24/02/2014
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 32 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत प्रकल्प संचालक –संशोधन (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), प्रकल्प संचालक-स्पर्धा परीक्षा कोचिंग (1 जागा), प्रकल्प संचालक-जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (2 जागा), सहायक प्रकल्प संचालक - जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (3 जागा), मुख्य प्रकल्प संचालक-कौशल्य विकास (1 जागा), मुख्य विधी सल्लागार (1 जागा), वरिष्ठ संशोधन अधिकारी (2 जागा), संशोधन अधिकारी (6 जागा), संशोधन सहायक (6 जागा), प्रकल्प व्यवस्थापक- पडताळणी समिती (8 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 21 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 75 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत निबंधक (15 जागा), संशोधन अधिकारी (15 जागा), संशोधन सहायक (15 जागा), व्यवस्थापक (15 जागा), रेकॉर्ड किपर (15 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कार्यालयात 6 जागा
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक-संपादणूक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या दि. 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात 27 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात संपादणूक तज्ञ (1 जागा), वित्तीय तज्ञ (1 जागा), पर्यावरण व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), ज्ञान व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), समाज व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (१ जागा), माहिती तंत्रज्ञान तज्ञ (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), सहाय्यक व्यवस्थापन माहिती तज्ञ (1 जागा), सहाय्यक माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ (1 जागा), सहाय्यक क्षमता व बांधणी तज्ञ (1 जागा), निम्न व्यावसायी-डाटाएन्ट्री ऑपरेटर (12 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन (1 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-पाणी पुरवठा (1 जागा), समन्वयक-पाणी गुणवत्ता (१ जागा), माहिती विश्लेषक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in व https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी केंद्रात चौकीदारची 1 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी या केंद्रात चौकीदार (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी 4 जागा
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), स्टोअरकिपर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://afk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत 13 जागा
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेची घोषणा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय अर्थ सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय अर्थ सेवातील 15 जागा व भारतीय सांख्यिकी सेवेतील 23 जागांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 35 व तलाठीच्या 41, वाहनचालकाच्या 5 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (35 जागा), तलाठी संवर्ग (41 जागा), वाहनचालक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारीच्या ४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारी (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षकाच्या ६ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सांख्यिकी सहायकाच्या 1 जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्थ व सांख्यिकी उपसंचालकाच्या 10 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालक-अर्थ व सांख्यिकी संचालनालय (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गृह विभागातील अधिक्षक- तुरुंग उद्योग पदाच्या 1 जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह विभागातील कारागृह महानिरीक्षणातील अधिक्षक- तुरुंग उद्योग (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत सहायक निरीक्षक चित्रकला व शिल्प पदाच्या 2 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कला शिक्षण सेवेतील सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (2 जागा), प्राध्यापक- संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागा
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा ५ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील उपसंचालक-आरोग्य सेवा (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या १७६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्रशासकीय अधिकारी (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात 4 जागा
पुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर व वाहनचालकाच्या एकूण 1729 जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर (1023 जागा), कंत्राटी वाहनचालक (706 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.pmpml.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1) http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org (3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये 100 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये वाहन यांत्रिकी (1 जागा), सफाईवाला (2 जागा), कनिष्ठस्तर लिपिक (4 जागा), क्लिनर (3 जागा), स्वयंपाकी (3 जागा), सिव्हिलीयन वाहन चालक (86 जागा), तारपोलिन मेकर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 376 जागा
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मुंबई विमानतळावर रॅम्प सर्व्हिस एजंट/रॅम्प सर्व्हिस एजंट-एलजी (124 जागा), युटिलिटी कम रॅम्प ड्रायव्हर (100 जागा) तसेच कोलकत्ता विमानतळावर कनिष्ठ ग्राहक एजंट (97 जागा), युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (55 जागा) या जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 7 ते 22 फेब्रुवारी 2014 या दरम्यान होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटरच्या 7 जागा
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या नागपूर येथील केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटर- ड्रिलिंग (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.