06/09/2018
शिक्षक दिनानिमित्त माझ्या नंदाखाल शाळेतील सर्व शिक्षकांना व या गृपवरील सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा !
=========================
काळीज नाचु लागले,
हृदयाच्या ठोक्यावर
जेव्हा पाहिले मी तिला,
वर्गात पहिल्या बाकावर
त्रिभुवन सर शिकवू लागले,
इतिहासातले राजे
पहिल्या बाकावरच्या राणी कड़े,
तेव्हा लक्ष होते माझे
नंतर दाखवू लागले जोशी सर,
भुगोलाचे नकाशे
अक्षवृत्त रेखावृत्तातुन ,
तिच्याकडेच लक्ष जरासे
मग याकूब सर शिकवू लागले
राष्ट्रभाषा हिंदी
तेव्हा 'ती'च्या पुढे सारे,
मला वाटू लागले चिंधी
मराठे सर आले मग,
तास होता पीटी
यादरम्यान वाढू लागल्या,
आमच्या भेटीगाठी
पत्कीसर बोलले,
पाठ करा बीजगणिताची सूत्र
होकार दिला 'ती'ने मला,
मी घातले मंगळसूत्र
मग शिकवू लागले बीबीसर,
प्रमेयाची भूमिति
होतो प्रणयात तेव्हा
मी आणि ती
ऊषा मॅडम दाखवू लागल्या
विज्ञानाचे प्रयोग
तेव्हा झाला होता आम्हाला,
पहिला पुत्रयोग
मेलोरा सिस्टरचे इंग्लिश ग्रामर,
कधी कळाले नाही फारसे
तेव्हा चालु होते आमच्या
दुसरया मुलाचे बारसे
परेरा बाई शिकवू लागल्या,
मराठीचे व्याकरण
तेव्हा वाढू लागलीआमची
भांडणे विनाकारण
एमेम सरांच्या समाजसेवेची कधीच नव्हती ओढ़
आता ठरवलं आम्ही,
घ्यायची काडी मोड़
सर्वात शेवटी तास,
कंटाळवाणा कार्यानुभव
आख्या संसाराचा घेतला,
मी स्वप्नात अनुभव
प्रगतिपुस्तकात दिसले,
सा-या स्वप्नाचे पुण्य
कुठे तीन चार
तर कुठे मार्क शून्य
प्रगतिपुस्तक पाहून,
बापाने दिली नाकावर
तेव्हा पासून पाहत नाही, पहिल्याच काय,,
कुठल्याच बाकावर!
[कवि गणेश मिरगुले]
(मी फक्त शिक्षकांची नावे बदलली आहेत - सॅबी)
-- Saby Pereira