Trimurti Coaching Classes (Thane)

Trimurti Coaching Classes (Thane) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Trimurti Coaching Classes (Thane), Tutor/Teacher, Chitalsar Manpada, Thane.

SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक(मराठी/सेमी इंग्रजीसाठी)
20/02/2026

SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक
(मराठी/सेमी इंग्रजीसाठी)

तुमची लेखणी त्रिशूळातील एक शूळ होऊ दे...पुस्तके तुमचे तिसरे नेत्र होऊ दे...तुमचे परिश्रम हीच तुमची साधना होऊ दे...तुमचे ...
15/02/2026

तुमची लेखणी त्रिशूळातील एक शूळ होऊ दे...
पुस्तके तुमचे तिसरे नेत्र होऊ दे...
तुमचे परिश्रम हीच तुमची साधना होऊ दे...
तुमचे यश तांडव करू दे...

*महाशिवरात्रीच्या या पावन पर्वात चला शपथ घेऊया,
आपल्या पाल्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्य मिळवून देऊया.*
-त्रिमुर्ती कोचिंग क्लासेस.
*संचालक : श्री. निलेश तुकाराम वामन सर*

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे...!!शु...
14/01/2026

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे...!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे...!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
*“मकरसंक्रातीनिमित्त खूप खूप शुभेच्छा”*

दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ।।अमूप जोडिल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी नाही आता ।।धन्य दिवस आजी झ...
21/10/2025

दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ।।
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी नाही आता ।।
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामी ।।
तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेऊ पायी संताचिया ।।
चला अज्ञानाच्या तिमिरकडून, ज्ञानाच्या प्रकाशमार्गाकडे जाऊ या.

*दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।चतु:वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।नरक चतुर्दशीच्या आपणांस आणि आपल्या परिवारास हा...
20/10/2025

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु:वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।
नरक चतुर्दशीच्या आपणांस आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांग...
02/10/2025

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥
*-जगद्गुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज.*

शिक्षण हेच सोनं, शिक्षणच असे लेणं।
शिक्षणाचा अनादर, जिवा लागेल घोर।।
शिक्षणाच्या वाटे, असती बहुत विंचू काटे।
तोल संभाळुनी चाले, त्याचे आयुष्य सफल झाले।।
*-©निलेश वामन सर*

सोनेरी पर्व, सोनेरी क्षण...
सोनेरी आठवणी, सोनेरी मन...
सोन्यासारख्या असणाऱ्या तुम्हाला,
*विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.*

#विजयादशमी #दसरा

नवविधा भक्तीची ही नवरात्र,करी रक्षण अंबा अहोरात्र...आई दुर्गेची करुनिया सेवा,अहंकार तिच्या चरणी ठेवा...लोभ महिषासुर मातल...
22/09/2025

नवविधा भक्तीची ही नवरात्र,
करी रक्षण अंबा अहोरात्र...
आई दुर्गेची करुनिया सेवा,
अहंकार तिच्या चरणी ठेवा...

लोभ महिषासुर मातला मग्रूर,
विनाश कराया येई तू सत्वर...
क्रोध घालितो हा नाच नंगा,
तारी लेकरा धाव तू *मळगंगा...*

आई जगदंबा देई आशिर्वाद,
मत्सर जीवाचा सरो निर्विवाद...
किती गाऊ महती तुझी आई,
दे विसावा मजला तुझ्या पायी...

शब्दांकन - ©निलेश तुकाराम वामन सर

नवरात्रोत्सव तसेच घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो... हीच सदिच्छा...

तू बुद्धिदायक,सिद्धिविनायक,तूच सकळ विद्यांचा दाता...तू गणनायक,अष्टविनायक,तूच तारी भक्तांना आता...© निलेश वामन सर*श्री गण...
27/08/2025

तू बुद्धिदायक,
सिद्धिविनायक,
तूच सकळ विद्यांचा दाता...
तू गणनायक,
अष्टविनायक,
तूच तारी भक्तांना आता...
© निलेश वामन सर

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*
*गणपती बाप्पा मोरया,*
*मंगलमूर्ती मोरया*
🙏🙏🙏🙏🙏

"दिन-स्वतंत्र्याचा, उत्सव-जनांचा, मान-तिरंग्याचा, असे आज" ."कित्येकाने केला त्याग, दिली प्राणांची आहुती, देश स्वातंत्र्य...
15/08/2025

"दिन-स्वतंत्र्याचा, उत्सव-जनांचा, मान-तिरंग्याचा, असे आज" .
"कित्येकाने केला त्याग, दिली प्राणांची आहुती, देश स्वातंत्र्य होतांना, झाली आतुर धरती"
*भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

Address

Chitalsar Manpada
Thane
400607

Telephone

+919819484063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimurti Coaching Classes (Thane) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Trimurti Coaching Classes (Thane):

Shortcuts

Share

Category