेच्या आगेतूनफासावर तू स्वतः चढला होता असे म्हण...
16/01/2021





रोहित
काय लिहू आणि काय बोलू रे मित्रा ?
तू पेटवलेस सगळ्यांना तुझ्या चीतेच्या आगेतून

फासावर तू स्वतः चढला होता
असे म्हणणारे सगळीकडे आहे
पण
आम्हाला माहिती आहे
तुझ्या गळ्यातला तो फास
आणि त्या वेळेसाठीचे गुन्हेगार कोण आहेत

पण
तू असताना पेक्षा
तू नसतानाचे मित्राचे आयुष्य खूप जड झाले रे

तुझ्यामुळे चळवळ नव्याने उभी राहिली
चळवळीत नसलेले हिरो होऊन प्रसिद्धी घेऊन गब्बर झालेत
पण तुझ्या सारखे आणि तुझ्या सोबतचे
यांची लढाई मात्र कठीण झाली रे

तू गेला आम्हाला सोडून
पण तुझ्यासारखे जाण्याचे प्रवास अजूनही आम्ही थांबवू शकलो नाही
आणि तुझ्या सोबतच्या मित्रांना आम्ही जगण्यासाठी बळ देऊ शकलो नाही

प्रशांत,सुकन्ना,विजय,शेषा यांचे स्वप्न
त्यांच्यासाठी तू पाहिलेले स्वप्न तसेच आहे
त्यात नव्याने भर पडत गेली
पण
तू जाताना जी पत्र लिहून अप्रत्यक्ष
अपेक्षा ठेऊन गेलास समाजाकडून
ती
फक्त प्रसिद्धीतच आहे
जमिनीवर नाही

तुझ्यात उद्रेक होताच
म्हणूनच तुझ्या शाहिदत्वाच्या उद्रेकाने
मनुवाद्यांना हादरे दिलेत
आणि
स्वकीयांना एकत्र होण्याची ऊर्जा

तुझी ऊर्जा तेवत ठेवताना
तुला अजूनही न्याय देऊ शकलो नाही या वेदनेला
जिवंत ठेवून
चळवळीत आयुष्य घालवणाऱ्या सैनिकांना
लढण्याची आणि जगण्याची रसद पोहोचवावी
एवढी इच्छा, ताकत, मानसिकता आणि आर्थिक सुबत्ता
यावी
हेच तुला अभिवादन
रोहित भाई

संदीप भगत
(ASA Wardha, Maharashtrat)

03/01/2021
अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ...बेघरांना घर द्यावं....रंजल्या - गांजल्याची सेवा करावी ..मुक्या प्राण्यावर दया करावी ...बा...
20/12/2020

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ...
बेघरांना घर द्यावं....
रंजल्या - गांजल्याची सेवा करावी ..
मुक्या प्राण्यावर दया करावी ...
बापहो देव यांच्यात राहतो
बापहो देव देवळात राहत नाही
देव आपल्या मनात राहतो
देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते !!!!!!

संत गाडगेबाबा महाराज
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

18/12/2020

"  ूर्यपुत्र_यशवंत_(भय्यासाहेब) ंबेडकर "भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहा...
12/12/2020

" ूर्यपुत्र_यशवंत_(भय्यासाहेब) ंबेडकर "
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले .
भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले .त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला . त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.
नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते.
बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " Thoughts on pakistan" हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " federation versus freedom " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला " Thoughts on linguistic states " हा ग्रंथ सुद्धा भाय्यासाहेबांनी छापला .
त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.
भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला . चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . s/c federation आणि R.P.I पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले . या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७-३-१९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते.
भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.
बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत
धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते.
१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्यासोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ .
स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .
भय्यासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी झोकून दिले
चैत्याभूमिचे शिल्पकार , महापंडित काश्यप,सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम ..

! जय भीम ! !!जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

Educate Agitate Organise Babasaheb Ambedkar Night School in TamilnaduPlace :Pappireddipatti.Dharmapuri District Tamilnad...
27/10/2020

Educate Agitate Organise

Babasaheb Ambedkar Night School in Tamilnadu

Place :Pappireddipatti.Dharmapuri District Tamilnadu.

Dhammacharkra Pravartan Dinachya Mangalmay Shubhecha 🙏🙏🙏💐💐💐ASAAmbedkar Students Association,Wardha(MH)
13/10/2020

Dhammacharkra Pravartan Dinachya Mangalmay Shubhecha 🙏🙏🙏💐💐💐

ASA
Ambedkar Students Association,Wardha(MH)

Statement by Joint Action Council of Ambedkarite Student organizations against Caste Violence on Dalits.We on behalf of ...
07/10/2020

Statement by Joint Action Council of Ambedkarite Student organizations against Caste Violence on Dalits.
We on behalf of all the signatories listed her appeal all the anti-caste organizations and like minded individuals to join us for a country wide peaceful protest on the 10th of October.

Stop Caste based violence on Dalits!
Stop Caste based sexual violence on Dalit women!!

11/07/2020

Address

Wardha

Telephone

+919881084824

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ASA Wardha-Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ASA Wardha-Maharashtra:

Shortcuts

Share

Category