Shri Samarth Vidyamandir, Solapur

Shri Samarth Vidyamandir, Solapur Official Page of
Shri Samarth Vidyamandir, Solapur
(1)

आमचे प्रेरणास्थान व संस्थेचे माजी सचिव,वै. उदयकुमार शिखरे सर यांची आज जयंती.विनम्र अभिवादन!💐 💐 💐 💐 💐 💐
14/11/2025

आमचे प्रेरणास्थान व संस्थेचे माजी सचिव,
वै. उदयकुमार शिखरे सर यांची आज जयंती.
विनम्र अभिवादन!
💐 💐 💐 💐 💐 💐

राज्य शासनांतर्गत स्वस्थ नारी, सशक्त परिवार कार्यक्रम उत्साहात..    शास्त्री नगर येथील श्री समर्थ विद्यामंदिर शाळेमध्ये ...
29/09/2025

राज्य शासनांतर्गत स्वस्थ नारी, सशक्त परिवार कार्यक्रम उत्साहात..
शास्त्री नगर येथील श्री समर्थ विद्यामंदिर शाळेमध्ये नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम सुरू असून आज दि. २९ सप्टेंबर,सोमवार रोजी राज्य शासनांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यानच्या पंधरवड्यात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त तसेच महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुधा शिखरे तर प्रमुख पाहुणे डॉ. विजया होमकर (दाराशा हॉस्पिटल) तसेच आरोग्य सेवक थॉमसन वाडे व इतर सहकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजया होमकर यांनी इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना योग्य आहार, उत्तम आरोग्य, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची तसेच विविध योग प्रकार घेऊन मार्गदर्शन केले. तसेच महिला शिक्षकांच्या आरोग्यासाठी HB,BP आणि Sugar च्या टेस्ट करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती शिखरे यांनी केले तर आभार मंजुषा मुळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महादेव चौरे, शीला शिंदे, सुवर्णा माशाळे,प्रभावती कंडरे, ओमश्री चित्रावकार, परमेश्वर कलशेट्टी, दीपाली शहाणे, वर्षा शेळके, निलोफर शेख, दैवशाला उकिरडे, सुरेखा केदार, रुथम्मा भंडारे आणि राजकिरण चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

🌍 *जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त श्री समर्थ विद्यामंदिर विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*_रोटरी क्लब ऑफ सोलापूर व किशोरजी चं...
19/09/2025

🌍 *जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त श्री समर्थ विद्यामंदिर विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*

_रोटरी क्लब ऑफ सोलापूर व किशोरजी चंडक यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रलेखन स्पर्धा_

सोलापूर (दि. १९):
जागतिक पत्रलेखन दिन (१ सप्टेंबर) निमित्ताने रोटरी क्लब ऑफ सोलापूर व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टपाल तिकीट संग्रहक किशोरजी चंडक यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी यशाची चमक दाखवत शाळेचा मान उंचावला.

🏆 स्पर्धेतील विजेते विद्यार्थी :

इयत्ता चौथी : प्रथमेश पांडुरंग सोनवणे (प्रथम), वेदिका विकास कांबळे (द्वितीय)

इयत्ता पाचवी : इरम आसिफ शेख (प्रथम), समर्थ नितीन सोनकांबळे (द्वितीय)

इयत्ता सहावी : अर्पिता नितीन इंगळे (प्रथम), आयेशा आरिफ मोमीन (द्वितीय)

इयत्ता सातवी : उमेरा अकबर सय्यद (प्रथम), जोबिया कासिम मंगलगिरी (द्वितीय)

🎖 बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सायं. ६:३० वा. ‘हॅच फ्री मेसन्स हॉल, सोलापूर’ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोस्ट ऑफिस सोलापूरचे अधीक्षक मा. श्री. राव उपस्थित होते.

या प्रसंगी किशोरजी चंडक व रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा सौ. धनश्री केळकर, अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, मुख्याध्यापिका सुधा शिखरे तसेच शिक्षकवृंदातील राजकिरण चव्हाण, महादेव चौरे, मंजुषा मुळे, वर्षा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

🌸 कार्यक्रम आटोपशीर व नेटका झाला. विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून भेटवस्तू व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन करण्यात आले. 🌸

📢   #आनंद_वार्ता 📢     एक सप्टेंबर अर्थात जागतिक पत्र लेखन. या दिवशी  #रोटरी_क्लब_ऑफ_सोलापूर आणि सोलापुरातील आंतरराष्ट्र...
18/09/2025

📢 #आनंद_वार्ता 📢
एक सप्टेंबर अर्थात जागतिक पत्र लेखन. या दिवशी #रोटरी_क्लब_ऑफ_सोलापूर आणि सोलापुरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टपाल तिकीट संग्रह #किशोर_चंडक यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आपल्या शाळेतील इयत्ता निहाय यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे
----------------------------------------
श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर
१ सप्टेंबर : जागतिक पत्रलेखन दिनानिमित
#पत्रलेखन_स्पर्धा : #निकाल

इयत्ता- चौथी
१. चि. प्रथमेश पांडुरंग सोनवणे.
२. कु. वेदिका विकास कांबळे.

इयत्ता- पाचवी
१. कु. इरम आसिफ शेख.
२. चि. समर्थ नितीन सोनकांबळे.

इयत्ता- सहावी
१. कु. अर्पिता नितीन इंगळे.
२. कु. आयेशा आरिफ मोमीन.

इयत्ता- सातवी
१. कु. उमेरा अकबर सय्यद.
२. कु. जोबिया कासिम मंगलगिरी.
----------------------------------------
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मा. श्री. राव (अधिक्षक, पोस्ट ऑफिस, सोलापूर) यांच्या हस्ते, शुक्रवार दि. १९ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ६:३० वा. 'हॅच फ्री मेसन्स हॉल, सोलापूर.' येथे होणार आहे. संबंधित सर्व विजेते विद्यार्थी, त्यांचे वर्गशिक्षक व पालक यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे.
-मुख्याध्यापिका

 #हिंदी_दिन_विशेष_क्षण     १४ सप्टेंबर, श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर येथे साजरा झालेल्या हिंदी दिनानिमित्त🌸 इकरा इम्त...
15/09/2025

#हिंदी_दिन_विशेष_क्षण
१४ सप्टेंबर, श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर येथे साजरा झालेल्या हिंदी दिनानिमित्त
🌸 इकरा इम्तियाज खोंडे
🌸 शाहिद फजल शेख
🌸 आयेशा आरिफ मोमीन
या विद्यार्थ्यांनी दिलेली सुंदर व प्रभावी भाषणे सर्वांचे मन जिंकून गेली. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शाबासकी! 🙌🎉
या कार्यक्रमास राजकिरण चव्हाण, मंजुषा मुळे, शीला शिंदे, श्रुती शिखरे, महादेव चौरे, वर्षा शेळके, ओमश्री चित्रावकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

🇮🇳 हिंदी भाषेचा गौरव वाढवणाऱ्या या उपक्रमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

पत्रलेखन दिनानिमित्त किशोर चंडक यांचा विद्यार्थी संवाद : पोस्टकार्डवर उमटले कृतज्ञतेचे शब्द    सोलापूर (दि. १) : जागतिक ...
02/09/2025

पत्रलेखन दिनानिमित्त किशोर चंडक यांचा विद्यार्थी संवाद : पोस्टकार्डवर उमटले कृतज्ञतेचे शब्द

सोलापूर (दि. १) : जागतिक #पत्रलेखन दिनानिमित्त शास्त्रीनगर येथील श्री समर्थ विद्यामंदिरात #विद्यार्थी_संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक #किशोर_चंडक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पत्रलेखनाचे महत्त्व उलगडून सांगितले.
या उपक्रमात चौथी ते सातवीतील सुमारे 200 विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड वाटप करून शिक्षक, पालक, मित्रपरिवार व नातेवाईकांना कृतज्ञतेची पत्रे लिहिण्यास प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोस्टकार्डवर आपली भावना व्यक्त केली. प्रत्येक इयत्तेतील उत्कृष्ट दोन पत्रलेखनाला किशोर चंडक यांच्याकडून बक्षीसही देण्यात येणार आहे.
संवादादरम्यान किशोर चंडक यांनी स्वतःच्या आयुष्यातील पत्रलेखन अनुभव, संग्रहित पत्रे, पोस्टाची तिकिटे, लग्नपत्रिका आणि काडेपेटी कव्हर्स यांसारख्या आठवणी विद्यार्थ्यांपुढे मांडल्या.
या प्रसंगी #रोटरी_क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर, गुरुनानक नगर पोस्ट ऑफिसच्या प्रभारी वैशाली नरुटे, संस्थेचे सचिव अरुण शिखरे व मुख्याध्यापिका सुधा शिखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तंत्रस्नेही शिक्षक #राजकिरण_चव्हाण यांनी केले तर आभार मंजुषा मुळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परमेश्वर कलशेट्टी, शीला शिंदे, श्रुती शिखरे, रुथम्मा भंडारे, वर्षा शेळके व महादेव चौरे यांनी सहकार्य केले.

#श्री_समर्थ_विद्यामंदिर_सोलापूर

*श्री समर्थ विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*      सोलापूर (दि. १०) : शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्यामं...
10/07/2025

*श्री समर्थ विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
सोलापूर (दि. १०) : शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्यामंदिर येथे आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका सुधा शिखरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, माजी जेष्ठ शिक्षिका विजया शिखरे, ज्येष्ठ शिक्षिका प्रभावती कंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण व अमोल तिपणे यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा शेळके यांनी केले तर आभार शीला शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा मुळे, रुथम्मा भंडारे, महादेव चौरे, श्रुती शिखरे, परमेश्वर कलशेट्टी, चंद्रकला येडके, ओमश्री चित्रावकर आणि सुरेखा केदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तंत्रस्नेही शिक्षक 'राजकिरण चव्हाण' यांची मुलाखतभाग - २तंत्रस्नेही शिक्षक होण्यामागचा प्रवास, राज्यात तंत्रस्नेही शिक्षण...
22/03/2025

तंत्रस्नेही शिक्षक 'राजकिरण चव्हाण' यांची मुलाखत
भाग - २

तंत्रस्नेही शिक्षक होण्यामागचा प्रवास, राज्यात तंत्रस्नेही शिक्षणाची चळवळ कशी पद्धतीने रुजली व एकंदर भविष्यात येऊ घातलेल्या संधी या संदर्भात सविस्तर मुलाखतीतून आपल्याला जाणून घेता येईल. सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की!
_________________________
https://youtu.be/gt13l72MkbI?si=vzrBk2Jn0PCJ1Oez
_________________________
ायलॉग'च्या या पॉडकास्टचा पहिला भाग नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडला असेल आणि या दुसऱ्या भागाला देखील आपण नक्कीच प्रतिसाद द्याल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि न विसरता कमेंट देखील करा. धन्यवाद!

पहिल्या भागाची लिंक: https://youtu.be/dq6cRvEMzu0?si=QpX4Dn3I_YbGkSqL

आयआयएम टीचर इनोव्हेशन पुरस्कारप्राप्त तंत्रस्नेही शिक्षक I E Learning I Digital Educationश्री. राजकिरण चव्हाण हे सोलापूर येथील युव...

*श्री समर्थ विद्यामंदिर येथे बैठक ॲट स्कूल उपक्रमांतर्गत 'तबला वादन' सादरीकरण*     सोलापूर (दि.२८) : शास्त्रीनगर परिसरात...
29/01/2025

*श्री समर्थ विद्यामंदिर येथे बैठक ॲट स्कूल उपक्रमांतर्गत 'तबला वादन' सादरीकरण*
सोलापूर (दि.२८) : शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्यामंदिर येथे प्रिसिजन फाउंडेशनच्यावतीने 'बैठक @ स्कूल' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध तबलावादक प्रसाद कुलकर्णी व हार्मोनियम वादक ऋषभ हरदडे यांनी आपल्या वादनातून सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या उपक्रमातून शास्त्रीय संगीत, पारंपारिक वाद्याची ओळख व प्रात्यक्षिक आदी बाबी विद्यार्थ्यांना जवळून पाहता आल्या.
मनाची तल्लीनता व एकाग्रता वाढण्यास मदत झाली. स्वतःच्या आंतरिक मनामध्ये डोकावून पाहण्याची, ताणतणावाचे समायोजन करण्याची, तसेच आपले भावनाविश्व अधिक समृद्ध करण्याची ही संधी विद्यार्थ्यांनी देखील दडवली नाही. द्वित लयीत दिव्य संकीर्ण रेलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन झाले. विद्यार्थ्यांचे शास्त्रीय संगीताबद्दलच्या शिक्षणाचे कुतूहल, त्यांनी मान्यवरांना विचारलेल्या प्रश्नांमधून लक्षात आले. एकंदरीत पाहता सदर उपक्रम अतिशय प्रसन्न व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वी शाळेचे मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी, राजकिरण चव्हाण, मंजुषा मुळे, श्रुती शिखरे, दैवशाला उकिरडे यांचे सहकार्य लाभले. 🙏

*डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*      आज 15 ऑक्टोबर अर्थात भारताचे माजी राष्...
15/10/2024

*डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
आज 15 ऑक्टोबर अर्थात भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती. यानिमित्त श्री समर्थ विद्यामंदिर सोलापूर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांचे सलग वाचन घेण्यात आले. यातून आपल्या जीवनातील वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले.
शाळेतील शिक्षक राजकिरण चव्हाण यांनी 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन व त्यांच्या जीवनातील वाचनाचे महत्त्व' आपल्या मनोगत त्यातून व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांमधून साक्षी कुंभार हिने आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी, संस्थेचे सचिव अरुण शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रुती शिखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवशाला उकिरडे व ओमश्री चित्रावकर यांचे सहकार्य लाभले.

Address

Solapur
413003

Opening Hours

Monday 6:50am - 5:30pm
Tuesday 6:50am - 5:30pm
Wednesday 6:50am - 5:30pm
Thursday 6:50am - 5:30pm
Friday 6:50am - 5:30pm
Saturday 6:50am - 2pm

Telephone

+917774883388

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Samarth Vidyamandir, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Samarth Vidyamandir, Solapur:

Shortcuts

Share

Category