AIMS - Asian innovative Modern School

AIMS - Asian innovative Modern School language school

एम्सला महाराष्ट्र एन जी ओ फोरमचे अध्यक्ष मा. जाकीर शिकलगार (कराड), मा. प्रा. अस्लम बारी (नागपूर) यांनी भेट दिली. यावेळी ...
04/12/2025

एम्सला महाराष्ट्र एन जी ओ फोरमचे अध्यक्ष मा. जाकीर शिकलगार (कराड), मा. प्रा. अस्लम बारी (नागपूर) यांनी भेट दिली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी शिफा सद्दाम शेख हिने त्यांचे स्वागत केले.

#एम्स

28/11/2025

एम्समधील संविधान दिन

#एम्स

20/08/2025
राज्यशास्त्राचे अभ्यासक मतीन शेख यांनी एम्सला भेट दिली.  यावेळी त्यांनी एम्सच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले.  ...
16/08/2025

राज्यशास्त्राचे अभ्यासक मतीन शेख यांनी एम्सला भेट दिली. यावेळी त्यांनी एम्सच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले.

#एम्स

08/08/2025

आज "एम्स"मध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

#एम्स_सोलापूर #विद्यार्थी_विकास #वक्तृत्व_कौशल्य

06/08/2025

हा मोहम्मद अली. आमच्या एम्समध्ये यु. के. जी. च्या वर्गात शिकतो. हा गोष्टी ऐकण्याच्या वयात, आपल्या कल्पनाशक्ती नुसार त्यात बदल करतो. नव्या गोष्टी रचतो. काल परवा जंगलातून प्रवास करत आपल्या लेकीला भेटायला जाणार्‍या म्हातारीची गोष्ट याने सांगितली. नुसती गोष्ट सांगितली नाही तर, याच्या गोष्टीतील म्हातारी लेकीच्या घरी राहून धष्टपुष्ट होत नाही. ती पोटाला फुगा बांधून, त्या फुग्यात मिरची भरून जंगलात परत येते. आणि जंगलात जे सिंह, वाघ म्हातारीला खायला आसुसलेले असतात ते जेव्हा म्हातारीवर हल्ला करतात. तेव्हा फुगा फुटून संपूर्ण मिरची या वाघ -सिंहाच्या डोळ्यात जाते. आणि म्हातारी सही सलामत सुटते. महत्त्वाचं म्हणजे मोहम्मद अली ही कहाणी अस्सल दखनी भाषेत सांगतो.

#एम्स_सोलापूर #वक्तृत्व_कौशल्य #विद्यार्थी_विकास

31/07/2025

विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य निर्माण व्हावे आणि मंचाविषयीची भीती दूर व्हावी यासाठी आम्ही एम्समध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत आहोत. त्यापैकीच एक प्रयोग हास्य स्पर्धेचा होता. या स्पर्धेत जो उत्तम रीतीने स्टेजवर हसून दाखवेल त्याला पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. आमच्या शाळेतील जवळपास 50 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यात काही विद्यार्थ्यांनी शोले चित्रपटातील गब्बर सिंगच्या हसण्याची नक्कल केली. तर काही मुलांनी जोर जोरात हसून दाखवले. आणि हसताना चेहऱ्यावरचे हावभाव बदलत, समोरच्या विद्यार्थ्यांना हसवले. विशेष म्हणजे ही सर्व मुले पहिली ते चौथी या वर्गातील आहेत. या स्पर्धेनंतर आम्ही कथाकथनांचा प्रयोग सादर करण्यास विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. या कथाकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या तीन विद्यार्थ्यांनी स्वतःहून कथा रचल्या आणि त्या उत्तम रीतीने सादरही केल्या.

#एम्स_सोलापूर #सरफराज_अहमद_पोस्ट #हास्यस्पर्धा #वक्तृत्व_कौशल्य #विद्यार्थी_विकास

आज एम्सला लेखिका आणि पत्रकार हिना खान, ज्येष्ठ अभ्यासक, लेखक प्रा. युसूफ बेन्नूर यांनी भेट दिली. यावेळी लँग्वेज स्कूलच्य...
23/07/2025

आज एम्सला लेखिका आणि पत्रकार हिना खान, ज्येष्ठ अभ्यासक, लेखक प्रा. युसूफ बेन्नूर यांनी भेट दिली. यावेळी लँग्वेज स्कूलच्या मुख्याध्यापक मिस्बाह शेख यांनी त्यांचे स्वागत केले.

#एम्स_सोलापूर #एशिअन_पोस्ट #एशिअन

आज एम्समध्ये सावित्री महिला संघटनेची संविधान जागर कार्यशाळा पार पडली. राजवैभवने मोठ्या कौशल्याने, संयमी आणि सहज आकलन होई...
20/07/2025

आज एम्समध्ये सावित्री महिला संघटनेची संविधान जागर कार्यशाळा पार पडली. राजवैभवने मोठ्या कौशल्याने, संयमी आणि सहज आकलन होईल अशा शैलीत संविधानाविषयी प्राथमिक स्तरावरील व गहन अशा मुद्द्यांवर महिलांना प्रशिक्षित केले. महिलांमध्ये संवैधानिक अधिकारांची जाणीव जागृत व्हावी यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी सावित्री महिला संघटना आणि एम्सच्या टीमने परिश्रम घेतले.

#एम्स_सोलापूर #संविधान_जागर #सावित्री_संघटना #सावित्री #राजवैभव #एम्स_पोस्ट

उद्या एम्समध्ये संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एम्समध्ये उभारलेल्या प्रशिक्षण केंद्रातील ही पहिली कार्य...
19/07/2025

उद्या एम्समध्ये संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एम्समध्ये उभारलेल्या प्रशिक्षण केंद्रातील ही पहिली कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा महिलांसाठी सावित्री महिला संघटनेकडून आयोजित करण्यात आली आहे. 100 महिला कार्यकर्त्या उद्या दिवसभर संविधान जागर कार्यशाळेत प्रशिक्षण घेतील.

#संविधान_जागर #सावित्री #सावित्री_संघटना #एम्स_सोलापूर #एशिअन_पोस्ट

Address

Walsang
413228

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIMS - Asian innovative Modern School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category