08/09/2024
लेख - ११
व्यक्तिमत्त्व विकास
उत्साह कायम ठेवा
'मी हे कार्य पूर्ण करीन,' असा निश्चय करून त्या कार्याची पूर्ती करून दाखवणानी माणसे पार विरळ आढळतात, भावनेच्या भगत माणूस पुष्कळ बोलून जातो, पण प्रत्यक्ष कार्याची वेळ आली की मार्ग सरतो त्यामुळे कार्याची बढाई मारणारे खूप असतात, याबाबत म्हणीही पुष्कळ आहेत. जो गर्जेल ती पडेल काय, जो भुकेल तो चावेल काय, रिकाम्या भांड्याचा आवाज मोठा असतो, भरलेल्या भांड्याचा आवाज होत नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा अनेक म्हणी आहेत. महर्षी कर्व्यांनी स्वीमुक्तीसाठी प्रचंड कार्य केले पण ते फार कमी बोलत असत. उगीच भाषणेही देत नासत कारण त्यांना कार्य करायचे होते. म्हणून बहुसंख्य लोकांच्या बोलण्या-चालण्यात मेळ नसतो ते मोठमोठ्या गोष्टी बोलतात व करत काहीच नाहीत,
असे का बरे होते? तात्पुरता उत्साह अंगी संचारतो आणि त्या उत्साहाच्या भरात तो कामाची घोषणा करून टाकतो आणि नंतर मात्र कामाला हात घालीत नाही. जेव्हा एखादा शेजारी मृत्यू पावतो त्यावेळी सर्वांना मृत्यूचा अटळपणा सुचतो यालाच स्मशानवैराग्य म्हणतात. हे स्मशानवैराग्य स्मशानातून घरी जाईपर्यंत टिकते घरी पोहोचताच तो सर्व विसरतो. हीच स्थिती उत्साहाच्या बाबतीत असते त्याला तात्पुरता उत्साह भरपूर येतो. तो म्हणतो, 'व चने कि दरिद्रता।' परंतु जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते, तोपर्यंत सर्व उत्साह ओसरलेला असतो. तो टाळाटाळ करू लागतो. तो म्हणतो, 'आताच काय अडले आहे? मी नंतर कामाला लागेन,' असे म्हणून तो काम न करण्याची लाख कारणे शोधून काढतो. आजचे काम उद्यावर टाकू लागतो व वेळ काढू लागतो. दिवस संपल्यावर आपण एखादे काम सुरू केले होते, ही गोष्टसुद्धा तो विसरून जातो अशाप्रकारे कार्याचा सर्व खेळ संपतोच. म्हणून कार्य सुरू करून पुरे न करणे, कामाची नुसती बडबड करणे हा माणसाचा स्वभावच बनून गेला आहे. असा मानसिक दुबळेपणा बहुसंख्य माणसात आढळतो. म्हणूनच 'बोलतील ते करतील' अशी माणसे दुर्मिळ असतात. म्हटलेच आहे की, 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले'
बोलणे सोपे असते
एखाद्या गोष्टीवर विचार करणे व बोलणे सोपे असते. पण हाती घेतलेले काम तडीस नेणे फार अवघड असते. याचे मुख्य कारण निश्चयाचा अभाव हे असते. ज्या कामाचा विचार केला आहे, ते काम पूर्ण करायला निश्चयाची जरूर असते. नुसता मनात विचार आणून एखाद्या कामाची रूपरेखा ठरवून फक्त हवेत किल्ले बांधणे होते. ते काम साकार करायला निश्चय हवा असतो. आपल्या समाजातील बहुसंख्य माणसे अशी हवेत किल्ले बांधणारीच आहेत. बहुसंख्य माणसांना वैभवाची आशा असते. ते मनात म्हणत असतात, 'एक दिवस मी ही वैभव मिळवीनच.' काम मात्र करीत नाहीत. मग करतात काय? लॉटरी केंद्राभोवती गर्दी करतात व जवळचे असलेले थोडेसे पैसे घालवून बसतात.
मग तुम्ही म्हणाल, लॉटऱ्या बंद करून टाका. पण अचानक धनलाभाच्या मागे लागणे ही माणसाची सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. लॉटरी नव्हती तेव्हा मटका होता, अमेरिकन कॉटनचे आकडे होते आणि हे सर्व अवैध रितीने चालत असे. म्हणून लॉटरीवर बदी आणून काही साधणार नाही. माणसाच्या मूलभूत मनोरचनेत बदल हवा. ज्यांना लॉटरीच्या मागे लागायचे आहे, त्यांना लागू द्या. निदान तुम्ही तरी तुमच्यापुरता धडा घ्या. अचानक धनलाभ तुमच्या नशिबात नाही, हे सत्य प्रथम मान्य करा व लॉटरीत जवळचे पैसे घालवू नका.
-अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या वेळचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी २२ सप्टेंबर १८६२ रोजी गुलामांच्या स्वातंत्र्याची घोषणा तयार केली. त्यादिवशी त्यांनी डायरीत लिहिले, 'मी ईश्वराची शपथ घेऊन निश्चय करतो की मी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करीनच त्याप्रमाणे ती घोषणा त्यांनी अंमलात आणून दाखवली अर्थात् अशी उदाहरणे फार थोडी असतात.
मनात एकदा निश्चय केला की तो सतत मनात बाळगायला हवा. एक क्षणही त्या विचारापासून ढळता कामा नये. तरच तो मनुष्य आपले कार्य पूर्ण करू शकेल. अर्थात हाती घेतलेल्या कामावर वेळप्रसंगी मी प्राणही वेचेन, असा त्याचा निश्चय हवा. जेव्हा असा टोकाचा निश्चय माणूस पुनःपुन्हा करतो. त्यावेळी त्याला अपूर्व शक्ती प्राप्त होते. त्याचा निश्चय पक्का होतो. त्याला आत्मविश्वास मिळतो आणि काम करण्याची त्याची लायकी अनेक पटींनी वाढते. या योग्यतेच्या जोरावर तो आपले कार्य यशस्वी करतो. तोफेतून गोळा सुटतो, तो लांब जाऊन पडतो, त्या गोळ्याला स्वतःची शक्ती नसते. तोफ त्याला फेकते. त्याप्रमाणेच माणसाजवळ जी आत्मिक शक्ती असते ती त्याला आपल्या ध्येयाजवळ पोहोचवते. या शक्तीचे नाव निश्चय असे आहे.
वरील लेख हा ह.अ. भावे यांच्या "वैभव संपन्न होण्याचे मार्ग'" या पुस्तकातून घेतला आहे.
धन्यवाद !!
नोट : वरील लेख शेअर करण्याजोगा वाटत असेल तर तुमच्या इतर ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
Habit School च्या community ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KImwYqHMjL8F7nmdw4cVj1