Gramin Vidya Vikas Vidyalaya Chapalgaon

Gramin Vidya Vikas Vidyalaya Chapalgaon School

09/03/2020
*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत जागतिक महिला दिन संपन्न.*------------------------------------------------...
09/03/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत जागतिक महिला दिन संपन्न.*
---------------------------------------------------
सोमवार दिनांक ९ मार्च २०२० रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील श्रीमती गुरव मॅडम, उडचाण मॅडम, म्हमाणे मॅडम व विद्यार्थीनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान महिलाविषयी व स्वच्छतेविषयी प्रशालेतील इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री निलकंठेश्वर पाटील सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सर, सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेतील एस. एस. सी. विद्यार्थ्यांना निरोप.*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐शुक्रवार दिनांक २८ फेब्रु...
28/02/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेतील एस. एस. सी. विद्यार्थ्यांना निरोप.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत इयत्ता १० वीच्या विद्यार्थांना निरोप देण्यात आला. विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थांनी भावी जीवनात संस्कारसंपन्न वागावे व होणाऱ्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करावे, असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सरांनी शुभेच्छापर मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेतील गुरुजनांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न.*🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २...
28/02/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न.*
🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬🔭🔬
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. भारतीय भौतिकवादी, थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेतील विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुश्री पाटील मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती सुजाता उडचाण मॅडम यांनी मानले.
🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️

27/02/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत जागतिक मराठी भाषा दिन संपन्न.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गुरूवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानपीठ पुरस्कर्ते, कादंबरीकार, नाटककार, थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री.मुली सर व श्री.कत्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन नियमित करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रशालेतील मराठी विषयाचे विभाग प्रमुख श्री. विजापूरे सरांनी व्यक्त केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनीं व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर तर आभार एम.एस.पाटील सरांनी मानले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत शिवजयंती साजरी.**------------------------------------------------* बुधवार...
19/02/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत शिवजयंती साजरी.*
*------------------------------------------------*
बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रौढ प्रताप पुरंदर, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन क्रीडा विभाग प्रमुख श्री बानेगाव सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री निलकंठेश्वर पाटील सरांनी छञपती शिवाजी महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

10/02/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेतील कु. पार्वती परमेश्वर मोरे या दिव्यांग विद्यार्थिनी ने अक्कलकोट पंचायत समिती येथे आईवरील सादर केलेले सुंदर गीत.*

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत 71 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...
26/01/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत 71 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रविवार दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत 71 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणा पूर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविकांतजी पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी रोमहर्षक संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धा, तालुका क्रीडा स्पर्धा, आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थांनी चित्तथरारक व नेत्रदीपक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर तर आभार एम.एस पाटील सरांनी मानले.

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिन संपन्न.*---------------------------------...
23/01/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिन संपन्न.*
------------------------------------------------
गुरूवार दिनांक 23 जानेवारी 2020 रोजी ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 123 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सर, पर्यवेक्षक श्री माने सर, श्री माशाळे सर, श्री श्रीगिरी सर,श्री बानेगांव सर, श्री नारायणकर सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू व भगिनीं व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय  प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न.*शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रो...
03/01/2020

*ग्रामीण विद्या विकास विद्यालय प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न.*

शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी स्त्री शिक्षणाचे अग्रदुत, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन प्रशालेतील श्रीमती गुरव मॅडम, उडचाण मॅडम, पाटील मॅडम, म्हमाणे मॅडम व विद्यार्थीनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेतील गणित व विज्ञान विषयाचे तज्ञ शिक्षक श्री चंद्रशेखर फताटे सरांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री मुली सर, पर्यवेक्षक श्री माने सर, प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

28/12/2019

महाराष्ट्रातील एक थोर शिक्षण तज्ञ, प्रातिभ व्यक्तिमत्वाचा प्रशासक, गौरवास्पद व्यक्तिमत्व, ज्यांनी आयुष्यभर शेतकरी, मजूर, उपेक्षित वर्ग, दीनदलित यांच्या लेकरांची काळजी वाहिली. शेवटचा श्वास देखील आपल्या शिक्षण संस्थेसाठी व्यतीत केलं. असे ते चपळगावातील आणि पंचक्रोशीतील मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस तथा प्राचार्य स्वर्गीय पी. वाय. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या नेत्र मोतीबिंदू चिकित्सा शिबिर त्याचबरोबर प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर उटगे हे उपस्थित होते. प्रतीमा पूजनानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रविकांतजी पाटील साहेब यांनी केले. प्रस्तावना दाखल मनोगत व्यक्त करताना पाटील साहेब म्हणाले की, ही संस्था उभी करण्यासाठी स्वर्गीय पी. वाय.पाटील सर ,स्व.शंकरराव (बाबा)पाटील , मरहुम इनायतअली (काका) पटेल, स्व.शंकररावजी हंजगे, स्व. महादेव बह्राणपुरे, स्व. गिरेप्पा उटगे, स्व. मडोळप्पा बानेगांव, स्व. धानप्पा आण्णाराव पाटील, स्व. गोविंद शेटजी आधी महनीय व्यक्तीने आपले आयुष्य याकामी लावले. त्यांचा आदर्श घेण्याकरता म्हणून अशा जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण घेत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून अशी कार्यक्रम घेतो. या आशयाचे वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष पाटील साहेबांनी व्यक्त केले. चपळगाव शाळेची परंपरा फार मोठी आहे. या शाळेने राज्याला अनेक शिक्षक, प्राध्यापक, मंत्री, राजपत्रित अधिकारी दिल्याचे वक्तव्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी, विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त प्राचार्य, माजी विद्यार्थी त्याच बरोबर शाळेतील शिक्षक वृंद, कॉलेजमधील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब बनसोडे सर यांनी केले तर आभार एम. एस. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गणी पटेल साहेब, कार्याध्यक्ष पंडित पाटील साहेब, संस्थेचे सरचिटणीस प्राध्यापक प्रभाकरजी हंजगे साहेब, त्याचबरोबर जेष्ठ संचालक मल्लिकार्जुन आप्पा पाटील, म्हमाणे मामा, सेवानिवृत्त लेखनिक शंकरराव म्हमाणे हेही उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाल्याचे लोकांमध्ये बोलले जात होते.

Address

Solapur
413226

Telephone

+919503777272

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gramin Vidya Vikas Vidyalaya Chapalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category