19/11/2015
Jay Bhavani....Jay Shivaji...!!!
औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा
मध्ये ३५० कोटी होता
आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा
कसाबसा एक कोटी होता...
औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या
साडे ४ हजार आहे
आणी एका सरदाराच्या हाताखाली
कमीत कमी ४०,००० च सैन्य आहे. तर
शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त
३५००० आहे...
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब
स्वराज्याला का चिरडायला निघाला.
हयात घालवली त्यानी... आयुष्याची ३६
वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली
स्वराज्य संपवायला...
स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे. इरान
तसंच आहे. गोवळकोंड्याची कुतूबशाही
तशीच आहे. नगरची निजामशाही तशीच
आहे. विजापुरची आदिलशाही तशीच आहे. ते
घे ना. विजापुर ची आदिलशाही घे,
निजामशाही घे,
कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे.
महाराष्ट्रच का ??? स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी
लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं
म्हणतात.
तो लिहितो 'इरानच राज्य शाहबाजच
आहे. अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुलच
आहे. विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्य निजामशाहाच आहे. पण
शिवाजींच स्वराज्य हे कोणत्या
राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन
हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य
आहे. आणी जिथं रयतेच राज्य असतं तिथे
माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे
बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका
आहे तो हा...
' औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या
यशाचे गणित मांडलं.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे
पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार
नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं... आणी
हे खरंच आहे...
तो बुंदेलखंडाचा छत्रसाल
बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन
महाराजांकडे आला आणी म्हणाला की
त्याला महाराजांच्या लष्करात सामील
व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी
त्याला समजवलं की जसं त्यांनी इथे
स्वराज्य स्थापन केलं तसं त्याने बुंदेलखंडात
करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला
महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी
त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन
औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात
मोठा धोका म्हणजे हा स्वराज्याचा
प्रयोग...
आजही मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडात
छत्रसाल बुंदेलाची देवा सारखी पूजा
करतात. ज्या माणसाला महाराजांनी
घडवलं त्याची देवा सारखी पूजा करतात
मध्य प्रदेश मधे ! आणी आपलं हे दुर्दैवं की
आपण आज पण महाराजांच नाव
घेऊन जात, धर्म, तारीख, तिथी या वर
भांडतो....
पटलं तर शेअर करा...
☀🔥🚩॥ हर हर महादेव, जय श्रीराम ॥🚩
🚩॥ जय भवानी, जय शिवाजी.॥🚩🔥☀