19/03/2024
आनंद इंटरनॅशनल स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 18 मार्च 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या मुलांनी विविध विषयावर सुंदर सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी सादरीकरणात भाग घेणाऱ्या विद्यार्थांना आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आनंदीबाई अन्नदाते व आनंद शैक्षणिक संस्था समूह व रुग्णालयाचे संस्थापक संचालक डाॅ. अमोल अन्नदाते यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.