Shreerang Vidyalaya

Shreerang Vidyalaya Shreerang Vidyalaya - Aamchi Shala

आमचाही एक जमाना होता बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे ,  सायकलने/ बसने  पाठवायची प...
05/05/2025

आमचाही एक जमाना होता
बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.
🤪
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
टक्केचा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.
😛

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...

🤣🤣🤣

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...

☺️☺️
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.

😁

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा...

🤗

वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.

🤪
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.

😞

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...

🥸😎

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं...

🧐😝

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून......

😜

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

😁

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.

😁

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला ू' म्हणणं माहीतच नव्हतं...

😌

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?'
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!

😇

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो........

🙃

भाकरी आणि कालवनाशिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.

जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.,,,,,,,,

😌

आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही
एक #जमाना' होता.....👍🏻👍🏻👍🏻

05/05/2025
Kiti Diwas Zhale.. Shale javalun jaun?
22/08/2024

Kiti Diwas Zhale.. Shale javalun jaun?

Kuna kuna kade aahet ajun japun thevlele..
10/11/2023

Kuna kuna kade aahet ajun japun thevlele..

वासांची शाळा..पुर्वी प्रत्येक महिन्याला वास होता…त्या वासातच माझ्या बालपणीचा श्वास होता…पहिला महिना जुनचा…नविन युनिफॉर्म...
04/11/2022

वासांची शाळा..

पुर्वी प्रत्येक महिन्याला वास होता…
त्या वासातच माझ्या बालपणीचा श्वास होता…

पहिला महिना जुनचा…
नविन युनिफॉर्मचा वास,
नविन वह्यापुस्तकांचा वास,
नव्या गमबूटांचा वास,
पेन्सील खोडरबराचा वास….

मग जुलैला पावसाचा दणदणाट..
डब्यातल्या भाजीपोळीचा घमघमाट,
चिखलाच्या वासातून घरची पायवाट
शाळेच्या भिंतींनाही घामाचा वास…

ऑगस्टला विविध राख्यांचा स्पर्श..
तरूण उन्हातील
तेरड्याच्या फुलांचा रंग…
शाळेच्या वाटेवर मित्रमैत्रिणी दंग..

सप्टेंबर ला काकड्या पपनसाचा वास…
गणपतीच्या शाडूचा खास…
उदबत्या भरजरी मखरांचा वास..
करकरणार्या थर्माकोलचा कानाला त्रास…

ऑक्टोबरला उटण्यांची पहाट..
फटाक्यांच्या धुराची हवा दाट..
करंज्या चकल्यांच्या वासाने
नाकाला गुदगुदल्या खास…

नोव्हेंबरच्या सुट्टीत
कॉमिक्स ,चांदोबाच्या
पिवळ्या पानांचा वास…
लायब्ररीजवळच्या गटाराचाही त्रास..

डिसेंबरला लडीवाळ झुंजूमुंजू..
गोदडीला खूपवेळ झोंबू..
गार सकाळी गरम पोहयांचा वास..
गरम पाण्यालाही होता स्पर्श खास..

जानेवारीचा तिळगूळ
आणी बाई आई मावश्यांचे सजणे..
शालूंचा दर्प, गजर्याचा घमघमाट..
हिरव्या बांगड्याचा सळसळाट…

फेब्रूवारीच्या परिक्षा..
प्रश्नपत्रिकेची शाई, उत्तरांची घाई..
फाऊंटन पेनाचा वास..
रस्तावरच्या लिंबूसरबताची आवड खास..

मार्चला क्रिकेटच्या मॅचा…
सुट्टीतल्या रिकामटेकड्या बाता…
गच्चीवर कूरडयांच्या चोर्या…
पिकलेली जांभळे आणी कैर्या..

एप्रिल तसा टेंशनचा…
रिझल्टच्या दिवशी बाकांचा वास नकोसा…
सगळी सुट्टीची मजाच जाई..
कमी मार्कांमुळे कुणाची मान खाली जाई..

मे म्हणजे मरण..
सावल्यांमध्ये बसून बैठे खेळ
घरोघरी लोणची पापडांचे मेळ..
गावी गेलो तर पुढे सरकेच ना वेळ..

आला जून की ढगांचा वास…
हवेचा खास…
नव्या इयत्तेत बाई कोण असतील
त्या कश्या हसतील..
ही उत्कंठा मनातील..

अशी शाळा दहावीपर्यंत…
आपण जगलो…
नाकाने डोळ्यांनी..
मन तसे आता ना राहिले
ना तशी वासांची जुगलबंदी..

22/09/2019

ओळखा पाहु कोण..?

आज सर्वांच्या लाडक्या मोहीते टिचर यांचा शाळेत निरोप समारंभ झाला. तरी आपण सर्वांनी मिळून त्यांना पुढिल वाटचालीसाठी सुभेच्...
22/09/2019

आज सर्वांच्या लाडक्या मोहीते टिचर यांचा शाळेत निरोप समारंभ झाला. तरी आपण सर्वांनी मिळून त्यांना पुढिल वाटचालीसाठी सुभेच्छा देउयात...🙏

10/01/2019

*माझी शाळा*
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!

त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!

खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!

धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!

करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?

मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!

रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!

काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!

जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!

पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!

केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!

📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏
ज्यांनी कोणी लिहिले ते खरे आहे🖕
आवडले म्हणून पाठवले

🌹शाळा एक आठवण🌹 शुभ सकाळ

कोण कोण होत या वर्गात?
22/09/2018

कोण कोण होत या वर्गात?

शाळेसोबत सेल्फी....😘 #श्रीरंग विद्यालय...  #माझी शाळा
11/01/2018

शाळेसोबत सेल्फी....😘

#श्रीरंग विद्यालय... #माझी शाळा

15/07/2015

श्रीरंग मराठी माध्यम:

लाकोडे सर दिसल्यावर ... पळा DON !!!!

देशमुख सरांचा दिलखुलास स्वभाव!

नेहते सरांची कान पकडून मारण्याची Style !! आणि तो खिशातील famous मारायचा Antina !!

कदम सरांचे किती हि चांगले चित्र काढले तरी... चुका काढणे

पांडे सरांसारखा देव माणूस _/\_

गवारी सरांची South - Superstar ची चुणूक

कोल्हटकर madam च्या भुताच्या stories !!

लोथे मादाम madam चा अत्ति strictness !!

सुरवसे Madam चे इंग्लिश च्या lecture ला ..Donkey ... Stupid बोलण्याची सवय

गायकवाड बाईंचा ती शिकवण्याची शैल्ली

हवेलीकर बाईंचे विज्ञान शिकाव्तानाचे उच्चार

संखे बाईंचे उगाच कारण नसताना रागावणे

मोठे जाधव सरांचे मैदानातले P T चे लेक्टुरे (त्यात मुल्लांनी शोधलेले नव नवीन व्यायाम प्रकार)

कुष्टे बाईंचा वर्गात धिंगाणा वाढला कि एकदम हळू आवाजात शिकवण्याची Idea ...

तावडे सरांची फक्त ठराविक लोक्कानाच शिकवण्याची पद्धत...

आरत्कर सरांची Lecture चालू असताना हळूच सतत स्वताक्डेच बघण्याची सवय !!

गोरे बाईंचे प्रत्येक गोष्टीला असणारा विरोध .. आणि जर काही झाले कि पालकांना घेऊन ये !! बस

मधल्या सुट्टी ची ghantta वाजली कि चालू period मधून पळून जाणे

bottle च्या झाकानासोबत आबादुबी ... catch -catch खेळणे बेंच च्या फळी ची bat बनवणे

३ दिवस चालणारे स्पोर्ट्स day ... त्या निम्मिताने छापलेले t -shirts Goldengrup , मराठा warriors ... etc etc

कब्बडी मधली खुन्नस.... dodgball मध्ये होणार्री चिडाचीड

मुलींची कब्बडी बघण्यासाठी जमलेली मुलांची गर्दी

Dance Practice च्या नावाखाली दिवस भर वर्गाच्या बाहेर फिरणे
आणि dance मध्ये नसताना पण फुकटचे वडापाव खाणे

क वराग्तील मुलांचे .. अ वर्गातील मुलींवर line मारणे

होळी ला शाळेत पिशव्या फोडणे ...

अ vs क ... ह्यांच्यात ठरलेलं... आणि दर महिन्याला होणारे matter

बेंचवर कंपास पेटी वर पेन घेऊन गाण्यांवर band वाजवणे .... आणि त्यावरून शिक्षकांचा मार खाणे

विध्यार्त्यानी कर्कटक ने बेंचवर काढलेल्या कलाकृती ... भिंतीवर लिहिलेल्या कविता ... ते भिंतींवरील सामाजिक संदेश

गंगाराम मामा ... संजय मामा ह्यांच्यासोबत मित्रासारखे असणारे संभंद

मधल्या सुट्टीत पाचवीच्या वर्गात जाऊन खिचडी घेऊन खायची सवय

कॉम्पुटर च्या Lecture च्या नावाने गच्चीवर जाऊन बसने

शाळा सुटल्यानंतर एखाद्या traffic Police सारखी एक एक वर्ग सोडण्याची शिक्षकांची पद्धत

सुवर्ण दिवस ... सुवर्ण काळ

हि होती खरी "श्रीरंग मराठी विद्यालय"..हे होते खरे शिक्षक ... ज्याबद्दल आत्ताच्या विध्यार्त्यांना आणि नवीन शिक्षक्काना कधी कळणार नाही !!

Miss those dayzz!!

(ह्या मध्ये जर कोणाची भावना दुखावली गेली असेल ... तर क्षमस्व _/\_ )

Address

Shreerang Society
Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreerang Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category