Takshashila Vidyalaya "तक्षशीला विद्यालय"

  • Home
  • India
  • Ulhasnagar
  • Takshashila Vidyalaya "तक्षशीला विद्यालय"

Takshashila Vidyalaya "तक्षशीला विद्यालय" तक्षशीला विद्यालय, (मराठी / इंग्रजी)
प्

मित्रानो हे पेज आपले आहे "तक्षशीला विद्यालयात" शिकून गेलेल्या किंवा शिकत असलेल्या विद्यार्थ्यानसाठी आपल्या शाळेतील काही जुन्या काही नवीन गमती-जमती, विचार-विनिमय, काही प्रश्न, सामाजिक चर्चे साठी हेय व्यासपीठ आपले आहे.
कारण कुठेही असतो तरी आणि कितीही शिकून मोठे झालो तरी अभिमानाने सांगावेसे वाटते कि ही माझी शाळा आहे….
हि आमची शाळा आहे.

15/04/2019

रस्त्याने येता जाता येणारी माझी शाळा मला विचारते ..... जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना ?

मी उत्तर दिले दप्तर आता खांद्यावर नाही, एवढंच ..!.. बाकी लोक अजून शिकवून जातात ..!!

उद्धारली कोटी कोटी कुळे बाबा फक्त तुमच्या मुळे... घेतो तो श्वास आणि खातो तो घास केवळ तुमच्या मुळे...😢🙏🏻
06/12/2018

उद्धारली कोटी कोटी कुळे बाबा फक्त तुमच्या मुळे...

घेतो तो श्वास आणि खातो तो घास केवळ तुमच्या मुळे...😢🙏🏻

07/11/2018
एक पिढी1988/1987/1986/1985/1984/1983/1982/1981ही पीढ़ी आता 30 ओलांडुन 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश...
12/05/2018

एक पिढी

1988/1987/1986/1985/1984/1983/1982/1981
ही पीढ़ी आता 30 ओलांडुन 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लेप्टोप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

मार्कशीट आणि टिव्ही च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि

कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.

मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी.

पण गल्लीत कुणाच्याही घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

कपील, वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी

भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी.

कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.

ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी.

वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी

::

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..... असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच

उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?
धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!!
🙏🙏👏💐🌹👌🏻👍👆🏻

मित्रानो सकाळी 6 ठीक वाजता धम्मपहाट...स्थळ तिथेच आपली शाळा...आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, at तक्षशिला विद्यालय... 🙏
18/10/2017

मित्रानो सकाळी 6 ठीक वाजता धम्मपहाट...
स्थळ तिथेच आपली शाळा...

आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, at तक्षशिला विद्यालय... 🙏

अतिशय बोलकं चित्र! साध्या चित्रात मोठा संदेश!! झाडे लावा……झाडे वाचवा…… तरच जग वाचेल...
24/06/2016

अतिशय बोलकं चित्र! साध्या चित्रात मोठा संदेश!!
झाडे लावा……झाडे वाचवा…… तरच जग वाचेल...

11/06/2016
Career Chart………
04/06/2016

Career Chart………

Address

Subhas Tekdi
Ulhasnagar
421004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Takshashila Vidyalaya "तक्षशीला विद्यालय" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category