मविप्र आश्रमशाळा मोहपाडा

  • Home
  • India
  • Surgana
  • मविप्र आश्रमशाळा मोहपाडा

मविप्र आश्रमशाळा मोहपाडा ASHRAMSCHOOL MOHPADA SURGANA

_*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*__*H.S.C बोर्ड परीक्षा -2025/26 परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी व...
02/05/2026

_*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*_
_*H.S.C बोर्ड परीक्षा -2025/26 परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*_ 💐🌹
*म .वि .प्र अनुदानित आश्रमशाळा,मोहपाडा ता .सुरगाणा*
शाळेतील गुणवंत विद्यार्थी - ( *विज्ञान विभाग*)
1) कु. चव्हाण हर्षाली बाळू- 81.33%
2) कु. चौधरी यश कैलास - 73.00 %
3) कु. चौधरी अर्चना वसंत - 72.83 %
4) कु. गायकवाड आरती यशवंत - 72.67 %
5) कु चव्हाण मयूर प्रकाश - 69.50 %

*सर्वांचे खूप खूप अभिनंदन*💐🥳

आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी शाळेची  ाळणी संपन्न झाली. त्यानिमित्ताने पडताळणी अधिकारी सुरगाणा तालुका गटशिक्षणाधिकारी मा...
22/04/2026

आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी शाळेची ाळणी संपन्न झाली. त्यानिमित्ताने पडताळणी अधिकारी सुरगाणा तालुका गटशिक्षणाधिकारी मा.अल्पा देशमुख उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार करतांना मा. मुख्याध्यापक श्री. दळवी सर व श्री. गौळी सर समवेत शिक्षक सहकारी... विशेष बाब म्हणजे वर्षात दुसऱ्यांदा शाळेची पटसंख्या 100% नोंदली गेली. शाळेच्या उपस्थिती व गुणवत्ता या बाबींचे गटशिक्षणाधिकारी मा.अल्पा देशमुख यांनी विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. 💐💐💐

अनिष्ट रूढी,अंधश्रद्धा,जातीभेद आणि अन्यायाच्या काळोखात समाज अडकला होता.स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता,शेतकरी पिळवटल...
11/04/2026

अनिष्ट रूढी,अंधश्रद्धा,जातीभेद आणि अन्यायाच्या काळोखात समाज अडकला होता.स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता,शेतकरी पिळवटला जात होता,आणि शिक्षण व्यवस्था काही मोजक्या लोकांपुरतीच मर्यादित होती. अशा वेळी एक प्रकाशकिरण बनून आले महात्मा ज्योतिराव फुले.

महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.त्यांनी लोकांना विचार करण्याची,प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या हक्कासाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली. "शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे" हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

त्यांनी मुलींसाठी आणि वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली.सावित्रीबाई फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.त्या काळात हा केवळ एक उपक्रम नव्हता,तर संपूर्ण समाजव्यवस्थेला दिलेले धाडसी आव्हान होते.

महात्मा फुले यांनी दाखवून दिले की,अंधार कितीही दाट असला तरी ज्ञानाचा एक दिवा तो दूर करू शकतो.त्यांनी समाजाला समतेचा,शिक्षणाचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला.म्हणूनच आजही त्यांचे कार्य आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलण्याची प्रेरणा देते.

आजच्या पिढीने जर खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांना अभिवादन करायचे असेल,तर प्रत्येक घरात शिक्षण,प्रत्येक मनात समानता आणि प्रत्येक कृतीत मानवता जपली पाहिजे.

"विद्या हीच खरी शक्ती आहे,आणि शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे."

‘मविप्र’ने जिंकले मराठी जनमनम मराठीचा, म महाराष्ट्राचा, अन् म मविप्रचा !शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिकमधील मराठा...
05/03/2026

‘मविप्र’ने जिंकले मराठी जनमन
म मराठीचा, म महाराष्ट्राचा, अन् म मविप्रचा !
शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात ‘चौथे विश्व मराठी संमेलन’ हा मराठीचा महाकुंभ मोठ्या दिमाखात पार पडला. हे संमेलन केवळ एक साहित्यिक पर्व ठरले नाही, तर मराठी भाषा चळवळीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरले. यासाठी संस्थेने अहोरात्र परिश्रम घेतले. सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, परिसंवाद, साहित्यिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून संमेलनाला अभूतपूर्व यश मिळाले. जगभरातील मराठीजन, स्थानिक कलावंत, लेखक, पत्रकार, संशोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने संमेलनाची शोभा वाढवली. या भव्य समारंभात मराठी संवर्धन व प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि संमेलन यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मविप्रला प्रतिष्ठेचा पहिला ‘मराठी भाषा सेवेकरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे केवळ एका संस्थेचा गौरव नसून, नाशिकच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू ठरला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याला सर्व प्रसार माध्यमांनी भरभरून प्रसिद्धी दिली.

श्री. कैलास चौधरी सर यांना शिक्षण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या ...
05/03/2026

श्री. कैलास चौधरी सर यांना शिक्षण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते "कवीवर्य कुसुमाग्रज पुरस्काराने" रविवार दिनांक १५/०३/२०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांचा आनंद द्विगुणित करावा.
श्री. कैलास चौधरी सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा! 💐💐💐💐💐💐💐

 #प्रजासत्ताक_दिन उत्साहात साजरा....भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज शाळेचे राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले हॉलीब...
26/01/2026

#प्रजासत्ताक_दिन उत्साहात साजरा....
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज शाळेचे राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले हॉलीबॉल खेळाडू हर्षाली चव्हाण व दुर्गेश चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. कैलास चौधरी यांचा या प्रसंगी मोहपाडा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत, देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण केले. मा. मुख्याध्यापक श्री. सुभाष दळवी, श्री. संतोष गौळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सामूहिक कवायत....
https://youtu.be/ervuEgzasdI?si=2KTXAG8pTi5a6EWS

मोहपाडा आश्रमशाळेच्या चार विद्यार्थ्यांना BASF शिष्यवृत्ती प्रदान.....🔖सह्याद्री फार्म्स येथे आयोजित **BASF Kids Lab** अ...
09/01/2026

मोहपाडा आश्रमशाळेच्या चार विद्यार्थ्यांना BASF शिष्यवृत्ती प्रदान.....
🔖
सह्याद्री फार्म्स येथे आयोजित **BASF Kids Lab** अंतर्गत झालेल्या **BASF Drawing Competition** मध्ये मोहपाडा आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, शालेय किट आणि STEM किट व कु. हर्षाली गायकवाड व कु. वंदना गायकवाड यांना प्रत्येकी 18 हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. शुक्रवार, दी. ९ जानेवारी २०२६ दुपारी १२.०० वाजता CMCS कॉलेज, गंगापूर रोड, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, नाशिक येथे सदर कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी BASF कंपनीचे प्रतिनिधी मा. तृप्ती कदम, संस्थेचे सरचिटणीस मा. नितीनजी ठाकरे साहेब, शिक्षणाधिकारी मा. भास्कर ढोके साहेब, मविप्रच्या माजी विद्यार्थी संघाचे डॉ. धनंजय चव्हाण, मा. सचिन पाचोरकर शाळेचे मुख्याध्यापक संतोष गौळी, पदवीधर शिक्षक श्री. सतीश शेळके उपस्थित होते.

आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मविप्रच्या मोहपाडा आश्रमशाळेत  #क्रांतीज्योती  #सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अ...
03/01/2026

आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मविप्रच्या मोहपाडा आश्रमशाळेत #क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस #बालिकादिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 💐

*मोहपाडा आश्रमशाळेचे दोन संघ  #राज्य स्तरावर*        16 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष...
19/12/2025

*मोहपाडा आश्रमशाळेचे दोन संघ #राज्य स्तरावर*
16 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव' येथे 'आदिवासी विकास विभाग' अंतर्गत नाशिक-विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सात प्रकल्पातील संघ सहभागी होते. आश्रम शाळा मोहपाडा ता. सुरगाणा येथील 14 वर्षातील मुले व 19 वर्षातील मुली या दोन संघांनी सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत प्रथम क्रमांक मिळवला. दोन संघांची (एकूण 22 खेळाडू) अमरावती येथे होणाऱ्या 'राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा' साठी निवड झाली. 17 वर्षातील मुली व्हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षातील मुले व 19 वर्षातील मुले संघांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी संघातील सर्व विद्यार्थ्यांना नाशिक विभागाचे अपर आयुक्त मा. पावरा साहेब, यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, कळवण प्रकल्प अधिकारी मा. जानकर साहेब व इतर मान्यवरांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. कैलास चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सेवक वर्ग यांनी अभिनंदन केले.

दैनिक देशदूत 14 डिसेंबर 2025शाळेची विद्यार्थीनी हर्षालीची यशोगाथा💐तिचे मार्गदर्शक शाळेचे शिक्षक कैलास चौधरी सर यांचे हार...
15/12/2025

दैनिक देशदूत 14 डिसेंबर 2025
शाळेची विद्यार्थीनी हर्षालीची यशोगाथा💐
तिचे मार्गदर्शक शाळेचे शिक्षक कैलास चौधरी सर यांचे हार्दिक अभिनंदन!💐

Address

At Post Mohapada
Surgana
422211

Telephone

+919423707570

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मविप्र आश्रमशाळा मोहपाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category