झेड. पी. मास्तर प्रविण

झेड. पी. मास्तर प्रविण Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from झेड. पी. मास्तर प्रविण, School, Surgana.

26/11/2025
26/11/2025
फडकी फाउंडेशन यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय युवा कथालेखन स्पर्धेमध्ये आमचे मित्र  आदरणीय श्री. दशरथ पांडुरंग ...
28/10/2025

फडकी फाउंडेशन यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय युवा कथालेखन स्पर्धेमध्ये आमचे मित्र आदरणीय श्री. दशरथ पांडुरंग भोये सर याच्या “मनसूट“ या कथेस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला त्याबद्दल सरांचे मनःपूर्वक अभिनंदन...

आदरणीय गावकरी,बंधारपाडा माझ्या शिक्षक या नोकरीची सुरुवात आपल्या गावातून झाली. आपल्या गावात सलग सहा वर्ष सेवा करण्याची सं...
16/10/2025

आदरणीय गावकरी,
बंधारपाडा

माझ्या शिक्षक या नोकरीची सुरुवात आपल्या गावातून झाली. आपल्या गावात सलग सहा वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली.
मी पहिल्यांदा 2019 मध्ये आलो तेव्हा मयूर, पंकज, भावेश, अक्षय, रोशन यांची बॅच पहिलीला होती. तिथून तर आज भुनवेशवर, भूमिका, श्रुती, राजश्री, कल्याणी या बॅच पर्यंत मुलांना शिकवण्याची संधी मला मिळाली.

जेव्हा ऑनलाईन बदली झाली तेव्हा काहीही वाटलं नव्हतं जाऊ असच निघून पण, आज जेव्हा सगळं सोडून येण्याची वेळ आली तेव्हा मात्र कळालं या शाळेत मन किती गुंतलंय ते. आपले सर्व गावकरी, ती शाळा, गावित सर, गीतांजली मॅडम, मावशी, भारती ताई आणि माझे खास सर्व विद्यार्थी 🥰.

आज सकाळी जेव्हा शाळेत येत होतो तेव्हा असं वाटत होतं की परत या रस्त्याने जरी आलो पण शाळेत या अर्थाने येता येणार नाही.
उद्यापासून समोर ती भूमिका, कल्याणी नाही राहणार त्यांची आठवण कायम येत राहील कारण माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त वेळ ह्या चिमण्या माझ्या सोबत असायच्या.

आज पावलोपावली वाटत होतं की आज शेवटचा दिवस आहे.

या सहा वर्षात आदरणीय श्री. गावित सरांनी मला खूप काही शिकवलं, सांभाळून घेतलं कधीही माझ्यावर रागावले नाही घरातील सदस्याप्रमाणे त्यांनी मला सांभाळून घेतले. आपले केंद्र प्रमुख आदरणीय श्री. भोये साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं केंद्र स्तरावरील काम करायला त्यांनी शिकवलं. त्यांचा मी कायम ऋणी राहील.

समस्त गावकरी तुम्ही मला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळून घेतलं, वेळोवेळी जी हवी ती मदत तुम्ही केली कधी एका शब्दानेही दुखवल नाही. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. खरं तर आज गावात येऊन तुमच्याशी बोलावंसं खूप वाटत होतं पण बोलायला गेलो मन भरून येत होतं म्हणून गावात यायची हिंमत झाली नाही माझी. मावशी सोबत कितीही वेळ गप्पा मारणारा मी आज केवळ एक मिनिट बोलू शकलो.

माझी बदली झाली मी आता परत या शाळेत नाही येणार असं सुद्धा मी मुलांना सांगू शकलो नाही, त्यांच्यासोबत गप्पा मारू शकलो नाही😞

असो....लिहिण्यासारखं खूप आहे पण तूर्तास येथेच थांबतो.

परत एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

माझं काही चुकलं असेल तर तेवढं माफ करावं 🙏 ही विनंती.

आपलेच
जाधव सर

15/10/2025
24/09/2025
24/09/2025

Address

Surgana
422211

Telephone

+919689265109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when झेड. पी. मास्तर प्रविण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category