Shri Sainath Education Society

Shri Sainath Education Society In the year 1994, Dr.Shashikant Wani started 'Shri Sainath Education Society' in Taloda with the objective of 'Education for Life'.

This was a revolutionary step..

14/02/2026

रांझणी येथील विद्यावर्धिनी निवासी आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा… 🙏
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत संस्कारांची सुंदर परंपरा जपली. ❤️✨

७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..श्री साईनाथ शिक्षण संस्था, प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी निवासी प्र...
26/01/2026

७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

श्री साईनाथ शिक्षण संस्था, प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, रांझणी ता. तळोदा जि. नंदुरबार येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या गौरवशाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री कृष्णा मोतीराम मराठे यांनी भूषविले व ध्वजारोहणाचा मान मा. सौ. प्रविणजी भारती (ज्येष्ठ पत्रकार, राष्ट्रीय रेडिओ समालोचक व कलाकार) यांना लाभला तसेच प्रल्हाद बोराने,अण्णा कापसे व सुभाष बापू हे मान्यवर उपस्थित होते.तसेच सर्वे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम,देशभक्तीपर गीत व नृत्य, मान्यवरांचे मार्गदर्शन व बक्षीस वितरण संपन्न झाले. शेवटी सागर कुंभार सर यांनी आभार प्रदर्शन केले.

🇮🇳 संस्कारातून राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करणारी विद्यावर्धिनी आश्रम शाळा 🇮🇳

🇮🇳 ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 🇮🇳अनंत द्यानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कोठार येथे७७ वा भा...
26/01/2026

🇮🇳 ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 🇮🇳

अनंत द्यानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कोठार येथे
७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष मा. डॉ. शशिकांतजी वाणी साहेब,
सचिव मा. गुलाबराव चव्हाण साहेब, इतर प्रमुख पाहुणे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत व नृत्य सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन व बक्षीस वितरण यामुळे कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला.

🇮🇳 संस्कार, शिस्त आणि देशप्रेमाची उज्वल परंपरा 🇮🇳


कर्मण्य महोत्सव – दिवस पहिला“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥”श्री साईनाथ श...
18/01/2026

कर्मण्य महोत्सव – दिवस पहिला

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥”

श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा,रांझणी येथे तीन दिवसीय ‘कर्मण्य महोत्सव’चा दिमाखदार शुभारंभ झाला.संस्थाध्यक्ष डॉ.शशिकांतजी वाणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त श्री.दिनकर पावरा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार श्री.राजेशजी पाडवी,प्रकल्प अधिकारी श्री.अनय नावंदर तसेच संस्थेचे सचिव श्री.गुलाबराव चव्हाण,भाजपा जिल्ह्याध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते.मान्यवरांच्या सान्निध्यात माजी विद्यार्थीचा सत्कार समारंभ तसेच विद्यार्थ्यांच्या कला,क्रीडा व सांस्कृतिक सादरीकरणातून कर्म,संस्कार व मूल्यांची प्रेरणादायी सुरुवात झाली.

#कर्मण्यमहोत्सव #दिवसपहिला #विद्यावर्धिनीआश्रमशाळा #श्रीसाईनाथशिक्षणसंस्था #रांझणी #आदिवासीविकास #विद्यार्थीगुणदर्शन #कला_क्रीडा_संस्कृती #शैक्षणिकउत्सव

२६ नोव्हेंबर — भारतीय संविधान दिनश्री साईनाथ शिक्षण संस्था,प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक व माध्...
26/11/2025

२६ नोव्हेंबर — भारतीय संविधान दिन

श्री साईनाथ शिक्षण संस्था,प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा,रांझणी..

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतीय लोकशाहीतील मूलभूत मूल्यांना हृदयपूर्वक नमन केले.संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करताना सर्वांनी आदरभाव व्यक्त केला.मुंबई येथील २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांचे स्मरण करत क्षणभर संपूर्ण वातावरणात वेदना,आदर आणि देशभक्तीची भावना दाटून आली.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माध्यमिक मुख्याध्यापक श्री.शालिग्राम वाणी सर प्राथमिक मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब कुवर सर मार्गदर्शक श्री.मनोज चिंचोले सर,अधीक्षक प्रेम माळी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

संविधान मूल्यांचे संस्कार — याचातून घडते उज्ज्वल पिढी…

#भारतीयसंविधानदिन #संविधानदिवस #विद्यावर्धिनीआश्रमशाळारांझणी #साईनाथशिक्षणसंस्थाप्रतापपूर #आदिवासीविकासविभागतळोदाप्रकल्प

Address

13 'Alhad Niwas' Behind Bus Stand, Ashish Park Nagar
Taloda
425413

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sainath Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category