Vrundavan Agro Hytec Nursery

Vrundavan Agro Hytec Nursery सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची 100% खात्?

🌱 शेतकरी मित्रांनो नमस्ते 🙏आजच्या या फोटोमध्ये दिलेला फॉर्म्युला पाहिलात का? 👇अंडी 🥚 + लिंबाचा रस 🍋 + दूध 🥛 + ग्लुकोंडी ...
07/05/2026

🌱 शेतकरी मित्रांनो नमस्ते 🙏
आजच्या या फोटोमध्ये दिलेला फॉर्म्युला पाहिलात का? 👇
अंडी 🥚 + लिंबाचा रस 🍋 + दूध 🥛 + ग्लुकोंडी यांचा हा जबरदस्त नैसर्गिक संगम आहे!
👉 कोणतीही पिकाची लागवड केल्यानंतर
👉 पहिलं ड्रेचिंग म्हणून हा फॉर्म्युला वापरला तर
👉 12 ते 24 तासात परिणाम दिसायला सुरुवात होते!
💧 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण:
10 ते 15 अंडी
10 लिंबांचा रस (अंड्यात मिसळून हलवा)
5 लिटर दूध
1 किलो ग्लुकोंडी
👉 सर्व साहित्य एकत्र करून चांगले हलवा आणि हे मिश्रण 200 लिटर पाण्यात टाका.
🌿 वापरण्याची पद्धत:
रोपांना पहिलं ड्रेचिंग म्हणून द्या.
🔥 फायदे:
✔️ मुळांची वाढ जलद होते
✔️ रोपांची ताकद वाढते
✔️ पाने हिरवीगार व तजेलदार राहतात
✔️ रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✔️ उत्पादनात लक्षणीय वाढ
💬 शेतकरी मित्रांनो, हा फॉर्म्युला इतका प्रभावी आहे की
तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
💪 कमी खर्चात जास्त परिणाम देणारा हा उपाय
नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा!

#ड्रेचिंग #शेतीमाहिती #नैसर्गिकशेती #कमीखर्चशेती #शेतकरी 🌱

Contact number-9423859244
19/11/2025

Contact number-9423859244

ग्रीन रॉक कोबी
28/10/2025

ग्रीन रॉक कोबी

 #नारळ_लागवड:- #जमीन:- नारळ लागवडीसाठी एक मीटर खोलीची पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी रेताड मुरमाड जमीन असेल तर खड्ड्या...
26/09/2025

#नारळ_लागवड:-
#जमीन:- नारळ लागवडीसाठी एक मीटर खोलीची पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी रेताड मुरमाड जमीन असेल तर खड्ड्यात तळाला एक दोन टोपली चांगली माती टाकावी, अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक दोन टोपल्या वाळू टाकावी. तसेच वालुकामय जमीन असेल तर खड्ड्याच्या तळाशी पाणी धरून ठेवण्यासाठी नारळाच्या शेंड्याचा थर द्यावा.
#अंतर:-नारळ लागवड करत असताना दोन झाडांमधील अंतर हे साधारण २० फूट ठेवावे व बुटक्या जातीसाठी हे अंतर 16 फूट असावे.
#खड्डा:- 1 मीटर बाय 1 मीटर अंतराचे खड्डे खोदावेत खड्डे खोदण्याचे काम लागवडीच्या अगोदर एक महिना करावे. खड्डा भरून घेताना वरती दिल्या प्रमाणे जमिनीच्या प्रतवारीनुसार नियोजन करावे.
खड्डा भरत असताना त्यामध्ये प्रथम दहा किलो शेणखत टाकावे नंतर दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे व 50 ग्रॅम फाॅलीडॉन पावडर मातीत मिसळावी. जमीन सपाट असेल तर खड्डा पूर्ण भरून घ्यावा.
लागवड:- नारळाची लागवड करताना योग्य ती जात निवडून रोपे ही एक ते दीड वर्ष वयाची निवडावीत जास्त मोठी झाडे लागवड करण्यासाठी निवडू नये. रोपे जोमदार व निरोगी असावे रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. आपण जो खड्डा घेतला आहे त्यामध्ये बरोबर मध्यभागी रोप जमिनीपासून 30 ते 40 सेंटीमीटर खाली राहील असे लावावे, रोपांच्या बाजूची माती घट्ट दाबून घ्यावी व रोप हलू नये यासाठी बांबूच्या काठीचा आधार द्यावा. रोपांच्या कोंबात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
#आमच्याकडे_मिळणाऱ्या_नारळाच्या_विविध_जाती :-
१) लोटन २) बोना ३)मलेशियन ग्रीन डॉफऀ ४) मलेशियन ऑरेंज डॉफऀ ५) मलेशियन यल्लो डॉफऀ ६) गंगा बोडम ७) ग्रीन डॉफऀ ८) D&T ९) बानोली

लागवडीनंतर दहा दिवसांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी

लागवडीनंतर 25 दिवसांनी
100 ग्रॅम 10:20:26 NPK किंवा
100 ग्रॅम 18:46:00 DAP
वरील खते द्यावीत

लागवडीनंतर चाळीस दिवसांनी
Triacantarol 3 ml एक लिटर पाण्यातून फवारणी करावी.

झाडाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी
GA - 1 ग्रॅम 5 लिटर पाण्यात याप्रमाणे प्रमाण घेऊन दर पंधरा दिवसाच्या अंतराने झाडावरती फवारणी करावी.

पाऊस व दलदलीचे वातावरण असेल तर
काॅपर ऑक्सी क्लोराईड - 2 ग्रॅम एक लिटर पाणी याप्रमाणे प्रमाण घेऊन झाडावरती फवारणी करावी.

्यवस्थापन:- नारळाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र स्फुरद पालाश या अन्नद्रव्याची गरज असते झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर 30 सेंटीमीटर रूंदीचा व 15 सेंटिमीटर खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत व चर बुजवावा रोपे जशी मोठी होतील तसा चर बुंध्यापासून दूर काढावा.
नारळाला फळे येण्यास सुरुवात झाल्याच्या नंतर वर्षातून तीन वेळा खते द्यावीत.
वर्ष शेणखत नत्र स्फुरद पालाश
1 - 10kg 200g 100g 200g
2 - 20kg 400g 200g 400g
3 - 30kg 600g 300g 800g
4 - 40kg 800g 400g 800g
5 - 50kg 1kg 500g 1kg

#पाणी_व्यवस्थापन-: नारळाच्या झाडासाठी पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे झाडांना नियमित पाणी दिले तर उत्पादन चांगले वाढते काही ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर झाडांना पाणी दिले जात नाही परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही. हिवाळ्यात व उन्हाळ्यात पहिली तीन ते चार वर्ष आठवड्यातून चार वेळा झाडांना पाणी द्यावे, झाडांच्या खोडाजवळ पाणी साचणार आहे याची काळजी घ्यावी. पहिल्या वर्षी दिवसाआड पाणी द्यावे झाडे मोठी झाल्यावर दर चार दिवसांनी हिवाळ्यात 200 लिटर तर उन्हाळ्यात 240 लिटर पाणी द्यावे.
🌳!!अन्नदाता सुखी भव!!🌳

🌴वृंदावन ऍग्रो हायटेक नर्सरी🌴
मु.पो. केंजळ ता.वाई, जि. सातारा

नाते विश्वासाचे एक वेळ अवश्य भेट दया.
🍋🍊🥭🍑🍒🥑🥝🍎🍏🍇🧅

राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी रोपांपासून ...
22/08/2025

राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी रोपांपासून ते लागवडीपर्यंतच्या सर्व खर्चावर टप्प्याटप्प्याने १००% अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे पिकांमधून आणि फळबागेतून सतत कमाई होऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे.

12/04/2025

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

ऊस लागवड, एकरी लागणाऱ्या रोपांची संख्या किती असते, लागवडीचे अंतर किती असते, एकरी लागणारी रोपे किती असतात आणि १ गुठ्याला ...
16/01/2025

ऊस लागवड, एकरी लागणाऱ्या रोपांची संख्या किती असते, लागवडीचे अंतर किती असते, एकरी लागणारी रोपे किती असतात आणि १ गुठ्याला किती रोपे लागतात ?

#ऊस #ऊसशेती

फेब्रुवारी महिन्यात लागवड करण्यासाठी पाच प्रमुख भाज्या:1️⃣ तूर- लागवड:  सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते; जिवाणूयुक्त ना...
16/01/2025

फेब्रुवारी महिन्यात लागवड करण्यासाठी पाच प्रमुख भाज्या:

1️⃣ तूर
- लागवड: सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते; जिवाणूयुक्त नाल्यातही पेरणी शक्य.
- हवामान: उष्ण आणि दमट हवामान आवश्यक.
- महत्त्व: फेब्रुवारी हा तुरीसाठी योग्य महिना. कोरड्या कडधान्याच्या बियांपासून तेल काढता येते आणि याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत.
- बाजार: मागणी जास्त असल्यामुळे उत्पन्न फायदेशीर.

2️⃣ कारले
- लागवड: जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत शक्य; चांगला निचरा होणारी चिकणमाती जमीन सर्वोत्तम.
- हवामान:दमट व समशीतोष्ण हवामान योग्य.
- महत्त्व: फेब्रुवारीमध्ये लागवड केल्यास चांगले उत्पादन व नफा मिळतो.

3️⃣ मिरची
- लागवड: खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त.
- पेरणीचे महिने: खरीप - मे ते जून; रब्बी - सप्टेंबर ते ऑक्टोबर; उन्हाळी - जानेवारी व फेब्रुवारी.
- महत्त्व: फेब्रुवारीत लागवड केल्यास उन्हाळी मिरचीचे उत्तम उत्पादन मिळते.

4️⃣ भोपळ
- लागवड: डोंगराळ व सपाट भागात सहज करता येते.
- हवामान: उष्ण व दमट हवामान आवश्यक.
- तयारी: बियाणे २४ तास पाण्यात भिजवून पेरल्यास उगवण प्रक्रिया वेगाने होते.
- महत्त्व: फेब्रुवारी हा भोपळ्यासाठी आदर्श महिना.

5️⃣ भेंडी
- लागवड: फेब्रुवारी-एप्रिल, जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हे मुख्य हंगाम.
- महत्त्व: भारतीय बाजारपेठेत भेंडीला मोठी मागणी. फेब्रुवारीत लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.

शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारीत या भाज्यांची लागवड करा आणि बाजारात चांगले उत्पादन विकून नफा मिळवा!

भारतीय कृषी माल निर्यातीसाठी उपलब्ध बाजारपेठ...
13/01/2025

भारतीय कृषी माल निर्यातीसाठी उपलब्ध बाजारपेठ...

शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यात कोणती भाजी लावावी याची माहिती...   #भाजी
30/12/2024

शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यात कोणती भाजी लावावी याची माहिती...

#भाजी

🌱वांगी लागवड तंत्रज्ञान 🌿वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प...
22/11/2024

🌱वांगी लागवड तंत्रज्ञान 🌿

वांगी पिकाबाबत महत्त्वाचे :
वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे. वांग्याचे मूळस्थान भारत असून, बहुतेक सर्व राज्यांत त्याची लागवड केली जाते. भारतात प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व अन्य राज्यांत वांग्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात विविध भागांत आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत. अ.नगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात.
जातींची निवड करताना : प्रामुख्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारा तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते. हा वाण भरपूर उत्पादन देणारा, रोग-कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तेथील हवामानाशी मिळते-जुळते घेणारा असावा. लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत.

हवामान : या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकाला अनुकूल नाही. अशा हवामानात कीडी-रोगांचा फारच उपद्रव होतो. सरासरी १३ ते २१ अंश सेल्सियस तापमानात हे पीक चांगले येते. महाराष्ट्रातील हवामानात जवळपास वर्षभर वांग्याचे पीक घेता येऊ शकते. जमीन : चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

लागवडीचा हंगाम : महाराष्ट्रातील हवामानात तिन्ही हंगामात लागवड करता येते. खरीप हंगामासाठी पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामात पेरणी सप्टेंबरअखेर करतात आणि रोपे ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये लावतात. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.
बियाणे प्रमाण : कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्‍टरी ४०० ते ५०० ग्रॅम बी पुरेसे होते. जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी हेक्‍टरी १२० ते १५० ग्रॅम बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम थायरम चोळावे.
रोपवाटिका :
वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे साधारणतः ३ बाय २ मीटर आकाराचे करून गादी एक मीटर रुंद व १५ सेंमी उंच करावी. प्रति वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकावे व २०० ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्यात समप्रमाणात पाणी मिळेल असे पाहावे. प्रति वाफ्यात मर रोगाच्या नियंत्रणासाठी ३० ते ४० ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड वापरावे.
वाफ्याच्या रुंदीस समांतर १० सेंमी अंतरावर खुरप्याने १ ते २ सेंमी खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. त्यानंतर पाटाने पाणी द्यावे. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया आणि १५ ते २० ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाहून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी १० दिवसांच्या अंतराने शिफारसीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.
लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्याआधी एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीसाठी ५ ते ६ आठवड्यांत तयार होते. रोपे १२ ते १५ सेंमी उंचीची झाल्यावर लागवड करावी.

रोपांची लागवड : लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे पाडावेत. हलक्‍या जमिनीत ७५ बाय ७५ सेंमी लागवडीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातींसाठी ९० बाय ९० सेंमी अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी ९० बाय ७५ सेंमी व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी १०० बाय ९० सेमी अंतर ठेवावे.
खत व्यवस्थापन :
जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतमात्रांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मध्यम काळ्या जमिनीसाठी हेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
आंतरमशागत :
खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. वेळोवेळी खुरपणी करावी. पाणी नियोजन जमीन व हवामानानुसार करावे. खरिपातील पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोपलावणीनंतर त्वरित पाणी द्यावे. दुसरे पाणी ३ ते ४ दिवसांनी द्यावे. हिवाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याचा काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देऊ नये. वेळच्या वेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.
संजीवकांचा वापर : संजीवकांचा वापर करून फळधारणा वाढविण्यासाठी २, ४- डी आणि एनएए (नॅप्थिल ॲसिटीक ॲसिड) ही दोन संजीवके उपयुक्त आढळली आहेत. वांग्याचे बी २, ४- डी च्या पाच पीपीएम द्रावणात २४ तास भिजवून मगच पेरावे. किंवा २, ४- डी चे दोन पीपीएम द्रावण फुले येणे सुरू झाल्यावर ६० ते ७० दिवसांपर्यंत एक आठवड्याच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारावे.
पीक संरक्षण :
किडी : तुडतुडे, मावा, पांढरीमाशी, कोळी, शेंडा व फळे पोखरणारी अळी आदी. रोग : विषाणुजन्य रोग किंवा पर्णगुच्छ, मर आदी. काही लक्षणेः तुडतुडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. हे कीटक पर्णगुच्छ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करतात. मावा किडीमुळे पाने पिवळी पडतात व चिकट होऊन काळी पडतात. लाल कोळी या किडीमुळे पाने पांढरट पडतात. तसेच पानावर जाळे तयार होते आणि झाडाची वाढ खुंटते.
एकात्मिक कीड नियंत्रण :
लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लागवड करू नये. कारण या शेतात सूत्रकृमीची वाढ झालेली असू शकते.
रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात फोरेट १० ग्रॅम टाकावे. (१ बाय १ मीटर वाफा). तसेच रोपांवर डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली किंवा कॉर्बोसल्फान १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे.
पुनर्लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्‍लोप्रीड १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवावीत व नंतर लावावीत.
लागवडीनंतर ४५ दिवसांनी तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमिथोएट १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन अधिक ट्रायझोफॉस हे संयुक्त कीटकनाशक १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. तसेच चार टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन (२५ टक्के प्रवाही) ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डायकोफॉल २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
काही महत्त्वाच्या किडी :
वांग्यावर विशेषतः शेंडा व फळे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. अळी प्रथमतः झाडावर फळे नसताना कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. फळे लागल्यावर त्यात शिरून आतील भाग खाते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडीमुळे फळांचे ४० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत किडीचे प्रमाण ५० ते ७० टक्के असू शकते. वांग्यावरील पर्णगुच्छ रोगामुळे पानाची वाढ खुंटते. ती लहान आणि स्थानिक भाषेत बोकडल्यासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा सूक्ष्मजीवामुळे (मायकोप्लाझ्मा) होतो. त्याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो. काही वेळा विशेषतः पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो.
विशेष नियोजन :
रोपवाटिकेतच रोपांची काळजी घ्यावी. तसेच तुडतुड्यांचे नियंत्रण करावे म्हणजे या रोगाचा प्रसार होणार नाही. १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
१० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार व सल्ल्याने पुढील फवारण्या घ्याव्यात.
रोगट झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत.
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा अशा प्रतिकारक पिकांची फेरपालट करावी. उन्हाळ्यात दोन- तीन वेळा जमिनीची नांगरट करून जमीन तापू द्यावी. तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
मर रोग जमिनीतील फ्युजारीयम बुरशीमुळे होतो. झाडाची खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते. हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यामुळे पीक फेरपालट करणे, निरोगी झाडांचे बी वापरणे तसेच कॉपर ऑक्‍सीक्‍लोराइडसारख्या बुरशीनाशकाचे ड्रेचींग करणे यासारखे उपाय योजावेत.
काढणी : योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळांची तोडणी योग्य वेळी होणे आवश्‍यक आहे. फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग आल्यावर काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते आणि जून झालेली फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. किडलेली वांगी बाजूला काढावीत. वांग्याचा आकार आणि रंगानुसार प्रतवारी करावी. तोडणीनंतर फळे बाजारात पोहचेपर्यंत त्यांचा चमकदारपणा टिकून राहील अशा पद्धतीने पॅकिंग करावे.

उत्पादन : जातीपरत्वे सरासरी उत्पादन हेक्‍टरी २०० ते ३०० क्विंटलपर्यंत मिळू शकते. काही संकरित जातींचे ४०० ते ५०० क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळू शकते. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी रोपवाटिका ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थित काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पादन मिळू शकते.

साठवणूक : सर्वसाधारण तापमानात हिवाळ्यात काढलेली फळे तीन-चार दिवस चांगली राहू शकतात. मात्र उन्हाळ्यात एक-दोन दिवसांपेक्षा ती जास्त चांगली राहू शकत नाहीत. शीतगृहात ७.२ ते १० अंश सेल्सियस तापमान आणि ८५ ते ९५ टक्के आर्द्रता असल्यास वांगी एक आठवडाभर चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात.

- डॉ. कैलास शिंदे, डॉ. मधुकर भालेकर, डॉ. भरत पाटील.. (लेखक अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)

#शेतकरी #शेती #वांगी

Address

Wai-Surur Road, Kenjal
Wai
415536

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrundavan Agro Hytec Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share