31/12/2017
नमस्कार मित्रांनो ,
मी उद्धव येडू मनाळ.
वाहेगांव सारख्या मोठ्या गावामध्ये संगणक साक्षरतेचा प्रसार व्हावा व लोक जगाशी जोडले जावेत तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे संगणक प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने दि . १ जानेवारी २०१७ रोजी वाहेगांव मध्ये गायत्री कंप्यूटर्स नावाने संगणक प्रशिक्षण संस्था सुरु केली.
बघता बघता आज या संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मनातील काही विचार तुमच्याशी शेअर करावे असं वाटलं.
सुरवातीला थोडासा त्रास झाला, एकवेळ मनात असा विचार आला की, उगाच आपण चांगली नोकरी सोडून गावाकडे आलो, पण हळू हळू गावाचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत गेला. रोज नव नवीन ओळखी वाढत गेल्या, नवीन लोकांच्या भेटी होत गेल्या काही सम व्यावसायिक भेटले त्याचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. गावातील माझ्या मित्रांचीही चांगली साथ भेटली.
मी ज्या शाळेत पहिली ते बारावी शिक्षण घेतेले, त्या माझ्या शाळेनेही मला खूप मदत केली, शाळेच्या प्राचार्या, प्रायमरी, हायस्कुल, व कॉलेज चे शिक्षक गुरुजन, यांचेही वेळोवेळी खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.
आज गायत्री कंप्यूटर्स मध्ये MS CIT, Tally, MS Office, Typing, Spoken English यासारखे कोर्स घेतले जातात, या वर्षांत ९५ विद्यार्थ्यानी MS CIT, Tally चे तसेच ४०विद्यार्थ्यानी MS Office चे यशस्वी प्रशिक्षण घेतले त्यामध्ये काही कृषी अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, असेही विद्यार्थी भेटले. वाहेगांव बरोबरच नेवरगांव, गाढे पिंपळगांव,नागमठाण, घोगरगांव, वरखेड, मुद्देश वाडगांव, मांजरी या गावांमधील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
आज आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गायत्री कंप्यूटर्स च्या रूपाने एक प्रशस्त अशी संगणक लॅब तसेच पूर्णवेळ लाइट व इंटरनेट ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक रविवारी सरावासाठी लॅब उघडी असते.
शेवटी एवढचं सांगु इच्छितो की, चांगलं व दर्जेदार शिक्षण आता आपल्याच गावामध्ये उपलब्ध आहे व त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
धन्यवाद... !!!
संपर्क
गायत्री कंम्पूटर्स
संत सावता माळी मंदिराजवळ,
वाहेगांव.
फोन नं :- 96 89 37 37 02,
97664 25664.