ज.ए.इ.चे मो.ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे
वार्षिक पारितोषिक समारंभ 2025-26
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक तसेच मो. ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संजय जाधव विद्यार्थ्यांबरोबर नृत्य सादर करताना व शाळेच्या आठवणीत रमताना!!!!!!
M H High School & Jr College of Science, Arts & Commerce, Thane
#MHHighschoolThane
General Education Institute's M. H. Highschool & Jr. College.
20/12/2025
ज.ए.इ.चे मो.ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे झळकले ठाणे वैभव मध्ये !!!
ठाणे वैभव वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात 21 शाळा सहभागी झाल्या होत्या .
वेदांत आणि आलिशा मान्यवरांना प्रश्न विचारताना.
अभिनंदन
आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका व संचालक मंडळ सदस्या सौ स्नेहा गणेश शेडगे यांना ब्राह्मण सेवा संघाचा.२०२५/२६ चा'आदर्श शिक्षिका पुरस्कार 'जाहीर झाला 💐💐
मो. ह. परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन 💐💐
कार्यक्रम नौपाडा येथे संघाच्या कार्यालयात संध्याकाळी ५.०० वाजता संपन्न झाला .
08/08/2025
‘वृक्षबंधन’ उपक्रमाने ठाण्यात दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ठाणे, ७ ऑगस्ट २०२५:
वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात विद्यालयाच्या स्काऊट-गाईड पथकातील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी परिसरातील देशी वृक्षांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘वृक्ष रक्षण’ आणि ‘संवर्धन’ करण्याचा संकल्प केला. शाडू माती, धान्य, सुकलेली फुलं, पुनर्वापर केलेला कागद, कापड व बीजांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जैवविघटनशील राख्या तयार केल्या.
कार्यक्रमात राखीची पालखी साकारून ती मिरवणूक स्वरूपात तलाव परिसरात फिरवण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “पर्यावरण संवर्धन करा”, अशा घोषणांनी परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
कार्यक्रमात ताम्हण (राज्यफूल), पिंपळ, हिरवी सावर, कदंब यांसारख्या देशी वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. हे वृक्ष जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
“वृक्षबंधन उपक्रम म्हणजे निसर्गाशी एक आपुलकीचं नातं जपण्याचा आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सशक्त प्रयत्न आहे.”
– प्राचार्य विकास पाटील, मो. ह. विद्यालय, ठाणे
“या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरण जागरूकता पोहचवणे, देशी वृक्षांचे महत्त्व पटवून देणे आणि सणांमध्ये शाश्वतता जपणे हा मुख्य उद्देश होता.”
– चित्रा म्हस्के, प्रकल्प अधिकारी, वनशक्ती संस्था
या कार्यक्रमात शिक्षक सुनील पाटील, स्नेहा शेडगे, मारुती सोनामोरे, श्वेता झाडे, देवेंद्र पाटील, प्रणाली शेंबेकर, संगीता धनकुटे, अरुणा पाटील तसेच वनशक्ती संस्थेचे फिरदोस खान यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
ज. ए. इ. चे मो.ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे, केवणी दिवे शाळा वृक्षारोपण सोहळा 2025
11/07/2025
"गुरुपौर्णिमा उत्सव 10 जुलै"
"शाळेने केलेला सत्कार हा माझा शेवटचा सत्कार असेल, न्यायमूर्ती मा श्री अभय ओक."
मो. ह. विद्यालय रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अभिरुची मंडळ, रमेश परमार कनिष्ठ महा विद्यालयाचे हे वर्ष सुवर्णंमहोत्सवी वर्ष आहे.
मो. ह. विद्यालयात 30 वर्षापूर्वी संस्कृत चे शिक्षक आचार्य सरांनी आजी माजी शिक्षक पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली. यावर्षी आजी शिक्षिका सौ. कृपा घाग वं माजी शिक्षिका सौ. विजया यादव तसेच शिक्षकेतर सहकारी श्री. मनोहर दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री.अभय ओक उपस्थित होते. या प्रसंगी मराठी भाषेचे महत्व त्यांनी विषद केले. न्यायालयात काम करताना इंग्रजी भाषेचा जास्त उपयोग होतो. तरीही मला कधीही भाषेची अडचण आली नाही, कारण माझ्या मराठी शाळेने माझ्या इंग्रजी भाषेची उत्तम तयारी करून घेतली होती.मराठी माध्यमात शिकल्याचा न्यूनगण्ड कधीही मला वाटला नाही.
त्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शाळेने केलेला सत्कार हा माझा शेवटचा सत्कार असेल, असे जाहीर केले.
कार्यक्रमा साठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री., शैलेंद्र साळवी, अभिरूची मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र तामरस उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले.
04/07/2025
आज दिनांक 4 जुलै रोजी मो .ह विद्यालय केवणी भाग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय परिसरात आंबा, मोगरा, झेंडू जांभूळ जास्वंद सदाफुली मखमली, आवळा आणि पपई
या वृक्षांची रोपे लावली.
29/06/2025
मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा तर्फे यश निश्चिती उपक्रम मो.ह. विद्यालय, ठाणे येथे घेतला. त्यावेळी संवादक सुवर्णा रणसुभे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या समस्येवर विविध उपाय सांगितले. तसेच त्यांच्या सहाय्यक कल्पिता आचरेकर, संजीवनी जोशी, व बोरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रयत्न रहस्य हे पुस्तक भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनुकटे मॅडम यांनी केले व शाळेचे पर्यवेक्षक सोनमोरे सर यांनी आभार मानले.
G.E.I's M.H.Highschool, Thane
आज पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित पर्यावरण शाळेच्यावतीने कुंडीतील रोपाची लागवड या विषयावर मनाली धांडेरे आणि अंजली लेले यांनी कुंडीतील रोप कसे लावावे त्याची निगा कशी राखावी याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच पर्यावरणात झाडांचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याने कुंडीत एका रोपाची लागवड करून याची काळजी घेण्याचा संकल्प या कार्यशाळेच्या निमित्ताने केला.
या कार्यशाळेचे आयोजन मो. ह. विद्यालयाच्या पर्यावरण विभाग प्रमुख श्रीमती पांचाळ मॅडम यांनी केले होते.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ धनुकटे मॅडम यांनी तज्ञांचे आभार मानले.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक सोनमोरे सर व वाळंज सर उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Shivaji Path, Opp. Kalyan Jewelers, Naupada
Thane
400601