Balasaheb Katare sir

Balasaheb Katare sir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Balasaheb Katare sir, Education, At/post/Turachi, sangli, Tasgaon.

14/06/2020
*महिलादिना निमित्त मला आवडलेली सर्वोत्कृष्ट कविता...."*💞💞💞💞💞💞*मा.बाळासाहेब कटारे सर*🌺🌺🌺🌺🌺🌺🌺*जागतिक महिला दिनाच्या मनःपूर...
08/03/2020

*महिलादिना निमित्त मला आवडलेली सर्वोत्कृष्ट कविता...."*
💞💞💞💞💞💞
*मा.बाळासाहेब कटारे सर*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! "*
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
*"जगणं विसरू नकोस...."*

*"सखे,"*

*जगाकडे रोज नव्याने..*
*बघणं विसरू नकोस....*
*सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस....*

तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...

त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... १*

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...

कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... २*

तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...

काळजापासून माया तुझी
झुरणं विसरू नकोस...
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ३*

रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....

रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ४*

तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....

ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
*नि सखे तू मुक्तपणे तुझं..*
*जगणं विसरू नकोस.... ५*
*👆👉प्रतिक्रिया अवश्य द्या.*
*सौजन्य:*
*🙏🏻मा.बाळासाहेब कटारे सर*
*जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! "*
🌹🌹🌹🌹🌹🌹

Address

At/post/Turachi, Sangli
Tasgaon

Telephone

+918459241200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balasaheb Katare sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Balasaheb Katare sir:

Shortcuts

Share

Category