The Unique Academy, Thane

The Unique Academy, Thane Competitive Examination Guidance Center specially Civil Services Central & State also...

सातारा रोड एके काळची भव्य भरभराटीस आलेली उद्योगनगरी आज अवकळा ग्रस्त..       स्वातंत्र्याच्या आधी ज्यां काही ग्रामीण भागा...
14/12/2022

सातारा रोड एके काळची भव्य भरभराटीस आलेली उद्योगनगरी आज अवकळा ग्रस्त..
स्वातंत्र्याच्या आधी ज्यां काही ग्रामीण भागानी विकासाची मधुर फळे चाखली त्यात सातारा जिल्ह्यातील सातारां शहरापासून 15 किमी दूर पाडळी हे गाव होय ,त्याच्या अगदी बाजूला सातारा रोड ही उद्योग नगरी शेठ वालचंद उद्योग समूहाने उद्योगातून जनकल्याण आणि तीच राष्ट्रसेवा असे ब्रीद स्वीकारून स्थापन केली आणि भरभराटीस आणली . स्वातंत्र्यपूर्वकालीन सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यात किर्लोस्कर, ओगले यांच्याप्रमाणे धनजीशा कूपर यांचेही योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी १९२२ साली सातारा रोड स्टेशनजवळ पाडळी येथे आपला ‘कूपर इंजिनिअरिंग वर्क्स’ हा कारखाना सुरू केला. त्या कारखान्यात प्रारंभी लोखंडी नांगर, ऊसाचे चरक, शेंगा फोडण्याचे यंत्र, मोटेचे चाक, तेलाचे घाणे इ. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांची निर्मिती होत होती. त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. धनजीशांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची ओढ होती. त्यांनी मोटारीचे नवीन इंजिन बनवून १९२६ साली महाबळेश्वर येथे मुंबईच्या गव्हर्नरला त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. १९३० च्या सुमारास हिंदुस्थानातील उद्योगक्षेत्रावर मंदीचे सावट पडू लागले. त्यावर मात करण्यासाठी डिझेल इंजिनची निर्मिती करण्याचा धनजीशांनी निर्धार केला. त्याप्रमाणे १९३३ पासून कूपर कारखान्यात डिझेल इंजिनची निर्मिती होऊ लागली. या कूपर यांना वालचंद ग्रुपने वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे.
सातारा रोड येथील अतिशय भरभराटीला आलेली उद्योग नगरी खरे तर आता.स्थानिक राजकारण कामगार चळवळीच्या अवास्तव मागण्या , काळाचा ओघ आणि औद्योगिक घराण्यांची उतरती कळा ,बदलते स्थानिक राजकारण हे सर्व जबाबदार आहे. एकेकाळी तीन चार हजार कामगार असलेला कारखाना आता अवघे उनेपुरे पाचशे कामगार ही नाहीत.
या उद्योग नगरीच्या भरभरभरात आणि उतरती कळा यावर अगदी मोठी कादंबरी होईल. साताऱ्यात अशी काय भौ गोलिक परिस्थिती होती की. कूपर यांनी खेडेगाव निवडले असावे .(पश्चिमेला जरंडेश्वर आणि पूर्वेला पारसगड याच्या मध्ये हे सातारारोड वसले आहे , सद्या सातारारोड ल रेल्वे स्टेशन नाही.) बहुधा गांधी यांच्या खेड्याकडे चला या घोषणेनंतर च असावा तर असो.
कूपर यांचा इतिहास ही अगदी समजून घेण्यासारखा आहे धनशा कूपर हे राजकारणात ही नंतर सक्रिय होते. ते व डॉ.आंबेडकर हे 1937 साली मुंबई विधी मंडळात कार्य करत होते. कूपर यांचा प्रं बोधनकर ठाकरे यांच्याशी सुध्दा चांगला स्नेह होता, हे सारे ब्राह्मणेतर गटाचे कार्यकर्ते होते हे आणखी विशेष ..
जाता जाता वाचकांच्या माहितीसाठी म्हणून वालचंद घराणे मूळचे सौराष्ट्र चे जैन दिगंबर पंथीय महाराष्ट्रात आले , आणि कूपर हे पारशी होते . या दोन्ही मोठ्या मनाच्या देशी उद्योजकांचा साताऱ्याच्या राजे घराण्याशी स्नेह होता. असो.
सातारची एक काळ अत्यंत भरभराटीस आलेली ही सातारारोड आता मात्र तसे राहिले नाही आणि मला वाटत नाही की त्याला कुणा मोठ्या भांडवलदारांच्या आर्थिक मदत किंवा ताब्यात गेल्याशिवाय पुनरुज्जीवन होणार नाही.
(आम्ही त्या भागात दि 13 डिसेंबर 22 ला भेट दिली ..)

तलाठी सेमिनार  अत्यंत उत्साहात पार पडले ,कोणतीही जाहिरात नसताना. मुले आली हेच  विशेष..सूरज ने व्यवस्थित प्लॅनिंग कसे करा...
04/12/2022

तलाठी सेमिनार अत्यंत उत्साहात पार पडले ,कोणतीही जाहिरात नसताना. मुले आली हेच विशेष..
सूरज ने व्यवस्थित प्लॅनिंग कसे करावे ,हे सुचवले , परीक्षेचे प्लॅनिंग कसे करावे हे समजावून सांगितले.सोबत सूर्यकांत सर होते.

तलाठी पदासाठी कार्यशाळा  ...मार्गदर्शक:   सूरज राठोड  राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक ,2022 निवड रविवार दि.4 डिसेंबर 22 व...
04/12/2022

तलाठी पदासाठी कार्यशाळा ...
मार्गदर्शक: सूरज राठोड
राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक ,2022 निवड
रविवार दि.4 डिसेंबर 22 वेळ अकरा वाजता,
युनिक अकादमी ठाणे .

29/11/2022

दि. 30 नो . पासून कंबाईन बॅच सुरु होत आहे .
वेळ अकरा ते एक
मार्गदर्शक : माधवी तटकरे मॅडम, जानवी सावंत, सपना बेडसे ..
विषय : , Introduction: subject, plan, strategy ..

आज  द युनिक मध्ये माधवी मॅडम यांचा वाढदिवस  उत्साहात संपन्न केला , सर्वच मुलानी उत्स्फूर्त भाषणे केली ..
11/07/2022

आज द युनिक मध्ये माधवी मॅडम यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केला , सर्वच मुलानी उत्स्फूर्त भाषणे केली ..

04/07/2022

जोरदार पाऊस आहे आज ठाण्यात दि 4 जुलै 22 .. आमची मुले अभ्यासात दंग आहेतच ..

द युनिक ठाणे येथील  अधिकारी संवाद  सत्यजित सर ,यांच्याशी संवादनसाधताना ठाणे येथील विद्यार्थी गण ..सोबत माधवी मॅडमराज्यसे...
03/07/2022

द युनिक ठाणे येथील अधिकारी संवाद

सत्यजित सर ,यांच्याशी संवादनसाधताना ठाणे येथील विद्यार्थी गण ..सोबत माधवी मॅडम

राज्यसेवा वर्णनात्मक झाली ,त्यास सकारात्मक पद्धतीने विचार करा , लेखन कला आहे . त्याने परिक्षाब सोपी झाली आहे . असे त्यांनी प्रतिपादन केले.

आजचे सेमिनार ... 23 ते 25 अभ्यास विद्यार्थ्यांच्या समोर ..       या मुलांची केवळ सुरुवात नाही तर यापूर्वी त्यांनी पूर्व ...
21/05/2022

आजचे सेमिनार ... 23 ते 25 अभ्यास विद्यार्थ्यांच्या समोर ..
या मुलांची केवळ सुरुवात नाही तर यापूर्वी त्यांनी पूर्व तयारि केली आहे, त्यांना परिक्षेच्या रचनेविषयी व्यवस्थित माहिती आहे , त्यांना आता अभ्याडतील कंटेंट हवा आहे , सिलबस चे संपूर्ण समजावून घ्याचा आहे . आणि एक दोन वर्षात क्लिअर व्हायचे आहे , तुलनेत त्यांची व्हिजन क्लिअर आहे .
सोबत प्राची मॅडम ही होत्या , त्यांनी राज्यघटना तीळ काही भाग घेतला तर काही पुस्तकांचे अवडंबर टाळा हे सांगितले .
सेमिनार संपल्यावर पालक व विद्यार्थी थांबले होते . त्यांच्याशीही विस्तृत चर्चा केली .मुला-पालकांचे समाधान हा आपला मुख्य हेतू साध्य झाला .

भूगोल,कृषी  विषयांची   तयारी ..  राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या 21 ऑगस्ट ला आहे , त्यासाठी अगदी हे तीन महिने  प्रॉपर ...
21/05/2022

भूगोल,कृषी विषयांची तयारी ..
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या 21 ऑगस्ट ला आहे , त्यासाठी अगदी हे तीन महिने प्रॉपर वेळ दिला तर पास होणे शक्य आहेच .
रोहित सर बी इ सिव्हिल असून त्यांनी upsc च्या मेन्स दिल्या आहेत ,वैकल्पिक विषय भूगोल असल्याने अगदी बारकाव्यासह भूगोल चे ज्ञान आहेच त्याचा मुलांना फायदा होतो . त्यांची लवकर् च अधिकारी म्हणून निवड होणे अपेक्षित आहे .

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी पालक सभा ..   आजवर अन्य कुणी आयोजित केली नसेल . पालकांना माहीत असायला हवे इथं पास होण...
27/03/2022

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी पालक सभा .. आजवर अन्य कुणी आयोजित केली नसेल . पालकांना माहीत असायला हवे इथं पास होण्यासाठी वेळ का लागतो ते ? स्पर्धा नेमकी किती असते ? मुलांचा अभ्यास नेमका कसा असतो ? मनाचे स्वास्थ कसे महत्त्वाचे आहे ? याची अगदी शंका निरसन ... अनुभवातून ...! आणि यशस्वी झालेल्या सायली बांगर चा सत्कार ..

मुलांना  प्रॉपर गाईडलाई न मिळणे अधिक महत्त्वाचे ..  मग ते चालू घडामोडी मधील निवडणूक असोत की युद्ध की अर्थसंकल्प .  आणि त...
10/03/2022

मुलांना प्रॉपर गाईडलाई न मिळणे अधिक महत्त्वाचे .. मग ते चालू घडामोडी मधील निवडणूक असोत की युद्ध की अर्थसंकल्प . आणि त्याबरोबर राष्ट्रीय नेत्यांची जयंती ..की आपल्याच मुलांचा सत्कार .. या निमित्ताने गाईडलाईन मिळणारच .

मुलांना  प्रॉपर मार्गदर्शन मिळणे अधिक महत्त्वाचे ..     चालू घडामोडींचे विश्लेषण मग ते युद्ध असो की   निवडणूक  .. की पुर...
10/03/2022

मुलांना प्रॉपर मार्गदर्शन मिळणे अधिक महत्त्वाचे ..
चालू घडामोडींचे विश्लेषण मग ते युद्ध असो की निवडणूक .. की पुरस्कार की अर्थसंकल्प नीट व्हायला च हवे .की आपल्याच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सत्कार ..!

Address

66, Talav Pali Opp Zilha Parishad Near Hotel Amantran, Thane West
Thane
401006

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am

Telephone

8879495355

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unique Academy, Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Unique Academy, Thane:

Shortcuts

Share

Category