The M.C.High school

The M.C.High school The M.C.High School. (Maharani chimanabai High School) was establishded in 11th November 1911. It is High School. The school Started functioning in November 1911.

Since 1909 there were Complaints in the city about Marathi high school, because there are number of schools in the city and the Marathi medium people could not get admission there. The way out was to add to the Marathi medium classes in the government school or to start a new school. But this could not happen, the way to was to start a new school. A few leading magnates of the Baroda city headed by the late chief Justice Bhausaheb Gokhale took the momentous decision of providing schooling facilities to the Marathi medium pupils by opening a small school known as M.C.

16/06/2021

कणा -

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

कुसुमाग्रज..

14/06/2021
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहोआणि तुम्हा सर्वां...
18/10/2020

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, COVID -19 कोविड - १९ शी लढ़ न्याचि शक्ति देवो हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.....

 #वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक हाताला मानाचा मुजरा 🙏
30/03/2020

#वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक हाताला मानाचा मुजरा 🙏

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धान्य ऐकतो मराठीधर्म, पंथ,जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय  मानतो मराठीमराठी अ...
27/02/2018

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी. मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा💐💐

31/01/2018

प्रिय शाळेस...

ओळखलस का मला... एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी... तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली... पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे... कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही...

१० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं... आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार... या कल्पनेनच मी सुखावलो होतो...

पण तुला सांगू का... या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय...

मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय...
पाठीवर दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय...
ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायचीय...
आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय...

विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहायचेत...
बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत...
मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय...
आणि हो मराठीचं व्याकरण, संस्कृतातली सुभाषितं सुद्धा शिकायचीत...

मधल्या सुट्टीतला पोषण आहार, आणि मित्रांचा डबा खायचाय...
पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय
ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत...
आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून तबलाही वाजवायचाय...

स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय...
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय...
निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचाय...
आणि, नाट्यवाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय...

विज्ञान प्रदर्शनासाठी एक ‘भन्नाट’ प्रकल्प करायचाय...
शरद मल्हार महोत्सवात समूहगीत गायचंय...
वार्षिक स्नेहसंमेलनात नाच करायचाय...
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एकदो करतही चालायचय...

सहलीला जाऊन नुसती धम्माल करायचीय...
परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचाय...
आणि पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...

खरतरं मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूणच क्षणांची पुनरावृत्ती करायचीय... तुझ्या सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत... यासाठी तू मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?

निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापक सर म्हणाले होते “तुमचे शाळेतले दिवस हे सुवर्णाक्षरात कोरलेले दिवस आहेत.. कितीही किंमत मोजलीत तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
त्यामुळं तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाहीत... याचीही मला अगदी पुरेपूर जाणीव आहे...

पण, मला तुझे मनापासून आभार मानायचेत... या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस... माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास... माझ्यात जे काही चांगल आहे हे तुझ्याचं संस्कारांचं देण आहे... आणि याकरिता मी तुझा सदैव कृतज्ञ राहील...

माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...

तुझा आजन्म ऋणी असलेला
एक माजी विद्यार्थी

माझ्या प्रिय शाळेला 106 व्या वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....धावत धावत जाऊ...
11/11/2017

माझ्या प्रिय शाळेला 106 व्या वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....

धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...

कितिहि जङ असु दे....
जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...
वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,कितिहि तुटका असु दे...

ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहे का हे गरुजींना वीचारायला...

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...

माझी शाळा.....
11/11/2017

माझी शाळा.....

आज संध्याकाळी 7 वाजता ' स्नेहमेळावा '
07/11/2017

आज संध्याकाळी 7 वाजता ' स्नेहमेळावा '

तुलशी विवाह चा हार्दिक शुभकामना आप सर्वाला देव दिवाली चा हार्दिक शुभकामना
04/11/2017

तुलशी विवाह चा हार्दिक शुभकामना
आप सर्वाला देव दिवाली चा हार्दिक शुभकामना

!! भाऊबीज !!​जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !!!!! ​भाऊबीज च्या ...
21/10/2017

!! भाऊबीज !!​
जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे !
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !!!!!
​भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा..!!​

Address

Salatwada
Vadodara
390001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The M.C.High school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The M.C.High school:

Shortcuts

Share

Category