28/06/2025
*नूतन हायस्कूल येथे नववी व दहावी च्या 50 गरजु विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*
उमरी परिसरातील ग्रामीण भागातील इयत्ता नववी आणि दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी निनाद फाऊंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माधवराव पाटील शाळा, केरूर (तालुका मुखेड, जिल्हा नांदेड) आणि नूतन विद्यालय (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) या शाळांमधील 50)पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये पुस्तकांचा पूर्ण संच एक डझन वह्या कंपास पेन अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले गेली अनेक वर्षापासून हा उपक्रम निनाद फाऊंडेशनतर्फे सातत्याने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष . चंद्रशेखर बासवाडेकर आणि समन्वयक. राजीव पाटोदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी .गजानन लासिनकर,. आशिष कनकुडते, .प्रा.आर.सी. राजुरकर व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.या उपक्रमातून आजवर शेकडो विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक नागेश्वर लखमोड यांनी समाजातील अशा दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गोरगरिबांची मदत केली पाहिजे. असे विचार मांडले सदरील कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.