11/03/2026
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन प्रशालेत साजरा
टाकळी (टें) | दिनांक : ११ मार्च २०२६
श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाकळी (टें) येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन (पुण्यतिथी) श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रतिमापूजन करून महाराजांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या अतुलनीय धैर्य, स्वाभिमान व निष्ठा, तसेच त्यांचे शिक्षण व विद्वत्ता, संघटन कौशल्य आणि स्त्री सन्मानाबद्दलचे विचार याबाबत माहिती सांगितली. तसेच बलिदान दिन व बलिदान मास यांचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले अद्वितीय बलिदान आणि त्यांचे राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-26