06/06/2019
सायबर सेक्युरिटी क्षेत्रात भारतातील मागणी व पुरवठा... आणि माहितीचा अभाव
आपणास सर्वाना माहिती आहे की हजारो/लाखोंच्या संख्येने इंजिनीरिंग करून मुलं बाहेर पडताहेत, पण नोकऱ्या नाहीत, कारण उद्योगांच्या गरजेनुसार ते तयार होऊ शकले नाहीत. मग मिळेल त्या माहितीच्या आधारावर (त्याची शहा-निशा न करता) जास्तीचे नवीन शिक्षण घेतात आणि परत फसतात. काहींना नोकरी मिळते पण अपेक्षित पगार मिळत नाही. हीच परिस्थिती BCA, MCA, BE (IT/Comp), B.Sc. (Comp) केलेल्या विद्यार्थ्यांची पण आहे.
आज मी आपणास ह्याच म्हणजे सायबर सेक्युरिटी क्षेत्राची माहिती सांगणार आहे जिथे स्पर्धाच नाहीय. पण त्या क्षेत्रात नेमकं कसं शिरावे हीच माहिती कुणाकडे नाहीये. बाजारात अनेकांनी दुकाने मांडली आहेत पण त्यांच्याकडील कोर्स केल्यानंतर नोकरीची हमी नाहीये. कारण तुम्ही केलेल्या प्रशिक्षणाची नोंद भारत सरकार कडे होणे गरजेचे आहे, जवळपास सर्वच क्षेत्रातील MNC, तसेच IT Companies, Banking, Finance, Insurance, anti-virus companies, Cyber Security Consultants, Internet Service Providers इत्यादी क्षेत्रात खूप मागणी आहे.
आज मितीस सायबर सेक्युरिटी मध्ये भारताला कमीत कमी दीड लाख लोकांची गरज आहे, पण आतापर्यंत जे प्रशिक्षित झाले आहेत त्यांची संख्या आहे फक्त 10-12 हजार. मात्र अमेरिकेत हीच संख्या आहे ७७ हजार व चीन मध्ये दीड लाख लोक या क्षेत्रात तयार आहेत. आगामी १० वर्षात भारतात तंत्रज्ञानाचा वापर चार पटीने वाढणार आहे. वरील आकडेवारी वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की भारतात मागणी व पुरवठा यातील गॅप खूप मोठा आहे आणि या क्षेत्रातील मागणी अजून वाढतच जाणार आहे अगदी पुढील दहा - वीस वर्ष सतत मागणी वाढतच जाणार आहे कारण जेवढे आपण स्मार्ट होत जाऊ तेवढी मागणी वाढणार आहे.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पदवी (IT/Comp) किंवा networking / scripting / OS विषयांचे ज्ञान फायद्याचे ठरते.
राष्ट्रीय सुरक्षा डेटाबेस (एनएसडी) प्रमाणपत्र हे माहिती सामायिकरण आणि विश्लेषण केंद्र (आयएसएसी) कडून देण्यात येते. हे प्रमाणपत्र देशाच्या राष्ट्रीय क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अर्थव्यवस्थेचे सरंक्षण करण्यासाठी सिद्ध कौश्यल्यासह विश्वसनीय आणि भरोसेमंद माहिती सुरक्षा तज्ञांना दिले जाते.
या विषयाची अधिक माहिती करिता खालील फॉर्म भरा. या बाबतचा सेमिनार ठाणे इथे रविवारी ८ जुन २०१९ व १५ जून २०१९ रोजी दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान होणार आहे. यात आपण पालकांसह सहभाग घ्या.
https://forms.gle/vuJxxpJjW6udAjMR8
सेमिनार मध्ये खालील सर्व आवश्यक गोष्टी जसे अभ्यासक्रम, परीक्षा, इंटर्नशिप, नोकरी, आर्थिक हमी इत्यादी विषयी पूर्ण माहिती देण्यात येईल.
https://forms.gle/vuJxxpJjW6udAjMR8