18/08/2026
" पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न . "
संकुलात भावगीत-भक्तिगीत, देशभक्तीपरगीत गायन स्पर्धांचे आयोजन. .
उत्तूर, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ :-
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या संकुलात विविध उपक्रमांनी भारतीय ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बसवराजआण्णा करंबळी यांचे शुभहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भावगीत-भक्तीगीत व देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धांचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी माननीय श्री सुरेश मुरगुडे, कार्यकारी संचालक माननीय प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, संचालक माननीय डॉ. व्ही.एम्. पाकले , माननीय श्री विनायक करंबळी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ ली ते १०वीच्या गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये ४४ विद्यार्थ्यांनी विविधगीते तालासुरात सादर करून तब्बल चार-साडेचार तास गायनाची मैफील सादर करून राष्ट्रभक्ती, ईश्वरभक्ती, मानवी भावभावनांचा आविष्कार करून चैतन्य आणले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मानवंदना, संचलन शिस्तबद्ध होते. गीतमंच पथकाने राष्ट्रगीत ,ध्वजगीत, महाराष्ट्र राज्यगीत वाद्यांच्या तालासुरात सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण जागृत केले. राष्ट्रध्वज प्रतिज्ञा, नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा श्री जी. एन्. भांदुगरे यांनी दिली. श्री एम्. एल्. काकडे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात विकसित भारत २०४७ मध्ये आजचे विद्यार्थी व भावी युवापिढीचे योगदान अपेक्षित केले. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती व उद्योगधंदे यांचे देश विकासातील महत्त्व त्यांनी विशद केले .
भावगीत-भक्तीगीत गायन स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
इयत्ता १ ली ते ४ थी गट : - प्रथम- हर्षवर्धन पाटील ; द्वितीय- कु.शरण्या माळवकर ; तृतीय- कु. अनन्या पोवार .
इयत्ता ५ वी ते ७ वी गट:- प्रथम- कु. श्रेया गायकवाड; द्वितीय- श्रीरंग बेडगे; तृतीय- कु. सनम बागवान .
इयत्ता ८वी ते १०वी गट :- प्रथम- कु. स्वरांजली कुंभार; द्वितीय- अथर्व कुरणे ; तृतीय-कु. प्रांजल येजरे.
ग्रामपंचायत सार्वजनिक ध्वजारोहणाचे कामकाज श्री बी. बी. पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री पार्वती-शंकर विद्यालय व विद्यामंदिरने सर्व शाळांच्या सहभागातून यशस्वी केले. इयत्ता ९वीच्या दोन पथकांनी श्री पार्वती-शंकर पतसंस्था व भावेश्वरी पतसंस्था, उत्तूर पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागाचे ध्वजारोहण करण्यामध्ये सहभाग घेतला .
गायन स्पर्धेतील सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे संचालक मंडळाच्या वतीने विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्यावतीने बालमंदिर मुलांना , सर्व स्टाफला व योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिलेबीचे वितरण केले.