02/04/2026
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान…
एकमुखाने घुमू दे जयघोष – जय जय हनुमान!
पराक्रम, निष्ठा आणि भक्तीचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या प्रभू हनुमानांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हनुमंतांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, धैर्य आणि यश नांदो, हीच प्रार्थना.
30/03/2026
ग्रंथालय शास्त्रातील करिअरच्या नव्या वाटा!
आज मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्या वतीने आयोजित 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत 'ग्रंथालयातील उपलब्ध संधी' (Opportunities in Library Science) या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची माहिती जाणून घेतली.
प्रमुख मार्गदर्शक:
🔹 डॉ. संदीप भावसार (मुख्य ग्रंथपाल, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
🔹 श्री. प्रशांत पाटील (सहायक ग्रंथालय संचालक, मुंबई विभाग)
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयच्या ग्रंथपाल अपर्णा साने, सहा प्रा. गुलाबराव काटे आणि तान्हाजी गंभीरे यांची विशेष उपस्थिती होती.
डिजिटल युगात ग्रंथालय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील नवीन प्रवाह विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहेत.
StudentDevelopment
26/03/2026
|| जय श्री राम ||
सत्य, कर्तव्यनिष्ठा, आदर्श नेतृत्व आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश देणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांना कोटी कोटी वंदन!
श्रीरामांचा आदर्श हा संयम, जबाबदारी, चारित्र्य आणि कर्तव्यभावनेतून आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या जीवनातून नैतिकता, शिस्त आणि समाजहिताची जाणीव जोपासण्याची शिकवण मिळते.
श्री राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
23/03/2026
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रीय नायक, शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या महान क्रांतिकारकांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!
देशासाठी सर्वस्व अर्पण करत त्यांनी राष्ट्रप्रेम, त्याग आणि धैर्याची सर्वोच्च मूल्ये समाजासमोर ठेवली. त्यांचे जीवन आणि बलिदान हे देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि चारित्र्यनिर्मितीचे प्रेरणादायी धडे देणारे आहेत.
या महान क्रांतीवीरांच्या आदर्शातून राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासण्याचा संकल्प करूया.
19/03/2026
🚩 गुढीपाडवा व नववर्ष स्वागतयात्रा: कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा सामाजिक संदेश! 🚩
नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य 'स्वागतयात्रेत' आज कर्मवीर भाऊराव पाटील (KBP) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्साहाने आणि सामाजिक बांधिलकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
🌟 'कर्तव्यदक्ष' संकल्पनेतून जनजागृती:
या वर्षी महाविद्यालयाने 'कर्तव्यदक्ष - आम्ही भारताचे लोक' ही विशेष संकल्पना मांडली होती. केवळ उत्सवात सहभागी न होता, समाजाला प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी खालील महत्त्वाच्या विषयांवर प्रबोधन केले:
पर्यावरण संरक्षण: प्लास्टिक मुक्ती आणि वृक्षारोपणाचे महत्त्व.
शिक्षण: सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज.
भारतीय संस्कृती: आपल्या परंपरांचे जतन आणि संवर्धन.
डिजिटल साक्षरता (Digital Awareness): सायबर सुरक्षेबाबत जागरूकता.
सुजाण नागरिकत्व: संविधानाप्रती निष्ठा आणि नागरी कर्तव्यांची जाणीव.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सचिन मोरे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष गावडे यांनी संपूर्ण स्वागतयात्रेचे नियोजन केले.
आकर्षक घोषवाक्ये, आणि भित्तीपत्रके (Posters)
च्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत सामाजिक जबाबदारीने करण्यात आले.
केवळ सण साजरे न करता समाज घडवण्याचे कर्तव्यही पार पाडण्याची प्रथा महाविद्यालयाने कायम ठेवली !
19/03/2026
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षात ज्ञानार्जन, मूल्यसंस्कार, नवोन्मेष आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करूया. शिक्षणाच्या बळावर प्रगतीचा नवा अध्याय लिहत समाजहित आणि राष्ट्रनिर्मितीत आपला मोलाचा वाटा उचलूया.
नववर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आणि यशस्वी ठरो!
13/03/2026
"आमचे प्रेरणास्थान"
आदर्श विकास मंडळाचे संस्थापक आणि मार्गदर्शक कै. बी. बी. मोरे साहेब यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन! 💐
शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या साहेबांचे विचार आणि कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.
10/03/2026
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र आदरांजली.
भारतातील स्त्री शिक्षणाच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून ज्ञान, समता आणि सामाजिक जागृतीचा दीप त्यांनी प्रज्वलित केला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून आजही मिळत राहते.
08/03/2026
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
स्त्री ही समाजाच्या प्रगतीची आणि मूल्याधिष्ठित संस्कारांची महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. शिक्षण, नेतृत्व, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेच्या बळावर समाजघडणीत महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे.
समानता, आदर आणि सन्मानाच्या मूल्यांची जपणूक करत सक्षम व संवेदनशील समाज घडविण्याचा संकल्प या दिनी अधिक दृढ करूया.
07/03/2026
*कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची 'नरेन्द्र बल्लाळ व्याख्यानमाले'ला उपस्थिती*
ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात मानाचे पान असलेल्या 'ठाणे वैभव' आयोजित नरेन्द्र बल्लाळ व्याख्यानमालेचे यंदा १४ वे वर्ष. ३२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रबोधनात्मक ज्ञानयज्ञात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, वर्तमानातील जागतिक घडामोडी आणि साहित्यातील सत्यता समजून घेण्यासाठी ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच ठरली.
*सत्रातील मुख्य आकर्षणे:*
१) श्री. दीपक करंजीकर (विषय: २१ व्या शतकाचे भूराजकीय प्रतल आणि भारत):
या सत्रात विद्यार्थ्यांना जागतिक राजकारणातील बदलती समीकरणे व अर्थव्यवस्था. तसेच संरक्षणाच्या क्षेत्रात तरुणांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे मार्गदर्शन मिळाले.
२) श्री. अभिराम भडकमकर (विषय: चरित्र कादंबरी - इतिहास की विपर्यास?):
साहित्य आणि इतिहास यांची सांगड घालताना लेखकाला करावी लागणारी कसरत आणि वाचकांनी इतिहास कसा तपासावा, यावर भडकमकर सरांनी प्रकाश टाकला. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अत्यंत अभ्यासपूर्ण ठरले.
व्याख्यानमालेच्या उदघाटनप्रसंगी महापौर सौ.शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, ठाणे वैभवचे संपादक श्री.मिलिंद बल्लाळ तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमच्या विद्यार्थ्यांना ही अमूल्य संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'ठाणे वैभव'चे संपादक श्री. मिलिंद बल्लाळ सर यांचे महाविद्यालय व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांतर्फे मनःपूर्वक आभार!
03/03/2026
धूलिवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
रंगांच्या या उत्सवातून परस्पर आदर, सौहार्द आणि सकारात्मकतेचे मूल्य अधिक दृढ होवोत. विविधतेत एकता आणि आनंदी सहअस्तित्वाचा संदेश आत्मसात करत सुसंस्कारित व संवेदनशील समाज घडविण्याचा संकल्प करूया.