18/04/2026
⛳मावळ शिक्षक प्रबोधन परिवार⛳
आयोजित🌷 वसंतचैतन्य व्याख्यानमाला 2026🌷
शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन साऊ-ज्योति गुणवंत शिक्षक दाम्पत्य पुरस्कार सुप्रसिद्ध तारपा वादक पद्मश्री श्री.भिकल्याजी धिंडा,मावळचे जनसेवक, कार्यसम्राट आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके तसेच सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल संस्थेचे प्रमुख श्री.यजुवेंद्र महाजन सर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
आम्हा शिक्षकांचे नाव क्रांतीज्योती साऊ आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर जोडले जाणे यासारखे महतभाग्य नाही. हा सन्मान आजीवन शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कार्य करण्यास सदैव प्रेरणा देत राहील.
प्रबोधन परिवाराचे मनस्वी आभार 🙏🏻🙏🏻