01/11/2022
*सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची सर्वसाधारण सभा संपन्न*
काल रविवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२२, रोजी श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी विद्यार्थी १९८९-९० संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाली. शाळेच्या सभागृहात झालेल्या या सभेत १९८९-९० सालचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेचे प्रास्ताविक श्री. लिंगण्णा कोरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. सुनील हंद्राळमठ यांनी भूषविले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पाटील, व पर्यवेक्षक श्री तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे अहवाल वाचन श्री. संतोष होसमनी यांनी केले.
मागील कार्यकारणीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर शाळेची प्रमुख कार्यकारणी सर्व संमतीने निवडण्यात आली. पुढील दोन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून श्री. राहुल माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
माजी अध्यक्षांच्या व खजिनदारांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या परिस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राहुल माने यांनी पदभार स्वीकारला.
इतर कार्यकारणी सदस्य खालील प्रमाणे
*अध्यक्ष* श्री. राहुल माने,
*उपाध्यक्षा* सौ. वैशाली निंबाळे,
*सचिव* श्री. प्रमोद कोरे
*सचिव* सौ. सुधा कटाप
*सहसचिव* श्री. विलास स्वामी,
*सहसचिव* सौ. वैशाली म्हेत्रे
*खजिनदार* श्री. दीपक आडगोपुल
*सहखजिनदार* श्री. केदार चाकोते,
*प्रमुख सल्लागार* श्री बसवराज उपासे, आणि श्री लिंगण्णा कोरे.
कार्यकारिणीत खालील नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री. जितेंद्र भडंगे,
श्री. अजित वडजे,
श्री. संजीव चिम्मलगी,
श्री. दिनेश सकट,
आणि सौ. स्नेहलता उंबरजे,
या नवीन कार्यकारणीत
श्री. अविनाश पाटील,
श्री. नरेंद्र काटीकर,
श्री. संगमेश्वर घत्तरगी,
श्री. मेघराज कळसे,
श्री. संतोष होसमनी,
सौ. महानंदा कावळे
हे माजी सदस्य कार्यान्वित राहतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर श्री. सुनील हंद्राळमठ यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेचा व ताकदीचा आपला अनुभव सांगितला त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात परिचय दिला.