ABVP UMRED

ABVP UMRED Students Organization

09/07/2022

24/05/2022
आज दि. १४/०४/२०२२ ला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ...
14/04/2022

आज दि. १४/०४/२०२२ ला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमरेड नगर च्या वतीने उमरेड शहरात तहसील कार्यालय समोर व आंबेडकर भवन येथे बाबासाहेबांच्या स्मरकांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आला यातून समाजात एकतेचा संदेश देण्यात आला यावेळी उपस्थित राहुल भोयर नगरमंत्री , रितीक वांगे , शंतनु तळेकर, कुंदिनी बानकर, रोहित पैठणकर, अथर्व बानकर, प्रज्वल मोटघरे,व इतर कार्यकर्ते आणि उमरेड नगरवासी भव्य अश्या संख्येने उपस्थित होते

भव्य चित्रकला स्पर्धाअखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमरेड तर्फे शिवजयंती निम्मित भव्य चित्रकला स्पर्धा अशोक विद्यालय येथील...
20/02/2022

भव्य चित्रकला स्पर्धा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमरेड तर्फे शिवजयंती निम्मित भव्य चित्रकला स्पर्धा अशोक विद्यालय येथील भैय्याजी सभागृहात आयोजित करण्यात आला होता , स्पेर्धेत असंख्य मुलानी सहभाग घेतला होता , यावेळी शिवजयंती निम्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले , स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र , गडकिल्ल्यांच्या चित्र, व कॉविड19 जनजागृती या विषयावर स्पर्धकांनी चित्र काढले
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत रितू शंकरपूरकर जीवन विकास वनिता विद्यालय यांनी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक मानसी चिमुरकर न्यू आयडियल गल्स हायस्कुल , तृतीय पारितोषिक श्रुती इंगोले अशोक कन्या विद्यालय यांना देण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. मनोज धांडे , प्रा.आरती खेवले अध्यक्ष अभाविप उमरेड , राहुल भोयर नगरमंत्री अभाविप उमरेड हे उपस्थित होते या वेळी रितीक वांगे यांनी सूत्रसंचालन केले , तर यावेळी रोहित पैठणकर ,शंतनु तळेकर, कुंदिनी बानकर, ऋषभ नवघडे, जया रेहपाडे, प्रांजल वाघमारे, अथर्व बानकर इ. कार्यकर्ते उपस्थित होते

🙏
19/02/2022

🙏

*विद्यापीठ कायदा सरकारने मागे घ्यावा या साठी अभाविप उमरेड तर्फे  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले* महाराष्ट्र राज्य सरक...
10/02/2022

*विद्यापीठ कायदा सरकारने मागे घ्यावा या साठी अभाविप उमरेड तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले*

महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक २८ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनात लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारा बदल केलेला विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला. राज्य सरकारचा आणि बदल केलेला विद्यापीठ कायद्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा उमरेड निषेध करते.

महाराष्ट्र सरकारने विद्यापीठाच्या स्वायततेवर घाला घालणारे आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ या कायदामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर कोणतेही चर्चा होऊ न देता त्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करून राज्य सरकारने बदल केलेला विद्यापीठ कायदा पारित केला. बदल केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच मा. राज्यपाल करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा उमरेड अशी मागणी करते की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात शिक्षणाची गुणवत्ता ढासळणाऱ्या बदलांचा कायद्यात रूपांतर करू नये. अश्या प्रकारची मागणी करणारे निवेदन उमरेड तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी रोहित पैठणकर ,राहुल भोयर ,रितीक वांगे ,अनिकेत नवघडे ,अथर्व बानकर, प्रांजल वाघमारे व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते

अखिल भारतीय विध्यार्थी परिषद उमरेड च्या वतीने  ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त  उमरेड  तालुक्यात अनेक ठिकाणी झेंडावंदन व ...
26/01/2022

अखिल भारतीय विध्यार्थी परिषद उमरेड च्या वतीने ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उमरेड तालुक्यात अनेक ठिकाणी झेंडावंदन व भारतमाता पूजन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवारी पेठ 2

ABVP नागपुर जिल्ह्या तर्फे ONLINE PERSONALITY DEVELOPMENT CAMP *FREE ONLINE PERSONALITY DEVELOPMENT CAMP BY ABVP NAGPUR ...
17/05/2020

ABVP नागपुर जिल्ह्या तर्फे ONLINE PERSONALITY DEVELOPMENT CAMP *FREE ONLINE PERSONALITY DEVELOPMENT CAMP BY ABVP NAGPUR DIST.*
*https://forms.gle/2ifcimSxgMTGrMt5A*

*दी गई लिंक भर के आप रजिस्ट्रेशन कर सकते है सबमिट करने के बाद 9975559714 इस नंबर पर अपना नाम what's app करे.*

*ABVP ऊमरेड जिल्हा नागपुर तर्फे गरजू लोकांना फूड पॅकेट्स वितरित करण्यात आले व पोलिस कर्मचारी, होमगार्ड व इतर सेवाभावी लो...
08/04/2020

*ABVP ऊमरेड जिल्हा नागपुर तर्फे गरजू लोकांना फूड पॅकेट्स वितरित करण्यात आले व पोलिस कर्मचारी, होमगार्ड व इतर सेवाभावी लोकांना शरबत वितरित करण्यात आले.*

Address

Umred
441203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP UMRED posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category