24/04/2020
आता खरच निसर्गालाच *माणूस* नकोसा झाला अस वाटतय.
कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.
सगळीकडे *नद्या* स्वच्छ होत आहेत.
हवा शुद्ध वहात आहे.
पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.
कुठे मंदिरातील *घंटा* आता वाजत नाही.
मस्जीद मधील *अजाण* नाही.
चर्च मधिल सामुहिक *प्रार्थना* नाही.
कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.
कुणाला आता *मंगळ* नाही.
कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.
स्मशानात कुठलेही विधी नाही.
पिंडदान नाही.
कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.
आता *कालसर्पाची* पुजा बंद आहे.
*नवग्रहाची* शांती बंद आहे..
आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..
तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.
निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...
तो आता एकच म्हणतो... *नैसर्गिक पणे राहा...*
*माणूसकीने वागा...*
*बघा विचार करा. 🙏*