25/02/2025
अलिकडेच मुंबईतील डी.जी. रूपारेल महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या 'वारसा' या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मवामंच्या विद्यार्थ्यांनी बक्षीसं पटकावली. नाटिका - प्रथम क्रमांक, सर्वोत्कृष्ट अभिनेता - वरद नंदगेम, रिल्स मेकींग तृतीय क्रमांक - आकांक्षा सोनार, हिया मखिजा, रितेश, एकल गायन - सुदीक्षा वझे, महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रथम क्रमांक - आभा बापट, वरद नंदगेम, चित्रकाव्य तृतीय क्रमांक - आकांक्षा सोनार अशी बक्षीसं मिळवली. महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्रीमती सीएचएम महाविद्यालयाला मिळालं. समुहगान, पत्रलेखन यांतही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
FY, SY,TY अशा तीनही वर्षात शिकणारे विद्यार्थी यांत सहभागी होते. स्पर्धेची तयारी, जिंकण्याची जिद्द आणि त्यासाठी घेतलेली मेहनत कमाल होती.
सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक!