23/10/2019
https://t.me/swavalambibharat
https://www.youtube.com/channel/UC76MgXJ7ve_Xn1lVnHaHQmA
सावधान! सावधान!! सावधान!!!
आपण मुलांबाळांना वाढलेल्या ताटात व आपल्याही ताटात विष तर नाही ना
फक्त डोळ्यांना जे आवडेल ते आपल्या आरोग्यासाठी योग्यच असेल असे नाही
फळे, भाजीपाला, धाण्य, कडधाण्य वा अण्य कुठलेही शेती उत्पादने रंग व आकार याला भुरळुन जाऊ नका ही उत्पादने आपल्या शरीरासाठी अपायकारक तर नाहीत ना? यात भयानक रासायनिक खते व विषारी किटकनाशके तर नाहीत ना? याची खात्री करा
कारण कँन्सर, हार्टअँटक, डायबेटीज सारख्या अनेक भयंकर आजारांचे झपाट्याने वाढणारे प्रमाण व या आजारांच्या वयाचे प्रमाण कमी होऊन अगदी लहान मुलांनाही विळख्यात घेतले आहे
पंजाब राज्यातील असे एकही कुटुंब नाही ज्या कुटुंबात कँन्सरचा रूग्ण नाही हे रूग्ण उपचारासाठी राजस्थान येथील हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी ज्या ट्रेनने प्रवास होतो त्याचे नाव कँन्सर ट्रेन असे केले आहे या संबंधीत व्हिडीओ पहाण्यासाठी युट्युवर " कँन्सर ट्रेन" आणि "Poison on Platter in Marathi" या नावाने सर्च करा
हे कँन्सरचे प्रमाण झपाट्याने का वाढते आहे याचा शोध घेण्यात आला
तेव्हा हाती आलेल्या अहवालात म्हटले की एवढ्या मोठ्या प्रमाणात कँन्सर होण्याचे कारण म्हणजे अन्न व पाण्यामध्ये असलेले विषारी अंश
हे विष आले कुठुन?
तर शेतातून
कृषि रसायनांच्या घातक परिणामांच्या बाबतीत आमच्या देशात जनता आणि शासन दोन्ही स्तरावर प्रचंड उदासीनता आहे. जगात अन्यत्र बंदी असलेली ६६ कीटकनाशके देशात वापरात आहेत. कृषि मंत्रालयाद्वारे केल्या गेलेल्या पाहणीत १२.५ टक्के नमुन्यांमध्ये मान्यता नसलेल्या कीटकनाशकांचे अंश आढळले (सप्टें. २०१५ मध्ये प्रकाशित अहवाल). याचा अर्थ देशात कृषि रसायनांच्या वापराला आणि उत्पादनाला कायदा आणि नियमांचे बंधन नाही. एकीकडे संसदेत सांगितले जाते की कीटकनाशक अधिनियम १९६८ अनुसार सुरक्षिततेचा विचार करूनच कीटकनाशकांना मान्यता दिली जाते आणि दुसरीकडे मान्यता नसलेल्या कीटकनाशकांचा देशात सर्रास वापर होतो.
या समस्या फक्त पंजाब पुरत्या मर्यादित आहेत याचा परीणाम आमच्या पर्यंत अजून नाही असे जर विचार करत असाल तर शुध्द मुर्खपणा ठरेल कारण असे कोणतेही राज्य, जिल्हा, तालुका, गाव नाही जेथे रसायनिक खते व विषारी किटकनाशके वापरली जात नाही
अशी विषारी रसायनें राष्ट्रपतींपासून तर झोपडपट्टीपर्यंत सर्वांच्याच ताटात येतात. मग त्यात आपणही आलोच
शेतात वापरलेली रसायने विहिरीतील पाण्यात उतरतात,
ओढ्यानाल्यातून नदी, तलावात व तेथून थेट नळाला (फिल्टर? करून)
*कृषिविद्यापिठातील तज्ञांचा सल्ला*
शेतक-यांसाठी भरपूर उत्पादन देणारे नविन वाण विकसित करण्यात आले असून आकर्षक रंग, मोठ्या आकराचे अमुक रोगाला प्रतिकार करणारे हायब्रिड वाण विकसीत करण्यात आले असून अधिक उत्पादनासाठी एकरी.....(रासायनिक खते) वापरावी
व वेळापत्रकानुसार ..... (रासायनिक औषधांच्या) आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात अशा प्रकारच्या मोहीत करणाऱ्या जाहिराती केल्या जातात दुर्दैवाने कृषिविद्यापिठातील तज्ञ अधिकरीसुध्दा या जाहीरातीत सहभागी होतात आणि नेमके याच मुळे शेतकरी या मोहजालात पुरता फसतो
शेतकरी हा जगाचा अन्नदाता पालनहार आहे
परंतू या अन्नदात्या शेतकऱ्याचा दानव राक्षस केला शेतकऱ्याच्या पैशावर नजर ठेऊन त्याला परावलंबी केले हायब्रिड बियाणे देऊन पौष्टिक बियाणे संपवले, विषारी औषधे, रसायनिक खते देऊन विषयुक्त व परावलंबी करून कायम तोट्याच्या खाईत लोटले
फळांचे औषधी गुण पाहिले तर मधुमेह, कर्करोग ( कँन्सर) , लठ्ठपणा., या सारखे अतिभयानक आजार दुर करण्यासाठी लागणारे औषधी गुण यात आहेत
परंतू हे आजार नसलेल्या व्यक्तीने विषयुक्त फळे खाल्ले असता हे आजार मात्र होऊ शकतात
या सर्वांना एकमेव पर्याय म्हणजे
*झीरो बजेट नैसर्गीक शेती*
या तंत्रचा वापर करणारे शेतकरी हे अनेकविध पौष्टिक, चवदार अशी देशी बियाणे वाणांचा
शोध घेऊन त्यांचे संवर्धन व उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहे आकाराने जरी लहान असतील व कींमतीने जास्त असतील तरी अशा पौष्टिक वाणांच्या शेतमालाची मागणि व खरेदी करून या चळवळीला हातभार लावा
या तंत्रात कुठल्याही प्रकारचे रासायनिक वा अन्य प्रकारच्या खतांचा वापर न करता फक्त देशी गायीच्या शेण, गोमुत्र व गुळ, बेसन पिठ या पासून *जिवामृत* तयार करून शेतातील पिकांना देतात त्यामुळे जिवाणू व गांडुळांची वाढ होऊन पिकांचे चांगल्या प्रकारे पोषण होते
तसेच पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कुठल्याही प्रकारचे घातक विषारी रासायनिक वा अन्य प्रकारचे औषधे न फवारता
झीरो बजेट नैसर्गीक शेती तंत्रात कडूनिब, सिताफळ, पपई, टणटणी, निरगुड, बेशरम इ. अनेक औषधी गुण असलेल्या दहा वनस्पतीचा पाल्यांपासून तयार केलेले *दशपर्णीअर्क* तसेच कडुनिबाच्या निंबोळी कींवा पाल्यापासुन तयार केलेले *निमास्त्र*
मिरची, लसूण, आद्रक, हळकुंड इ. पासून तयार केलेले *अग्निअस्त्र*
हिंगापासून तयार केलेले *हिंगराज*
या सारखे अनेक औषधे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरीच स्वतः तयार कले जातात
*विषमुक्त असल्याबद्दलची खात्री*
रसायनयुक्त व विषारी असलेल्या शेतमालालाही विषमुक्त असल्याचे प्रमाणिकरण मिळाल्याचे अनेक उदाहरणे असताना झीरो बजेट नैसर्गीक शेतीतंत्राने उत्पादित केलेला शेतमाल विषमुक्त कसा? 100% नैसर्गिक व विषमुक्त कशावरून ?
प्रश्न अगदी बरोबर आहे.
आज जेंव्हा झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आपले धान्य,फळे व भाजीपाला विकतायत तेंव्हा साहजिकच प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे .कुठल्याही प्रमाणिकरणा शिवाय इतक्या मोठ्या स्तरावर हे आंदोलन कसे शक्य आहे ?
मित्रांनो ! हे क्रांतीकारी आंदोलन फूलतय ते शेतकरी व ग्राहक यांच्यातील परस्पर विश्वासावर.पाळेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा शेतकरी आपल्याला अजिबात फसवणार नाही हा विश्वास प्रत्येक ग्राहकांमध्ये आहे.या आंदोलनात सहभागी होणारे लोक एका वेगळ्याच जगातले आहेत हे त्यांच्या सहवासात गेल्यावर लगेच लक्षात येते.यात सहभागी होणारे शेतकरी लालची व हावरट वृत्तीने काम करत नाहीत.नैसर्गिक शेती आंदोलनातील लोकांना एक आध्यात्मिक पाठबळ आहे .नैसर्गिक शेती करणारा शेतकरी निसर्गाला ईश्वराचेच रूप मानतो त्यामुळे तो निसर्गाला हानि पोहचवणारे घटक धरतीमातेवर टाकणे पाप समजतो.
ग्राहक बांधवानो !
*१* नैसर्गिक शेतीत थोडासेही रासायनिक खत टाकल्यास शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते कारण हि शेती पूर्णतः जिवाणू व गान्डुळ यावर आधारीत आहे म्हणजे या शेती पद्धतित थोडासाही रासायनिक खत टाकले असता जिवाणू व गान्डुळ जिवंत रहात नाहीत.
2. *तननाशक*
तण देई धन
नैसर्गिक शेतीत काडी कचरा यांचे आच्छादन केले त्यामुळे तण कमी प्रमाणात होते जाते मोठ्या प्रमाणात आंतरपिके घेतली जातात त्यामुळे अगदी शेत तणाने गच्च भरले असेल तरीही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी तननाशक फवारू शकत नाही .म्हणजे तण व काडीकचऱ्याचे रूपांतर ह्युमस मध्ये होऊन पिकांचे चांगले पोषण होते
या मुळे तणनाशकाच्या फवारनीचा प्रश्नच उद्भवणार नाही .
3. *किटकनाशक*-.
आंतरपिके,सापळा पिके,पक्षी थाम्बे यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कीड़ आटोक्यात येते.नैसर्गिक शेतीत मित्र कीट वाढवणे व वाचवणे यावर भर दिला जातो
रासायनिक कीटनाशक फवारल्यास पिकांना हानिकारक किटकांना खाणारी मित्र कीटकही मरतात ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते यामुळे नैसर्गिक शेतीत कीटनाशक फवारणे पाप मानले जाते .
नैसर्गिक शेतीत जमीन पहेलवाण बनवून पिकांची प्रतिकारक्षमता वाढवण्यावर भर दिला जातो.थोडक्यात सांगायचे तर नैसर्गिक शेतीत कीड़ येतच नाही आणि आलीच तर त्यासाठी नीमास्त्र ब्रम्हास्त्र दशपर्नी यासारखी प्रभावी औषधे आहेतच. गावरान बियाणे,शेतात गान्डुळ,सूक्ष्म जिवाणू ,पक्षी ,फुलपाखरे,मधमाश्याचे पोळी ,आंतरपिके, शेतात 3-4 गायीं,वनभिंत हेच नैसर्गिक शेतीचे सर्टीफिकेट ..
झीरो बजेट नैसर्गीक शेतीतंत्र वापरणारे शेतकरी कुठल्याही प्रकारच्या विषारी निविष्टा न वापरता
मानव व संपुर्ण सजिव सृष्टीसाठी आरोग्यदायी रहाण्यासाठी काम करीत
आहे आपणही या चळवळीचा एक भाग होऊया
हि गोष्ट सहज घेऊ नका
आणि दुर्लक्षीतही करू नका
अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही
पण विषारी अन्नामुळे यातनायुक्त मरण मात्र निश्चित
रंग आकारीने लहान असेल तरीही पौष्टिक खाऊ़या
किंमतीने थोडे महाग पडले तरी विषमुक्त खाऊया
एकवेळ आमच्या शेतावर आवश्य भेट देऊन या चळवळीला पाठिंबा द्या
विषमुक्त खाऊ! निरोगी होऊ!!
शद्बांकन :-A/p = Ujani , Tal = madha, Dist = solapur Ph= 9096997885 YouTube channel = स्वावलंबी भारत by satish jadhav
link= https://www.youtube.com/channel/UC76MgXJ7ve_Xn1lVnHaHQmA
प्रेरणा स्थान ः-राष्ट्रबंधू, स्वदेशी रक्षक, अमर शहिद राजीवजी दिक्षित
मार्गदर्शक , :- पद्मश्री कृषिऋषी आदरणिय श्री सुभाषजी पाळेकर गुरूजी
You can view and join right away.