Vijeta IAS Academy

Vijeta IAS Academy Vijeta IAS Academy VIJETA ACADEMY -
We are the Mumbai's best coaching (training) and counseling institute for administrative careers.

If you are looking for careers through UPSC (IAS, IPS, IFS, IRS), MPSC (Dy. Collector, Dy.SP,ACP) or other competitive exams or assistance with examination pattern, you have arrived at the right place. Think of Vijeta Academy as your one-stop-shop for administrative careers in India and Maharashtra. If there is anything you need by way of coaching, information about exams, study materials or anything related to competitive exams, we have it - or will get it for you.

मानीवली, कल्याण या दुर्गम भागात उल्हासनगर येथील SHM कॉलेजच्या 7 दिवसीय निवासी NSS Camp च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक...
28/12/2025

मानीवली, कल्याण या दुर्गम भागात उल्हासनगर येथील SHM कॉलेजच्या 7 दिवसीय निवासी NSS Camp च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा (UPSC MPSC) मार्गदर्शन करण्याचा योग मिळाला.
सदर मार्गदर्शनासाठी मला निमंत्रित केलेल्या खान मॅडम आणि गायकवाड सरांचे मनःपूर्वक आभार ...!!!

“शांततेचा नेता गेला… आणि आजच्या राजकारणाचे मुखवटे उघडे पडले”भारतीय राजकारणात संयम, नैतिकता आणि माणुसकीची शेवटची ज्योत मा...
12/12/2025

“शांततेचा नेता गेला… आणि आजच्या राजकारणाचे मुखवटे उघडे पडले”

भारतीय राजकारणात संयम, नैतिकता आणि माणुसकीची शेवटची ज्योत मानले गेलेले
शिवराज पाटील चाकूरकर आता आपल्यात नाहीत.
त्यांच्या जाण्यानं एक प्रश्न देशभर पसरला आहे—

“जे गुण त्यांनी जगले… ते आजच्या राजकारणात कुठे गेले?”

चाकूरच्या धुळीतून दिल्लीच्या शिखरापर्यंत—पण मन कायम नम्र

त्यांच्या बालपणी घरात दिवा तेलाचा होता…
आजच्या नेत्यांप्रमाणे प्रकाशझोतांचा नव्हता.
त्यांनी पदं मिळवली;
आजचे नेते पदं विकत घेण्यापर्यंत जातात.

त्यांनी लोकांचा विश्वास कमावला;
आज काही नेते विश्वास तोडतात,
आणि दुसऱ्या दिवशीच नव्या भाषणात त्याच जनतेसमोर मोठेपण मिरवतात.

“उंच पर्वत असला तरी शिखर नम्रच असतं”
ही त्यांची ओळख होती.
आजची ओळख?
— नम्रता हरवलेली सत्ता.

शिक्षणातून घडलेलं नेतृत्व — आणि आजच्या काळातील रिकामेपणा........

• उस्मानिया विद्यापीठ – B.Sc
• मुंबई विद्यापीठ – LLB

त्यांच्या कारकिर्दीचा पाया ज्ञान होता.
आज अनेक नेत्यांच्या कारकिर्दीचा पाया
गोंधळ, घोषणाबाजी आणि टाळ्यांसाठी केलेलं नाटक आहे.

शिवराज पाटील शिक्षण घेत होते,
आणि आज अनेक नेते फक्त शिकवण्याचा आव आणतात.

त्यांनी संविधानाचा अभ्यास केला;
आज काही नेते संविधानाचा अर्थसुद्धा सोयीस्करपणे बदलतात.
.. पदं मिळाली, पण कधी गर्व नाही—आज पद मिळतं की गर्वच वाढतो........

✓ 7 वेळा लोकसभा सदस्य
✓ भारताचे 10 वे लोकसभाध्यक्ष
✓ केंद्रीय गृहमंत्री

पण सभागृहात त्यांची भाषा नेहेमी संयमी.
नागरिकांशी संवाद साधताना आवाजात शांतता.
निर्णय घेताना विवेक.

आजच्या नेत्यांच्या आवाजात
संयमापेक्षा कोलाहल,
तर्कापेक्षा टोमणे,
सेवेपेक्षा सेल्फी दिसते.

26/11 – त्यांची नैतिकता जिंकली, आजची नैतिकता हरली............

देश जखमी होता,
लोक रडत होते,
आणि संपूर्ण भारत हादरत होता.

अशा वेळी त्यांनी स्वतःला विचारलं—
“देशाला दुखापत झाली आहे… मी जबाबदार आहे का?”

आणि उत्तर ‘हो’ लागलं,
मग सत्तेला पकडून बसण्याऐवजी
त्यांनी सत्ता सोडली.

आजच्या राजकारणात?
चूक झाली की—

• जबाबदारी टाळा
• दोष दुसऱ्यांवर ढकला
• मीडिया सांभाळा
• आणि पदाला दोन्ही हातांनी चिकटून बसा

त्यांनी नैतिकता निवडली—
आज अनेकजण नैतिकता टाळतात.

आपण अशा काळात जगतोय
जिथे प्रत्येक गोष्ट राजकारण आहे
पण राजकारणातून माणुसकीच गायब झाली आहे.

आज अनेक नेते—
• पदासाठी लढतात, पण मूल्यांसाठी नाही
• सत्तेसाठी भिडतात, पण जनतेसाठी नाही
• भाषणात देश मोठा सांगतात, पण वागण्यात स्वार्थ मोठा असतो
• चुका मान्य करत नाहीत, उलट त्यांचं समर्थन करण्यासाठी थरारक नाटके खेळतात

शिवराज पाटील यांनी 26/11 नंतर सिद्ध केलं—
“सत्ता टिकवण्यात नव्हे…
सत्ता सोडण्यातही नेतृत्व असतं.”

आजचे अनेक नेते हे धाडस करू शकतील का?
हा प्रश्न त्यांच्या जाण्यानंतर अधिक तीव्र झाला आहे.

“एका शांत नेत्यानं नैतिकता जगून दाखवली,
आणि आजच्या नेत्यांनी नैतिकता फक्त भाषणात दाखवली.
त्यांनी जबाबदारी स्वीकारली,
आजचे अनेक नेते जबाबदारीपासून पळतात.
तो गेला…
आणि सोबत घेऊन गेला
राजकारणातील प्रामाणिकपणाची शेवटची किरण.”

“जेव्हा सत्ता सोडून देशासाठी उभं राहणारा नेता मरतो,
तेव्हा राजकारण माणसाला नव्हे… नैतिकतेला हरवतं.
आजच्या राजकारणाला नेता नको—
त्यांच्यासारखी आत्मा असलेली माणसं हवी आहेत.”

त्यांचे जीवन आजच्या नेत्यांसाठी आरसा आहे

त्यांनी दाखवलं:
“पद मोठं नाही…
वर्तन मोठं असतं.”

आज अनेकजण दाखवतात:
“पद मिळालं की…
वर्तन हरवतं.”

आणि म्हणूनच
त्यांच्या जाण्यानं देशाला जाणवलं—
आपण फक्त एक नेता गमावला नाही,
आपण मूल्यांची शेवटची सावली गमावली.

शांत नेता गेला…
आणि आजच्या राजकारणातील गोंधळ आता अधिक बहिरा वाटू लागला.
तत्त्वाचा शेवटचा दीप मालवला,
आणि त्याच्या धुरातून एकच संदेश उमटला—
“नेतृत्व आवाजात नसतं… नैतिकतेत असतं...

भावपूर्ण श्रद्धांजली..!!!

https://youtu.be/QQpHHj7ET7E?si=lCuS-HiHtHBIfH2uSTREET FOOD कितना DANGEROUS है देखलो I पैरोतले जमीन खिसक जाएगी
06/12/2025

https://youtu.be/QQpHHj7ET7E?si=lCuS-HiHtHBIfH2u

STREET FOOD कितना DANGEROUS है देखलो I

पैरोतले जमीन खिसक जाएगी

Stop Eating Street Food Before It’s Too Late!In this video, we expose the shocking truth behind the street food you eat every day. From dirty oil, expired in...

24/11/2025

एक संख्या अशी आहे
जिला 2 ने भागल्यास,
मिळालेल्या उत्तरातून 6 वजा केले, आलेल्या उत्तराला 4ने गुणले तरी तीच मूळ संख्या मिळते .
👉 ती मूळ संख्या कोणती?

इंदिरा गांधी... बदनाम कोणासाठी आणि का झाल्या?काँग्रेस कुठे कमी पडली..........?इंदिरा गांधी म्हटले की आणीबाणी , पंडित जवा...
19/11/2025

इंदिरा गांधी... बदनाम कोणासाठी आणि का झाल्या?
काँग्रेस कुठे कमी पडली..........?

इंदिरा गांधी म्हटले की आणीबाणी , पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या इतकेच सामान्य लोकांना पटवून देण्यात विरोधक यशस्वी झाले आणि काँग्रेस सत्य सांगण्यात कमी पडली....
या लेखात इंदिरा गांधी कोण होत्या, त्यांनी कोणते निर्णय घेतले, देशाला सर्वच क्षेत्रात कसे समृद्ध करून शेजारी राष्ट्रांना आणि अमेरिकेला कसा शह दिला तो पाहू.

इंग्रज जेव्हा देश सोडून गेले तेव्हा अक्षरशः गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता, इत्यादीने देश ओरबाडून निघाला होता. अमेरिकेतील डुक्कर जे गहू खात होते ते आपण आयात करत होतो. इतकी गरिबी होती देशात.

इंदिरा गांधींनी हरित क्रांतीचा निर्णय घेतला. जास्त उत्पादन देणारी गहू, भाताची वाणे आणली.. थोड्याच काळात जो देश धान्य आयात करत होता त्याला निर्यात करणाऱ्या देशात समाविष्ट केले.

बांगलादेश मुक्ती......1971

अमेरिकेच्या दबावाला न डगमगता पूर्व पाकिस्तान अर्थात आजचा बांगलादेश मुक्त केला आणि पाकिस्तानला कायमचा धडा शिकविला. यावेळी 93000 पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. इतके मोठे आत्मसमर्पण जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आजचे नेते एखादा रॉकेट सोडले तरी सर्जिकल स्ट्राईक च्या नावाखाली स्वतःची स्तुती करून घेतात.

Nuclear Test......1971

अमेरिकेला झुंगारून न्युक्लिअर टेस्ट केल्या आणि जगाला दाखवून दिल्या की भारत अणुशक्ती असलेला राष्ट्र झाला आहे. या अणुशक्तीची ताकद काय असते हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही.

प्रीव्ही पर्स रद्द..........

पूर्वीच्या राजाना भारत सरकारकडून लाखो रुपये द्यावे लागत असे. इंदिरा गांधींनी संविधानात बदल करून सर्व नागरिकांना समान न्याय असे ठणकावून सांगितले आणि अशा राजांना दिली जाणारी प्रीव्हि पर्स देखील रद्द केली.

बँकांचे राष्ट्रीयकरण........1969

भारतातील जवळपास सर्वच बँका उद्योगपतीच्या हातात होत्या. नफा कमावण्यासाठी त्या शहरातच कार्यरत होत्या. इंदिरा गांधींनी 1969 ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले, म्हणजे या सर्व बँका सरकारने विकत घेतल्या. आणि या बँका खेडोपाडी नेल्या.
उद्देश एकच होता शेतकरी, भूमिहीन, आदिवासी आणि दलीत यांना पैसा मिळावा आणि शेती, उद्योग करून देशाची प्रगती करावी.

राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरण...1972

त्याकाळी काही मोजक्या लोकांच्याच मालकीची शेकडो एकर जमिनी होत्या. आणि अख्खा गाव भूमिहीन असायचा .
इंदिरा गांधींनी Land ceilling act,1972 करून त्यांच्या जादा जमीनी सरकारकडे घेतल्या आणि दलीत, आदिवासी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केल्या..

गरिबी हाटाओंचा नारा........

गरीबांना रोजगार, अन्न सुरक्षा, झोपडपट्टी विकास अर्थात गरिबाना घरे बांधून दिले. बँकांच्या सुविधा दिल्या....

राष्ट्रीय आणीबाणी.......

देशात विरोधकांनी आराजकता माजवली होती त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणी लावून देशाला शिस्त शिकवली. आणि अनेक चांगले कायदे केले . या आणीबाणीवर विरोधकांनी रान उठवले. नवीन सरकार आले परंतु 2 वर्षच टिकले. जनता समजून गेली हे कितपत देश चालवू शकतात. या आणीबाणीवर एखादा लेख seperate लिहावा लागेल. सत्य समजण्यासाठी...

ऑपरेशन ब्ल्यू स्टार......

देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या पंजाबच्या अतिरेक्यांना धडा शिकविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देश हीत समोर ठेवून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैनिक घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करून दाखवल्या, अतिरेक्यांचा खात्मा केल्या. पुढे याच कारणामुळे त्यांच्या अंग रक्षकानी त्यांची हत्या केली.

बदनाम कोणासाठी झाल्या...

इंदिरा गांधींना बदनाम करण्यासाठी सर्वात प्रथम उद्योगपती पुढे आले. कारण त्यांच्या बँका गरिबांसाठी इंदिराजींनी विकत घेतल्या. त्यांचे आर्थिक नुकसान केले.

दुसरे बदनाम करणारे कोण तर मोठे जमीनदार. ज्यांच्या शेकडो एकर जमीन दलीत आदिवासी, भूमिहीनाना इंदिराजींनी वाटल्या. गावात यांचे प्रस्थ मोठे होते त्यामुळे गोरगरिब जनतेला वेठीस धरून बदनामीचा कार्यक्रम सुरळीत सुरू झाला.

तिसरे म्हणजे राजे लोकं ज्यांच्या प्रीव्हि पर्स बंद करून इंदिराजींनी त्यांना सामान्य माणसाच्या पंक्तीत बसवले.

या सर्वांनी एकत्र येऊन जनसंघाला मिळाले, अज्ञानी, निरक्षर,सामान्य माणसाला खोट्या गोष्टी सांगून काही अमिषे दाखवून इंदिराजींना बदनाम करण्यात यशस्वी झाले.
विशेष म्हणजे आज ती दलीत, आदिवासी,भूमिहीन जनता ज्यांना इंदिराजींनी न्याय दिला तीच विसरली आहे. म्हणतात ना...
"ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी "
या उक्तीप्रमाणे..

काँग्रेस कुठे कमी पडली ....?

इंदिराजीचे गोरगरीब, आदिवासी, दलिता साठीचे कार्य , देशासाठी घेतलेले धाडसी निर्णय , देशासाठी दिलेले बलिदान समजावण्यास काँग्रेस कमी पडली. जे राजकारणात प्रस्थापित झाले तेच काँग्रेसला आपल्या स्वार्थासाठी बदनाम करून दुसरी चूल मांडू लागले.काही प्रादेशिक पक्ष उदाहरणादाखल अभ्यासू शकता.समजून घेऊ शकता.आणीबाणीची दुसरी बाजू स्पष्ट शब्दात मांडण्यास देखील कमी पडली.

आज इंदिरांजीचा वाढदिवस... या महान दुर्गेस, लोह महिलेस, गरीबासाठी तळमळ असणाऱ्या वात्सल्यरूपी मातेस, देशासाठी आहुती देणाऱ्या थोर आत्म्यास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....

धन्यवाद........🌹👏🌹
लेख आवडल्यास नावासह पुढे पाठवा. इंदिराजीचे सत्य समजण्यासाठी.

सतीश जाधव
संचालक, विजेता IAS अकॅडमी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा बदलापूर येथे खूप सुंदर पद्धतीने साजरा केला गेला. अनेक ...
18/11/2025

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा बदलापूर येथे खूप सुंदर पद्धतीने साजरा केला गेला.

अनेक वक्त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

सदर कार्यक्रमात मला देखील सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आयोजकांचे, खासकरून श्री राजेंद्र गढरी सरांचे मनपूर्वक आभार....!!

16/11/2025
https://youtu.be/fXOnhBn1uw0?si=o_wsUqu8sVqtG8DGक्या भारत ने आतंकी संघटनो से हाथ मिलाया?अब पाकिस्तान का क्या होगा?
26/10/2025

https://youtu.be/fXOnhBn1uw0?si=o_wsUqu8sVqtG8DG

क्या भारत ने आतंकी संघटनो से हाथ मिलाया?
अब पाकिस्तान का क्या होगा?

भारत ने क्या वाकई आतंकी संगठनों से हाथ मिला लिया है?हाल ही में सामने आई रिपोर्ट्स और मुलाक़ातों ने सबको हैरान कर दि....

https://youtu.be/k7bQmUEe-nU?si=M6rI-hivcMIDRFVCपाकिस्तान - सौदी अरेबिया संरक्षण करार..भारतासमोर एक आव्हान, पण भारत यातू...
11/10/2025

https://youtu.be/k7bQmUEe-nU?si=M6rI-hivcMIDRFVC
पाकिस्तान - सौदी अरेबिया संरक्षण करार..
भारतासमोर एक आव्हान, पण भारत यातून योग्य मार्ग काढणारच....

Pakistan ne ek baar fir aisi harkat ki hai jisse dono deshon ke beech tanav badh gaya hai.In this video, we discuss Pakistan’s recent controversial action th...

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी लाल बहादूर शास्त्री जी  यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!शुभ दसरा... आणि धम्मचक्र परिवर्...
02/10/2025

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी
लाल बहादूर शास्त्री जी
यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

शुभ दसरा... आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!

Address

303, Prestige Chambers, Behind Drive Babasaheb Ambedkar Statue, Near Pf. No 2, Thane(W)
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijeta IAS Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vijeta IAS Academy:

Shortcuts

Share