Yashodeep Competitive Guidance Center

Yashodeep Competitive Guidance Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashodeep Competitive Guidance Center, Education, 401, Guruprerana co-op hsg ltd, near ashok theatre, opposite to datta mandir, thane west, Thane.

18/11/2016

एमपीएससी परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत.
तसेच त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे.
या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात असले तरी सर्वप्रथम रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससीतर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या भरतीकरिता स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्वपरीक्षा घेतल्या जातात.
या तीनही परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत.
स्वतंत्र पूर्वपरीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्वतयारी अभ्यास, प्रवास, निवासव्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना पुन्हा पुन्हा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एमपीएससीने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान :
महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या बाबतचे परिपत्रक जारी केले. पाटील हे विधानपरिषदेत सत्तारुढ पक्षाचे नेते आहेत.
एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असेपर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसत असत. आता त्या जागी चंद्रकांत पाटील बसणार आहेत.
चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती मानले जातात.
तसेच खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचे महसूल खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
वेगवान धावपटू धरमवीरवर 8 वर्षांची बंदी :
डोप चाचणीत ऐनवेळी अपयशी ठरताच रिओ ऑलिम्पिकला अनुपस्थित राहिलेला हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
200 मीटर शर्यतीचा धावपटू असलेला धरमवीर याला 11 जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ग्रॅन्डप्रिक्सदरम्यान झालेल्या डोप चाचणीत दोषी धरण्यात आले होते.
धरमवीर दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर आठ वर्षे बंदीचा निर्णय घेतला आहे.
तसेच ही माहिती अ. भा. अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आणि वाडाला देण्यात आली असल्याचे नाडाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
2012 मध्ये अनिवार्य डोप टेस्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या धरमवीरकडून आंतरक्षेत्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले 100 मीटरचे सुवर्णपदक हिसकावून घेण्यात आले होते.
ध्वनिप्रदूषण केल्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा होणार :
सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत.
ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून, यासंदर्भात कठोर कारवाईचा आदेश सरकारने पोलिस नियंत्रणास दिले आहेत.
ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल, तर रात्री 70 डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी.
व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल, तर रात्री 55 डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल, तर रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल ते रात्री 40 डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्‍यतांना सामोरे जावे लागत आहे.
अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्‍यक आहे.
ध्वनिप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे.
नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.
दिनविशेष :
18 नोव्हेंबर 1901 हा निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम यांचा जन्मदिन आहे.
पहिले महायुद्ध - सॉमची पहिली लढाई 18 नोव्हेंबर 1916 रोजी संपली.
18 नोव्हेंबर 1963 रोजी बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला
@यशोदीप स्पर्धा परीक्षा केंद्र ,ठाणे

05/11/2016

चालू घडामोडी
५.११.२०१६

💥 अर्थसत्ता
स्टेट बॅंकेनंतर एचडीएफसी व आयसीआयसीआयनेही कमी केले गृहकर्जदर
टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल
मोदी सरकारची 'आरआयएल’कडे भरपाईची मागणी

💥 क्रीडा
आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री
रशियात आता डोपिंग हा गुन्हा
आशियाई समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा २०२० मध्ये महाराष्ट्रात?
डीआरएसचा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत होणार वापर

💥 तंत्र-विज्ञान
मंगळावर चेंडूच्या आकाराचा उल्कापाषाण
जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण तयार
फोरेन्सिक लॅबोरेटरीला फोन अनलॉक तंत्रज्ञान मिळणार

💥 आंतरराष्ट्रीय
युनोच्या सर्वोच्च विधि संस्थेवर युवा भारतीय वकिलाची निवड
अफगाणिस्तानात पहिला महिला फिटनेस क्लब सुरु
आता आणखी अवघड ब्रिटनचा व्हिसा !

💥 राष्ट्रीय
हजारो संस्थांच्या परदेशी देणग्या रोखल्या

💥 महाराष्ट्र
कीर्ती शिलेदार यांना देवल पुरस्कार जाहीर
जवानांना व शेतकऱ्यांना आपली संपूर्ण संपत्ती दान करणार पुण्याचे प्रकाश केळकर
स्वच्छतेत महाराष्ट्र पिछाडीवर!
माध्यान्ह भोजन योजना होणार "स्वच्छ'

04/11/2016

चालू घडामोडी

GST परिषदेने 5%;12%,18%,28%अशा चार स्तरीय कर रचनेवर शिक्कामोर्तन केले.
CPI (central price index) ज्या वस्तूंच्या आधारावर ठरवला जातो त्या पैकी अर्ध्या वस्तू कर मुक्त असतील.
28%-या गटात तंबाखूजन्य व्यसनाचे पदार्थ ,आलिशान गाड्या,याशिवाय उपकर लागून याच प्रमाण 40% वर पोहोचेल,(सध्या 31% उत्पादन शुल्क व त्यावर पुन्हा मूल्यवर्धित कर लागू होतो)
12%व१८%-उर्वरित बहुतांश वस्तू या गटात आहेत,
5%-या गटात दैनंदिन वापराच्या वस्तू मोडतात.
सोन्यावर 4% चा विचार होता मात्र त्यावर एकमत न झाल्याने निर्णय लांबणीवर.

NDTV INDIA HINDI या न्युज चॅनेल वर 1 दिवसाची बंदी।

पठाणकोट हल्याच वार्तांकन करताना गोपनीय शस्त्रतळ दाखवल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाही,
अशाप्रकारची कारवाही केल्याची पहिलीच वेळ.

-यशोदीप स्पर्धा परीक्षा केंद्र ,ठाणे.
एस टी आय पूर्वपरीक्षेच्या संपूर्ण तयारी साठी मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा... संपर्क-8425826500/8108932292

एस टी आय च्या संपूर्ण तयारी साठी मार्गदर्शन

बहुप्रतिक्षित महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC आयोजीत विक्रीकर निरीक्षक (STI:- Sales Tax Inspector) ची जाहिरात आली आह...
03/11/2016

बहुप्रतिक्षित महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC आयोजीत विक्रीकर निरीक्षक (STI:- Sales Tax Inspector) ची जाहिरात आली आहे.
एकूण जागा - 181
अर्ज करण्याची मुदत - 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत
पूर्वपरीक्षा रविवार - दिनांक 29 जानेवारी 2017

3 महिने हातामध्ये आहेत, झपाटून कमाला लागलात तर .......3 महिन्यात यशाच एवरेस्ट नक्की सर कराल......अधिक माहितीसाठी मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या......... यशोदीप मार्गदर्शन केंद्र, ठाणे - 8425826500/ 8108932292 सर्वाना खूप खूप शुभेच्छा!

Address

401, Guruprerana Co-op Hsg Ltd, Near Ashok Theatre, Opposite To Datta Mandir, Thane West
Thane
400601

Telephone

+918425826500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashodeep Competitive Guidance Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category