10/12/2025
💐 *सन्मान व स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन* 💐📖
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक *श्री.रवींद्र ठाकरे साहेब* हे मंगळवारी दुपारी महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रविण्य पुरस्कार* प्राप्त
*"श्री. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ (सेवाभावी संस्था)"* संचालित
*श्री. सिद्धिविनायक मुलींचे वसतिगृह* या वसतीगृहास विद्यार्थिनींना स्पर्धात्मक परीक्षाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी सर्वात प्रथम वसतीगृहातील निवासी विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, सुरक्षिततेच्या व्यवस्थेची पाहणी देखील केली असून यावेळी सोयी-सुविधा पाहून भारावून गेले.त्यांनतर श्री. ठाकरे व इतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचां संस्थेच्या वतीने पुष्पगुछ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर वसतीगृहातील उपस्थित विद्यार्थिनींना स्पर्धात्मक परीक्षाबाबत अनमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी वसतीगृहातील उपस्थित विद्यार्थिनी ठाकरे यांना स्पर्धात्मक परिक्षाबाबत प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना त्यांनी सोप्या आणि सध्या पद्धतीने उत्तरे दिली.यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे *दिपक पाटिल, पंडित फुले,भिकन सतुके* आदी पोलीस कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी,कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होते... धन्यवाद 🙏