Zilla Parishad High school, Vaijapur

Zilla Parishad High school, Vaijapur This is a dedicated page for Z.P. High School, Vaijapur. Those who studied there can join and share...

01/03/2021
14/11/2019

शिक्षक काय असतात हे आपल्याला हा व्हिडिओ बघून कळेल...👌👌

●आमचा शाळेतल्या मित्रांचा एक ग्रुप आहे. आज सकाळीच त्यात एक बातमी आली. गुरूलिंगअप्पा मिटकरी सर गेले...मन थेट १९८५-८६ मध्य...
08/01/2019


आमचा शाळेतल्या मित्रांचा एक ग्रुप आहे. आज सकाळीच त्यात एक बातमी आली. गुरूलिंगअप्पा मिटकरी सर गेले...
मन थेट १९८५-८६ मध्ये गेलं. वैजापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवी, नववीला असताना मिटकरी सर इंग्रजी शिकवायचे. सिलॅबस तर शिकवायचाच पण इतर गोष्टीमधूनही इंग्रजी कसं शिकता येतं हे त्यांच्यामुळं कळालं. इंग्रजी फक्त वाचता आणि लिहिता येऊन कामाचं नाही हे त्यांचं म्हणणं असे. आमच्या शाळेच्या मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धा होत. गावोगावच्या टीम यायच्या. या स्पर्धेत कॉमेंटरी बॉक्स असे. स्कोअररच्या शेजारी बसून शेख सलीम, धोंडीरामसिंह ठाकूर ही मंडळी मराठी आणि हिंदीतून कॉमेंटरी करत. मिटकरी सर त्यांना सांगून मला तिथे इंग्रजीत कॉमेंटरी करायला लावत. त्यांनी ऐकली की मग ते चुका सांगत. क्रियापद कसं चुकलं, वाक्यरचना कशी हवी होती असं अप्लाईड इंग्लिश शिकवायचे. कळत नकळत माझी इंग्रजीची भीती नाहीशी झाली, ती त्यांच्यामुळेच. दादांना म्हणजे माझ्या वडिलांना ते आवर्जून सूचना करत की, "याला इंग्रजी पेपर वाचण्याची सवय लावा. डिक्शनरी घेऊन वाचायला लावा. अगदी नुसती डिक्शनरीही वाचायला लावा" हे सगळे प्रयोग त्याबरहुकूम आमच्या घरात झाले. हे असं इंग्रजी कशासाठी शिकायचं हे कळायची अक्कल त्या वयात नव्हती. आता त्याचं महत्व आणि मोल कळतं...
मिटकरी सरांचा इंग्रजीचा तास हा फक्त इंग्रजीचा तास नसायचा. ते त्यात मराठी पण शिकवायचे. आमच्यापैकी कुणीतरी विचारे,"सर, पाणी प्यायला जाऊ का?" पाणी पिऊन आल्यावर ते विचारत,"हं, सांग काय केलं?" त्यावर उत्तर यायचं,"सर पाणी पिलो" हे ऐकताच ते म्हणत," पिलो काय पिलो? प्यालो.. म्हणा मी पाणी प्यालो" असे मराठीचे शिक्षणही त्यांच्याकडून मिळायचं...
शाळा संपली. सगळे शिक्षणासाठी पांगले. नंतर नोकरी-व्यवसायासाठी आणखी पांगले. मिटकरी सरही रिटायर झाले. आम्ही मित्र जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा शाळेच्या आठवणी निघतात, सगळ्या सरांच्या आठवणी निघतात. "पिलो काय पिलो? प्यालो..." असं म्हणत मिटकरी सरांची आठवण निघतेच निघते... आता त्यांची भेट होणार नाही. उत्तम इंग्रजी आणि सोबत मराठी शिकवल्याबद्दल त्यांना एकदा मनापासून थँक यू म्हणायचं होते ते राहून गेलं.. आता एखाद्या अवघड शब्दाचा अर्थ डिक्शनरीत शोधताना सर आठवत राहतील...

मनापासून थँक यू सर !
मिस करणार तुम्हाला नेहमी...

हे खूप वाईट आहे... आपण सारे विचार करू या काय करता येईल त्याचा
29/12/2017

हे खूप वाईट आहे... आपण सारे विचार करू या काय करता येईल त्याचा

आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक  प्रभाकर मोहनीराज काळे ( वय  ७६ वषेॕ  ) यांचे आज(दि. 27 ऑक्टोबर)  दीर्घ आ...
27/10/2017

आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मोहनीराज काळे ( वय ७६ वषेॕ ) यांचे आज(दि. 27 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले , ४ मुली , सुन , जावई , नातवंडे असा परीवार आहे. त्यांच्या वैजापुर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय वायुदलातील वरीष्ट अधिकारी मनोज काळे यांचे ते वडील होत. दिवाळी दरम्यान त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याने औरंगाबादला आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. पक्षाघाताचा (paralysis) झटका आला. शिवाय एकेक अवयव निकामी होत गेला. त्यांना शेवटी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

29/01/2017

आपली शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत .गेली काही वर्ष सातत्याने मुलांची संख्या कमी होत आहे.आपण प्रयत्न करू शाळा सुरु राहिल याचा.काही सुचना असतील तर स्वागत.

05/09/2016

5 सप्टेंबर शिक्षक दिन

विसरलो नाही मी ती
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून ?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे उभे एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
सहा आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार ?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
मग मात्र आठवणीने
पापणी थोड़ी ओलावते !

तमाम गुरुजनांना प्रणाम व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Address

Vaijapur
423701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad High school, Vaijapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category