Vidya Bharti Kokan Prant

Vidya Bharti Kokan Prant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidya Bharti Kokan Prant, Educational Research Center, Vasant Shree Apt, Plot No 245, A M P Gate Kansai Vibhag Ambernath East, Thane.

29/01/2026
विद्याभारती कोंकण प्रांत आयोजित NCF अभ्यासवर्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आधारितNCF, ECCE, FLN नेमके काय ?शिक्षकाची भू...
24/01/2023

विद्याभारती कोंकण प्रांत आयोजित NCF अभ्यासवर्ग
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आधारित

NCF, ECCE, FLN नेमके काय ?
शिक्षकाची भूमिका काय ? काय करावे लागेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा.

दि. 4 व 5 फेब्रुवारी 2023
ठिकाण -पेंढरकर सभागृह, टिळक नगर विद्यामंदिर, डोंबिवली

लवकरात लवकर पुढील लिंकवर नाव नोदणी करा.
http://surl.li/emsxd

14/10/2022

नमस्कार,

दिवसभराची धावपळ, अभ्यासाचा भरमसाठ व्याप, दगदग आणि फास्टफूडच्या जीवनशैलीत आपल्यासमोर व मुलांसमोर आव्हानं आणि अडचणीचं जास्त. आयुष्य खरंच इतकं गुंतागुतीचं आहे का ? आरोग्य विषयक इतके गंभीर प्रश्न आहेत का ? आणि असतीलच तर का ? याचं उत्तर शिक्षणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास आपण घडूच देत नाही. त्याला विविधांगानं विकसित होऊच देत नाही. म्हणूनच मुलांचं शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ व्हावं, त्यांना आनंदी व तणावमुक्त, दिलखुलास, मस्त वावरता यावं आणि सोबत आपली संस्कृतीही जपता यावी यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक आगळीवेगळी संकल्पना...

मैत्री मातृभूमीशी... Let's visit our roots आपल्या पारंपारिक भारतीय जीवन शैलीचे संगीत, मैदानी खेळ, आयुर्वेद, गो-संगोपन असे विविध पैलू आहेत. या सर्वांची ओळख आपल्याला आहेच, ती मुलांनाही व्हावी या उद्दिष्टाने 'विद्याभारती' आयोजित करीत आहे, चार दिवसांचे निवासी शिबिर ज्यात जाग येईल पक्षांच्या किलबिलाटाने आणि झोप लागेल मंद संगीताच्या साथीने. या शिबिराचा लाभ मुलांना अष्टपैलू व सुजाण नागरिक बनवण्यासाठी नक्कीच होणार आहे. मग वाट कसली बघताय, निसर्गाच्या सानिध्यात मजा करूया, खेळूया आणि अनुभव समृद्ध होऊया.

◆ मैत्री मातृभूमीशी- Let's visit our roots (निवासी शिबीर)
◆ वयोगट- वयवर्षे १० ते १६
◆ शुक्रवार, दि. ०४ नोव्हेंबर २०२२, सकाळी १०:०० ते सोमवार, दि. ०७ नोव्हेंबर २०२२, सायं. ०५:००
◆ स्थळ- विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
◆ शुल्क- ₹ १९५०/- मात्र
◆ दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी

नोंदणीकर्ता लिंक -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUZdzLVFg3E6GJ6nt48IclgTgb14m9ZlW1Favr1CACZOUlfQ/viewform?usp=sf_link

शुल्क भरण्यासाठी बँक खाते तपशील -
नाव- विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती चिपळूण
बँक- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - चिपळूण
बचत खाते क्र. - 60292952662
IFSC - MAHB0000296

अधिक माहितीसाठी -
डॉ. सौ. अश्विनी गणपत्ये 9527297400
श्री. प्रसाद सनगरे 9422054962 यांच्याशी संपर्क साधावा.

13/08/2022

रत्नागिरी जिल्हा वृत्त
#संवादभारती

13/08/2022

सिंधुदुर्ग जिल्हा - क्रियाकलाप
#संवादभारती

13/08/2022

सिंधुदुर्ग जिल्हा वृत्त
#संवादभारती

13/08/2022

मुंबई महानगर
क्रियाकलाप

#संवादभारती

04/04/2022

#विद्याभारती

विद्याभारती सिंधुदुर्ग जिल्हा
जिल्हा वृत्त -
इ-पत्रिका - संवादभारती

 #बाल_स्वातंत्र्यसेनानी #बाल_बलिदानी  #बालयोद्धे  #स्वातंत्र्यसेनानी  #भारतीय_स्वातंत्र्यसमर  ोद्धे स्वातंत्र्याच्या अमृ...
02/03/2022

#बाल_स्वातंत्र्यसेनानी
#बाल_बलिदानी #बालयोद्धे #स्वातंत्र्यसेनानी #भारतीय_स्वातंत्र्यसमर ोद्धे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेऊन येत आहोत,

"स्वातंत्र्य संग्रामाचे बाल बलिदानी" हे पुस्तक

पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे या पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या बालकांच्या सत्यकथा आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात कूठेही 'बाल' स्वातंत्र्य योद्द्यांचा समावेश करण्यात आला नव्हता, मुलांना या योद्ध्यांपासून प्रेरणा मिळावी, राष्ट्रभावना जागृत व्हावी हाच या पुस्तकामागील हेतू आहे.

सदर पुस्तकाचे शुल्क नाममात्र ₹ ४० असून त्यावर शिक्षणसंस्था व शाळा यांना १०% सूट देण्यात येणार आहे, तरी याचा लाभ आपण घ्यावा, ही विनंती.

Vidya Bharati Akhil Bhartiya Shiksha Sansthan

     #पुस्तक_विमोचन  #कुरुक्षेत्रविद्याभारती संस्कृती शिक्षा संस्थान द्वारा आदरणीय श्री लज्जारामजी तोमर लिखित 'भारतीय शि...
27/02/2022



#पुस्तक_विमोचन
#कुरुक्षेत्र

विद्याभारती संस्कृती शिक्षा संस्थान द्वारा
आदरणीय श्री लज्जारामजी तोमर लिखित 'भारतीय शिक्षा के मूलतत्त्व' पुस्तक विद्याभारती कोंकण प्रांताकडून मराठीत भाषांतरित करण्यात आले आहे. या पुस्तकाचा अनुवाद कै. श्री. माधवराव कुलकर्णी यांनी केला आहे. सदर पुस्तकचे प्रकाशन आज कुरुक्षेत्र येथे करण्यात आले आहे. सदर मराठी अनुवादित पुस्तकाचे अनावरण मा.डॉ. कृष्ण गोपाल (सह सरकार्यवाह, रा.स्व.संघ), डॉ. गोविंद प्रसाद शर्मा (अध्यक्ष, राष्ट्रीय पुस्तक न्यास), डॉ. रामकृष्ण राव (अध्यक्ष, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान) व डॉ बिना शर्मा (निदेशक, केंद्रीय हिंदी संस्थान) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रांत अध्यक्ष मा.श्री. प्रदीपजी पराडकर उपस्थित होते.
यावेळी अनुवादक कै. श्री. माधवराव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांच्या वतीने प्रांत अध्यक्ष श्री. प्रदीपजी पराडकर यांनी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ याचा स्वीकार केला.
निवेदनात श्री अवनीशजी भटनागर (मंत्री, विद्याभारती अ. भा. शिक्षा संस्थान) यांनी 'मराठी राजभाषा दिनी' सदर पुस्तकाचे प्रकाशन होत असून हा दुग्धशर्करायुक्त योग असल्याचे म्हटले आहे.

Vidya Bharati Akhil Bhartiya Shiksha Sansthan

25/01/2022

मुंबई जिल्हा - क्रियाकलाप

Address

Vasant Shree Apt, Plot No 245, A M P Gate Kansai Vibhag Ambernath East
Thane
421501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidya Bharti Kokan Prant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vidya Bharti Kokan Prant:

Shortcuts

Share