Be Happy

Be Happy parents & students councelling session done here.

18/02/2021

तुमच्या साठी अत्यंत आनंदाची बातमी टॅरो कार्ड्स रिडिंग मराठीत कार्ड्स चा थोडक्यात परिचय आणि इतिहास मी "शुभ टॅरो"या माझ्या यु ट्युब चॅनल मार्फत पोहचवत आहे.ऑफलाईन व ऑनलाईन कोर्सेस चे अपडेट्स वेळोवेळी डिस्करीपशन मध्ये दिले जाईल ,ते वाचत जा.कोर्सेस साठी ९१३७१४९८००या मोबाईल क्रमांकावर आणि [email protected] या Gmail वर संपर्क करा.टॅरो कार्ड्स शिकून आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि आनंद निर्माण करा.स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला शिका.कधीच कोणावरच अवलंबून राहू नका.तुमची शारीरिक,मानसिक,आर्थिक बाजू कशी भक्कम राहिल या साठी टॅरो कार्ड्स चे नक्कीच मार्गदर्शन घ्या.आणि हे सर्व तुम्हाला शुभ टॅरो च्या माध्यमातून मराठीत शिकायला मिळणार आहे.सो अशीच उत्सुकता ताणून ठेवा.शुभ टॅरो चॅनल ला लाईक,शेअर,सबस्क्राईब करायला विसरू नका.चला तर मग छान हसत,खेळत टॅरो कार्ड्स शिकूया.

21/10/2020

Copy and paste

*👉चुक कुठे झाली ?..*
एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये नेहमी 100% मार्क मिळवले.
अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय.आय.टी. चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी. टेक. ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिव्हर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया मधून तो एम. बी. ए. झाला.
आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.
*त्याचे पाच बेडरूमचे घर होते. चेन्नईच्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....*
पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, आपल्या पुर्ण परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली.
*काय चूक झाली होती? शेवटी असं काय घडलं? गडबड कुठे झाली?*
हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले.... आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.
त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने *‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.*
सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.
*अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.*
काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नीने मुलांसह आत्महत्या केली...
*तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे यासाठीच तयार झालेली होती, परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते....*
आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या.
अभ्यासात खूप हुशार होता, नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो, ज्यांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा वा मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा, त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्यांने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात.
बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर, तेथून निघाला तर एम. बी. ए. आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. *आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे टार्गेटस्...*
*हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीटशी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.*
*हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडेवाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.*
एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती...
*एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." *There is a Horrible Jungle out There.*
*अशा या खतरनाक भयाण जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.*

*विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देणं ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितिला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.*
🙏🙏🙏🙏🙏
*शेवटी आपली मुलं आपलीच आहेत ना*

26/03/2019

नमस्कार मित्रांनो🙏
👉 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तुमचं खरंच स्वत:कडे लक्ष आहे का?☹
👉 खूप मेहनत करूनही करीअर मधे अपयश येते असं का?😟
👉 माझे कोणासोबत जास्त का पटत नाही?😞
👉 मी जे काही काम करते/ करतो ते मी खरच आनंदाने करत आहे ? की करावं लागतयं?😔
👉 माझी कोणत्याही बाबतीतील आवड/निवड माझ्यासाठी योग्य की अयोग्य?🤔
👉 एखादा निर्णय घेताना मन आणि बुद्धी वेगवेगळे संकेत देतात!तेव्हा नक्की काय करावे?❤😇
👉 मी माझ्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व आनंदी कसं राहू?👨‍👩‍👧‍👦
👉 सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा कंटाळा आलाय?😒
👆हे सर्व प्रश्न सतत तुम्हाला दैनंदिन जीवनात येत असतील तसेच काही तरी नवीन कामाला सुरुवात करून यशस्वी,आनंदी, सुबत्ता, समाधान, संपत्ती आणि महत्वाचे म्हणजे सकारात्मक विचार वाढावेत ♐☺💖
यासाठी तुमच्या बहुमुल्य वेळातुन वेळ काढून एक कॉल अवश्य करा🙏
संपर्क :- काऊन्सिलर शुभांगी खेडेकर ९१३७१४९८००/९१६७०८१०६१

11/03/2019

Do best for your child

03/03/2019

१० वीच्या परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टीव टाईप निघाल्यावर कोणा कोणास आनंद होईल?

26/02/2019

Video Showing Intelligency of child
Identify Your Chid's Intellegency?
From Best Counselling 9137149800

Best ofLuck for 12th standard students
21/02/2019

Best ofLuck for 12th standard students

Address

Happiness Tree, Patel Apartment, 1st Flr. , Opp. Mc. Donalds, Thane(W)
Thane
400602

Telephone

9137149800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Be Happy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share