ZP Primary School Soregaon North Solapur

ZP Primary School Soregaon North Solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ZP Primary School Soregaon North Solapur, School, At Post Soregaon, Vijapur Road, North Solapur, Solapur.

तालुका स्तर क्रीडा स्पर्धा 2025जि.प.शाळा सोरेगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा...जब तक ना सफल होनिंद चैन को त्याग दोतुम ...
05/12/2025

तालुका स्तर क्रीडा स्पर्धा 2025

जि.प.शाळा सोरेगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा...
जब तक ना सफल हो
निंद चैन को त्याग दो
तुम संघर्ष का मैदान छोड कर मत भागो
कुछ किए बिना ही जयजयकार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
=========================
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव...
जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग, उत्तर सोलापूर यांच्याद्वारे आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय जिल्हा परिषद विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव शाळेतील खेळाडूंची विजयी घोडदौड.
या स्पर्धेत कबड्डी लहान गट मुले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत आपला दबदबा कायम राखत विजय मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री अविचल महाडिक व शिक्षण विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना श्री सुरेश चव्हाण सर, श्री बाळासाहेब वाघ, श्री शशिकांत खुडे सर, श्री बसवेश्वर येळदरे सर, श्री किरण राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री जेऊरे सर , शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सोनाली ताई कांबळे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत खडाखडे, शिक्षणतज्ञ श्री विजयकुमार स्वामी व सर्व सदस्य तसेच शाळेतील पालकांनी यांनी अभिनंदन केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏

05/12/2025
05/12/2025
सस्नेह निमंत्रण....
05/11/2025

सस्नेह निमंत्रण....

👑केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत सोरेगाव शाळेचे यश ....      👑 लोकनृत्य स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक  तालुका स्पर्धेसा...
05/11/2025

👑केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत सोरेगाव शाळेचे यश ....

👑 लोकनृत्य स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक तालुका स्पर्धेसाठी निवड
👑 लहान गट तृतीय क्रमांक
👑 चित्रकला स्पर्धा
💫 मोठा गट प्रथम क्रमांक आरोही दुर्योधन वाघमारे इयत्ता सहावी
👑 लहान गट प्रथम क्रमांक भाग्यश्री मनोज खडाखडे इयत्ता पाचवी
दोन्ही गटाचे तालुका स्पर्धेसाठी निवड
👑 वक्तृत्व स्पर्धा मोठा गट सृष्टी परशुराम श्रीमंगले इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक तालुका स्पर्धेसाठी निवड
👑 कथाकथन स्पर्धा लहान गट सौंदर्य परशुराम श्रीमंगले इयत्ता चौथी द्वितीय क्रमांक तालुका स्पर्धेसाठी निवड
👑 कथाकथन मोठा गट समर्थ संदीप कोळी तृतीय क्रमांक
👑 निबंध स्पर्धा मोठा गट प्रणिती राम घोडके तृतीय क्रमांक
👑 समूहगीत मोठा गट तृतीय क्रमांक व लहान गट तृतीय क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख वाघमोडे साहेब व केंद्रप्रमुख शरद पाटील सर व मुख्याध्यापक जेऊरे सर व शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले 💫💫

*“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी — सोरेगाव शाळेची एकत्रित वाटचाल!”*🫛🥑🍆🍅🥝🍓🍍🥭🌽*सोलापूर जिल्ह्याचे ...
04/11/2025

*“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी — सोरेगाव शाळेची एकत्रित वाटचाल!”*

🫛🥑🍆🍅🥝🍓🍍🥭🌽

*सोलापूर जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी साहेब यांचा व सोरेगाव शाळेतील शिक्षक यांचा समक्ष स्नेहभेटीचा अविस्मरणीय प्रसंग लाभला*. या भेटीत शाळेच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार अग्रस्थानी ठेवण्यात आला.

*मा.कुलकर्णी साहेबांनी सोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या श्रमाच्या घामाला न्याय्य मूल्य मिळवून देण्यासाठी* एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. *शिक्षण आणि शेती या दोन आधारस्तंभांच्या संगमातून गावाच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा दृढ विश्वास या संवादातून प्रकट झाला*.

*या क्षणी शाळेच्यावतीने मा.श्री. अतुल कुलकर्णी साहेबांचा सत्कार करण्यात आला.*💐💐💐💐 यावेळी *श्री. काशिनाथ भतगुणकी, मुख्याध्यापक श्री. शरणपा जेऊरे सर, श्री. बसवेश्वर येळदरे सर, श्री बाळासाहेब वाघ श्री. संतोष पवार सर, श्री. सिद्धाराम माशाळे सर* उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

✨ *या भेटीतून उमललेला संकल्प केवळ शाळा व शेतकरी यांच्या विकासापुरता मर्यादित नसून, तो समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरेल. शिक्षणाचा दीप व शेतीचा घाम या दोन शक्तींच्या संगमातून ग्रामीण भाग नव्या समृद्धीकडे वाटचाल करील, असा विश्वास सर्वांच्या मनामनात दृढ झाला*. ✨

Address

At Post Soregaon, Vijapur Road, North Solapur
Solapur
413008

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 7:30am - 1:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP Primary School Soregaon North Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category