11/04/2022
निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण -
E learning platform for rural education in Marathi
11/04/2022
निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण -
09/03/2022
*निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण*
शेती माल किंवा शेती मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणे व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर तर आहे व तसेच सर्वसामान्यालाही सहज शक्य आहे. परंतु यासाठी निर्यात व्यवसायाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त मराठी तरुणांना निर्यात व्यवसाय सुरु करता यावा हा या हेतूने विनामूल्य व्हॉट्सॲप कोर्स तयार केला आहे. व्यवसायाबाबत माहिती ५ दिवसात टप्प्याटप्पयाने दिली जाईल.
*कोर्स जॉईन करण्याची अंतिम तारीख २३ मार्च*
आपल्याला निर्यात विषयक प्राथमिक माहिती हवी असल्यास खालील लिंक वरून ग्रुप जॉईन करा:
निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite
https://shiku-elearning.blogspot.com/2022/01/shikuin.html
'निर्यात व्यवसाय - व्यावहारिक प्रशिक्षण' कोर्सचे shiku.in वर प्रक्षेपण शेती माल कसा निर्यात करावा व निर्यातीची कार्य प्रणाली काय यावरील अनेक व्यावहारिक विषयांवर कोर्स शृंखला तयार करण....
15/02/2022
शेतीमाल निर्यात याबाबत माहिती
निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite
14/02/2022
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1725984
वर्ष 2020-21 मध्ये कृषी निर्यातीत भारताने नोंदवली लक्षणीय वाढ नवी दिल्ली, 10 जून 2021 देशाच्या कृषी निर्यात क्षेत्राने वर्ष 2020-21 मध्ये उत्तम कामगिरी क
*निर्यातीसाठी समूह सक्रीयीकरण:*
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने(DoC) समूहांच्या सक्रीयतेसाठी APEDA च्या माध्यमातून अन्न उत्पादन संघटना आणि निर्यातदार यांना जोडण्याकरिता हस्तक्षेप केला. या जोडणीनंतर मालवाहतूक किंवा माल पाठविण्याच्या प्रक्रियेतील समस्या सोडविण्यात आल्या आणि भूबद्ध (land locked) समूहांकडून निर्यातीला प्रारंभ झाला.
या काही यशोगाथा :
*नागपूर क्लस्टर (संत्री ):*
115 मेट्रिक टन नागपूर संत्री आणि अंबियाबहार हंगामातील 45 मेट्रीक टन संत्री ((प्रथमच) समुद्रमार्गे मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात करण्यात आली आणि मोठी सुपरमार्केट्स म्हणजेच लुलू सुपर मार्ट, सफारी मॉल, नेस्टो इत्यादी मध्ये पुरविण्यात आली.
*डाळिंब क्लस्टर, महाराष्ट्र*
- वर्ष 2020-21.मध्ये सोलापूर क्लस्टरमधून 32,315 मेट्रिक टन डाळिंबाची निर्यात करण्यात आली.
*केळी क्लस्टर, महाराष्ट्र* - वर्ष 2020-21. दरम्यान केळीचे सोलापूरहुन 3278 , जळगावहून 280 आणि कोल्हापूर येथून 90 कंटेनर निर्यात करण्यात आले आहेत.
*कांदा क्लस्टर,*
महाराष्ट्र - जानेवारी ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व देश, बांगलादेशमधील विविध ठिकाणी 10,697 मेट्रिक टन ताज्या कांद्याची निर्यात करण्यात आली.
*द्राक्षे क्लस्टर* ,
महाराष्ट्र - वर्ष 2020-21. दरम्यान आतापर्यंत 91,762 मेट्रिक टन ताज्या द्राक्षांचे 6797 कंटेनर्स नाशिक क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियनला निर्यात करण्यात आले आहेत. सांगली क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये 13,884 मेट्रिक टन द्राक्षाचे 1013 कंटेनर आणि मनुकांचा एक कंटेनर निर्यात करण्यात आला आहे.
हे क्लस्टर्स कमी किंवा कोणत्याही अतिरिक्त गुंतवणूकीशिवाय विद्यमान स्रोतांचा वापर करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्लस्टर्सकडून नियमितपणे निर्यात होत आहे.
13/02/2022
प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला : प्रक्रियाकृत फळे व भाजीपाला निर्यातीत प्रामुख्याने वाळवलेल्या व आंबवलेल्या भाज्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वाळवलेले आले, कांदा, मश्रुम, लसूण, बटाटे इत्यादी. मिठाच्या अथवा साखरेच्या पाण्यातील किंवा व्हिनीगर यामध्ये टिकलेल्या भाज्या, फळांचे पल्प व ज्युसेस, वेगवेगळ्या डाळी इत्यादी. शेतीमालाच्या निर्यातीत प्रक्रियाकृत फळे व भाज्या यांचा हिस्सा ७.४% इतका आहे. यांची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, रशिया, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UAE, चीन इत्यादी देशांना होते. प्रक्रियाकृत फळ व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यातून होते.
प्रभाकर फाउंडेशन – shiku.in आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न पहा. स्वप्न पहाल तर साध्य कराल. तुमच्या आत्मविश्वाला शिक्षणाची जोड मिळाली तर तुमचं .....
13/02/2022
Govt expects millet exports to increase exponentially in coming years Currently, India is the fifth largest exporter of millets in the world. In 2020-21, India exported millets worth $26.97 million against $28.5 million in 2019-20.
फुलशेती : फुलशेतीत मुख्यत्वेकरून गुलाब, एन्थुरिअम, जर्बेरा, कार्नेशन, शेवंती यासारखी फुले, कुंडीतील फुलझाडे, ग्रीनहाऊस मधील फुलशेती, इत्यादींचा समावेश होतो. भारताच्या शेतीमाल निर्यातीत फुलशेतीचा वाटा लहान आहे. शेतीमालाच्या केवळ ०.९% निर्यात ही फुलशेतीची आहे. परंतु भारत सरकारने फुलशेती उदयोन्मुख उत्पादन घोषित केले आहे व त्याच्या निर्यातीस प्राधान्य दिले आहे. फुलशेती निर्यात प्रामुख्याने अमेरिका, नेदरलँड, UAE, UK आणि जर्मनी या देशांना केली जाते. फुलशेतीची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यातून होते.
महाराष्ट्रातून जास्तीतजास्त शेती मालाची निर्यात व्हावी हा प्रमुख उद्देश.
12/02/2022
शेती व शेती संलग्न मालाची निर्यात कशी करावी याबाबत माहिती या ग्रुप मध्ये दिली जाईल. व्यवसायाच्या वेगवेगळया भागांवर माहिती टप्या टप्याने दिली जाईल...
महाराष्ट्रातून जास्तीतजास्त निर्यात व्हावा हा प्रमुख उद्देश...
निर्यात व्यवसाय WhatsApp Group Invite
ताजी फळे व भाजीपाला निर्यात:
भारताच्या ताज्या फळांच्या निर्यातीत प्रामुख्याने द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब, आंबे, पेरू, इत्यादींचा समावेश होतो. तर ताज्या भाज्यांत आलं, बटाटा, कांदा, वांगी, कोबी, इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. शेती मालाच्या निर्यातीत ताजे फळ व भाजीपाल्याचा ६.५% हिस्सा आहे. ताजी फळे व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने बंगला देश, UAE, नेदरलँड, नेपाळ, मलेशिया, UK, श्रीलंका, ओमान, कतार इत्यादी देशांना होते. ताजे फळ व भाजीपाला यांची निर्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात, बिहार, पंजाब इत्यादी राज्यातून होतो
शेती व शेती माल कसा निर्यात करावा याबाबत सविस्तर माहिती घ्या...
www.shiku.in
| Monday | 9:30am - 6pm |
| Tuesday | 9:30am - 6pm |
| Wednesday | 9:30am - 6pm |
| Thursday | 9:30am - 6pm |
| Friday | 9:30am - 6pm |
| Saturday | 9:30am - 1:30pm |