11/02/2022
मानवी जीवन रसायनशास्त्र व्याप्त- अॅड. लक्ष्मण भेदी.
मानवी जीवनात आसपास असणारी प्रत्येक गोष्ट रसायनशास्त्राने व्यापलेली आहे. या शास्त्राच्या नित्य उपयोगा शिवाय आपले जीवन संभवच नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने यातील नवनवीन संशोधनांचे अखंड अध्ययन करीत स्वत:ला विकसित करावे." असे विचार शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सचिव एड.लक्ष्मण भेदी यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने, जागतिक पातळीवर संपन्न झालेल्या 'इंटरनॅशनल इअर आॅफ पिराडिक टेबल २०१९' च्या समापना च्या निमित्ताने आयोजित प्रतिकृती आणि भित्तिपत्रांच्या प्रदर्शनांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते विचार व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कुचनकर, मांडवकर, कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आस्वले यांनी आवर्तसारणी चे रसायनशास्त्रातील महत्व आणि अनिवार्यता यावर प्रकाश टाकला.
आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान विशद केले.
या प्रदर्शनीत 120 भित्तिपत्रकांच्याद्वारे प्रत्येक पदार्थ द्रव्याचे नाव, त्याचे संशोधक, संशोधन वर्ष, रासायनिक सूत्र, अणु क्रमांक, अणुभार, संरचना इत्यादी पारिभाषिक गोष्टींसोबत सामान्य व्यवहारातील उपयोग याआधारे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे शंभरच्यावर प्रतिकृती च्या द्वारे त्या पदार्थाची संरचना किंवा व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोग यांचे प्रात्यक्षिक घडवले आहे.
या प्रदर्शनीच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रणय दुधे आणि अक्सा खान यांनी तर आभारप्रदर्शन हर्षिका सुत्रावे हिने केले.
त्यानंतर सोनम गुप्ता या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींने पाॅवर पाॅईंट प्रेझेन्टेशन द्वारे पिराॅडिक टेबलच्या इतिहासासह विविध पैलू उलगडून दाखविले. यासोबत स्नेहल जोगी, अश्विनी धुळे, मिस्बा शेख यांनी दिवसभर या विषयावर सादरीकरण केले.